पुण्यामध्ये बारा वर्षापूर्वी भेट झाली होती. त्या वेळी ती बी.कॉमच्या सेकंडइअरला होती. मी नुकताच बी.कॉमची पदवी घेऊन एका कंपनीत नोकरीला लागलो होतो. सुरुवातीला मी काम करता करता कॉम्पुटर क्लास जॉईन केला होता आणि तिने ही त्याच क्लास ला जॉईन केलं होतं. तिथेच आमची ओळख झाली.
दिवसें दिवस आमची मैत्री वाढत गेली. तसं दोघांचा एकमेकांवरती विश्वास ही वाढत गेला. खरं तर, आमच्यात त्यावेळी कोणत्याच अशा वेगळ्या फिलिंग नव्हत्या. निव्वळ पवित्र मैत्री होती. दररोज संध्याकाळी माझं ऑफिस सुटलं की न चुकता मला भेटायला येयची. येताना मात्र हातात एक चॉकलेट नक्कीच असायचे. मला वाटतं ओळख झाल्यानंतर ही सवय कधीच मोडली नाही. दररोज भेटणे आणि चॉकलेट देणे हा आमचा उपक्रम क्लास सुटल्यानंतर सुरूच असायचा.
या वयात येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींच्या फिलिंग या खूपच नटखट असतात. कंट्रोल करणे शक्य नसते. परंतु आमच्यात असे काहीच नव्हते. आम्हाला मात्र एकमेकांना भेटणे, एकत्र फिरणे हेच आवडायचे. एकमेकांना कधी स्पर्श झाला नाही. पण एकमेकांना भेटणे सवयच होऊन गेली होती.
तीचं कॉलेज पूर्ण झालं होतं. त्यामुळे आमचा दोघांचा फिरण्याचा वेळ अधिकच वाढत गेला. मी ऑफिस वरून सुटलो की, सरळ एकमेकांना भेटत असत. सुट्टीच्या वेळी तर ती वेळ वाढत असे.
एक दिवस ती माझ्या जवळ आली आणि म्हणाली, "मला मुलगा बघायला येणार आहे. मी काय करू. इतक्या लवकर मला लग्न नाही करायचे आहे. परंतु आई - बाबा ऐकत नाही आहेत."
मला काहीच सुचेना. मी म्हटलं," आई बाबांना सांग अजून थोडा वेळ मला द्या, मी अजून लग्नाला तयार नाही आहे."
" मी त्यांना खूप सांगितलं, पण ते ऐकायला तयार नाहीत."
मी विचारांच्या गर्दीत सापडलो. काय म्हणावे तेच सुचेना. माझी त्यावेळी आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे, माझ्या मनातले तिला सांगायला धीर होत नव्हता. विचार केला बिचारीला चांगल स्थळ मिळत असेल तर कशाला आपल्या मनातलं तिच्याशी बोलायचं. म्हणून गप्पच बसलो.
Read More : नुकतच लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरहून माहेरी येते | ए डिलाईट लाइफ
Read More : नुकतच लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरहून माहेरी येते | ए डिलाईट लाइफ
त्या दिवसी आम्ही दोघही त्या पेक्षा अधिक काहीच बोललो नाही. त्या नंतर चार दिवस आमची भेटच झाली नाही. एकदा एक फोन झाला होता बस...
पाचव्या दिवसी ती मला भेटायला आली आणि मला म्हणाली, " माझं लग्न ठरलं आहे. परवादिवसी मुलगा लग्न पक्क करायला येणार आहे." एवढ बोलून ती गप्प बसली आणि माझ्याजवळ येऊन बसली. त्या दिवसी ही मी मूक बधीर होऊन चूप बसलो आणि काहीही न बोलता तिथून घरी निघून आलो.
येताना लग्नाला ये इतकच ती म्हणाली. मी फक्त हो चा इशारा दिला.
तिथून आमची भेटच झाली नाही. दोन महिन्यांनी लग्नाचं कार्ड देण्यासाठी तीनं मला बोलवलं. ती मला भेटली.. पण संवाद काहीच झाला नाही. कार्ड देऊन ती निघून गेली.
तिच्या लग्नाची तारीख आली. लग्नाला जावे की नाही म्हणून मनात खूप काहूर माजले. परंतु मनाला आवरून तिच्या डोक्यावर अक्षता टाकायला लग्नाला हजेरी लावली.
त्या नंतर ती मला जवळ जवळ बारा वर्षापेक्षा अधिक काळ भेटलीच नाही. फोन तर कधीच झाला नाही. मी ही प्रत्येकाचा आयुष्याचा भाग म्हणून विनाकारण ती... ती.. करत बसलो नाही. मी करियर वर फोकस करायचे ठरवले.
आज अचानक ती भेटली. पण सोबत तिची आई आणि तिची एक मुलगी होती. एवढा काळ निघून गेल्यानंतर ही आम्ही दोघांनी एकमेकांना लांबूनच पटकन ओळखलं होतं. ती माझ्या जवळ आली. एकमेकांची विचारपूस झाली. थोड फार आयुष्याबद्दल. अधिक काही नाही. पाच मिनिटात आवरून घ्यावं लागलं, कारण तिच्या बरोबर तिची आई होती. मी ही अधिक वेळ न घेता तिचा निरोप घेतला. जाताना एकमेकांचा फोन नंबर पण घेतला नाही. मी ही काही न बोलता अबोल मनाने तिथून निघून आलो.