९० व्या दशकातलं बालपण | कधी ही न संपणारा प्रवास | 90th Childhood Memories | ब्लॉग - १

SD &  Admin
0


ठवणीतील कधीही न संपणारा प्रवास म्हणजे बालपण. हा प्रवास म्हणजे आयुष्यातील आनंदाचे झाड. खूप मस्त वाटतं. दुरून जेव्हा अशा सुखद आठवणी जागतात,तेव्हा मन अगदी आनंदून आणि गहिवरून येते. आज तिसी उलटली. कधी कधी मनाला खूप वेदना होतात. वाटतं.. का एवढ्या लवकर बालपण निघून गेलं? जर.., अजून जगता आलं असत तर... खप आनंद झाला असता. परंतु...

असू दे... कधी ना कधी प्रत्येक गोष्ट ही आपल्या आयुष्यातून निघून जातच असते. मग ती आपली किती ही प्रिय असली तरी. म्हणून माणसाने कधी ही सतत दु:ख करत बसू नये. कशात ना कशात आनंद हा लपलेला असतोच. तो शोधण्याचा प्रयत्न करावा.

९० व्या दशकातलं बालपण | कधी ही न संपणारा प्रवास | 90th Childhood Memories


माझं कोंकणातलं बालपण. आणि ते ही ९० व्या दशकातलं. खूप मजा होती त्या वेळी. खरं तर.. अधिकांश लोकांच म्हणन आहे की, बालपण या झाडाचा रस फक्त ९० व्या दशकातील लोकानीच आनंदाने चाखला आहे. मी या लोकांच्या विचाराशी सहमत आहे. प्रेमळ माणसे, प्रदूषण विरहित वातावरण, पैसा पेक्षा माणुसकीला महत्व, माणसा-माणसा मध्ये जीवा भावाची बंधुता आणि एकता. सर्वांचा नाती गोती जपण्यावर अधिक भर. प्रत्येकजन सुख-दु:खात मनापासून सहभागी होत असायचा. आणि यात सर्वात महत्वाचं आपले बाल सवंगडी. आपण त्यांना कधीच विसरू शकणार नाही. अशाच खूप काही गेलेल्या या आठवणीबद्दल सांगता येईल. आज जेव्हा जेव्हा या आठवणी मनात उजळतात, तेव्हा मन आणि डोळे  अगदी अश्रुनी भिजून जातात.

बालपणीच्या या पारावर आपण जगलेल्या आठवणी, आज मनाला खूप सुखाचा ओलावा देत असतात, तर काही आपल्याला दु:खात बुडून टाकतात. आपल्याला त्या व्याकूळ करून टाकतात. त्यात महत्वाच म्हणजे, आपली माणस, जी आज आपल्यात नाहीत आहेत. ज्या माणसांनी आपल्याला अंगा खांद्यावर घेतलं, मायेन कुरवाललं, खूप प्रेम दिल, आज जेव्हा अशी माणसं आपल्या आयुष्यात नसतात, तेव्हा मनाला किती वेदना होतात. हे शब्दात सांगूच शकणार नाही.

Read More: बालपणीच्या आठवणी | ९० व्या दशकातील बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in marathi

बालपणीच्या या पारावर माझ्या आजीची आठवण खूप येते. खूप माझ्यावर प्रेम करायची. पूर्ण दिवस तिचा माझ्या भोवतीच असायचा. मी कधी इकडे तिकडे झालो, तर ती दिवस भर गावभर शोधत फिरायची. कुणी खाऊ वैगरे दिला तर, ती प्रथम मलाच द्यायची. मग इतर भावंडाना. खूप माझे लाड करायची. अशी माझी आजी जेव्हा मला सोडून गेली, तेव्हा मनाला खूप यातना झाल्या होत्या. आज ही होतात. खरच बालपणी जगलेलं सुंदर आयुष्य आज आपल्याला खूप सुख देतं, पण त्याचबरोबर आपल्याला दु:खाला ही सामोरे जावे लागते. आणि वरती म्हटल्याप्रमाणे बालपण हे कधी ही न संपणारा प्रवास आहे. आणि तो सतत आपल्या मनात नदीच्या प्रवाहाप्रमाणे आपली वाट काढत वेगाने धावत असणार आहे. 

बालपणीचा या प्रवाहात प्रत्येकजन बुडण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो दुःखाचा भाग असो किंवा सुखाचा. प्रत्येकाला बुडायचेच असते. मग त्यातून काहीही णी निष्पन्न होऊ दे. ते आपल्याला पाहिजेच असते. बालपणीच्या या पारावर मी जेव्हा विसावा घेत, आठवणीच्या दुनियेत भरारी मारतो, तेव्हा असंख्य सुखद आठवणी मनात फिरक्या मारत असतात. यात काही मनाला चटका देणाऱ्या ही आठवणी आहेत.

माझे वाचक मित्र आणि मैत्रिणी, बालपणीच्या या पारावर जेव्हा मनाला कळायला लागले, तेव्हापासून ते आतापर्यंतचा प्रवास मी तुमच्या समोर ठेवणार आहे. मला आशा आहे की, माझी ही आठवणीची वेल तुमच्या मनात नक्कीच घर करून बसेल. 

वाचायला विसरू नका.. भेटूया पुढील ब्लॉग मध्ये.......           




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!