Anahat Marathi Kavita by Spruha Joshi

SD &  Admin
0

ध्याची नवोदित कवयित्री स्पृहा जोशी या कवितेची जन्मदात्री आहे. खूप छान आणि हृदयाला चटका देणारी कविता आहे. तुमच्या हृदयाला नक्कीच पाणी पाणी करेल यात काही शंका नाही.


माझी आवडती कवयित्री आहे. तिचे ब्लॉग मी नेहमीच बघत असतो. खूप छान पद्धतीने लोकांना सांगत असते. अशाच प्रकारे या कवितेत ही तिने छान पद्धतीने कवितेतून आपला भावर्थ आपल्यापुढे ठेवला आहे.

“अनाहत” या कवितेचं नाव आहे. कवितेच्या शब्दावरून कळते की, तिने ही कविता नक्कीच प्रियेशीच्या मनातून आपल्या प्रियकराला उद्देशून लिहिली आहे. प्रियेशीच्या प्रेमाचे अथांग सागराच्या लाटेप्रेमाने वर्णन केले आहे. याचे विश्लेषण कदाचित अनेकांचे वेगवेगळे असू शकते. परंतु सगळ्यांचा विचार करण्याचा भावार्थ हा एकच असणार आहे.

प्रेमिका आपल्या प्रियकराला समोर ठेवून म्हणते, आपल्या प्रेमाचे साक्षी असलेल्या हृदयाचे ठोके आज ही माझ्या कानात अनाहत प्रमाणे नाद करत आहे. ती पुढे अतूट प्रेमाचे उदहरण देत म्हणते, तू केलेले स्पर्श देखील आज कित्येक वर्षानु वर्ष तिच्या हृदयात साठलेले आहे. एकटे पणाचे दु:ख काय असते हे ही तिला आपल्या प्रियकराला दाखवून द्यायचे आहे. त्याच्या आठवणी आज तिच्या हृदयात धग बनून जाग्या झाल्या आहेत. तिला काहीच सुचत नाही आहे. तिचे ते प्रेम तिच्या प्रत्येक अवयामधून दिसून येत आहे. ती शेवटी म्हणते तू कसा काय माझ्या हृदयाचा भाग बनला आहेस. तू कसा काय माझा प्राण झाला आहे.             

एकदा ही कविता मनापासून वाचली की, स्वतः तुम्हाला या कवितेचा भावार्थ समजून येईल. वर म्हटल्याप्रमाणे अनेकांचे विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु भावार्थ हा एकच असणार आहे.

धन्यवाद कवयित्री स्पृहा जोशी.  

अनाहत मराठी कविता | कवयित्री स्पृहा जोशी | Anahat Marathi Kavita
Poem Content Credit to Poet Spruha Joshi 

अनाहत मराठी कविता अर्था सहित | कवयित्री स्पृहा जोशी यांची अनाहत कविता 

तुझ्या हृदयाचे ठोके
अजून ऐकू येतात माझ्या कानात
तो नाद.. अनाहत..
माझ्या मनात..

तुझ्या गळ्याशप्पथ
अजून आहेत जसेच्या तसे
तुझे स्पर्श,
तुझ्या गळ्याशप्पथ
अजून आहेत जशीच्या तशी
अबोलीची कोवळी वर्षं..

ता जाणवत नाही
ती फक्त
तुझी गरम ऊब !

रवरच्या शब्दांच्या पलीकडे
खोल डोळ्यांतून बोलायची
आसच संपवून टाकतो
तू नसतानाचा हा एकटेपणा,
वरवरच्या त्वचेच्या पलीकडे
खोल मनाची धगही
विझवून टाकतो
तू नसतानाचा हा एकटेपणा..

माझ्या आत तो
तरंगतो आहे
पिसासारखा..
आणि मी
जागच्या जागी
त्याच्या वजनाने थिजलेली..

ळलंच नाही केव्हा कधी कसा रुजून आलास असा प्राणात
तुझ्या हृदयाचे ठोके
अजून ऐकू येतात माझ्या कानात


                                                कवयित्री : स्पृहा जोशी
 

आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला अनाहत कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Anahat  poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!