चांगले विचार : तुमच्या आयुष्यातील चांगली कामे कोणती आहेत?

SD &  Admin
0


Delight Life
म्हणजे आनंदी जीवन जगण्यासाठी प्रत्येक माणूस धडपड करत असतो. असे जीवन काहींच्या नशिबी येते, तर उरलेले आपल्याला नशिबाला दोष देत कसबस जीवन जगत बसतात. 

माझ्या मते आनंदी जीवन जगण्यासाठी खूप काही अस कराव नाही लागत. फक्त 
आपल्याला सर्वप्रथम विचारांमध्ये परिवर्तन करावे लागेल. हे परिवर्तन वाईट गोष्टीकडून चांगल्या गोष्टीकडे मार्गस्थ होते.

खूप छान आणि साधा सरळ मार्ग आहे. परंतु आपल्याला आचरणात आणणे खूप कठीण आहे. मला येथे सांगावेसे वाटते, जे वाईट असते ना.. ते आपल्याला चांगले वाटते. परंतु तो अनुभव क्षणभंगुर असतो. आणि जे चांगले असते, ते आपल्याला कधी कधी त्रास देते, परंतु पुढे त्याचा अनुभव हा अत्यंत सुखदायक असतो.

म्हणून आयुष्यात खूप सुखी आणि निरोगी राहायचे असेल तर, आपल्या विचारांना आणि मनाला निरोगी ठेवावे लागेल. मग बघा तुमचे आयुष्य किती Delight Full होईल ते.    

आणि हे सर्व मिळविण्यासाठी आपल्या आयुष्यात 
चांगले विचार आणि चांगली कामे आचरणात आणणे गरजेचं आहे. हे जेव्हा तुम्ही मनापासून आचरणात आणाल, तेव्हाच तुम्ही एक चांगले जीवन जगू शकता. 

चांगले विचार : तुमच्या आयुष्यातील चांगली कामे कोणती आहेत? | Delight Life Style
Image Credit to Spruha Joshi 

सुखी जीवन (Delight Life) जगण्याची सुंदर सूत्रे 

Delight Life Style | Changale Vichar | चांगले विचार : आपल्या आयुष्यातील चांगली कामे कोणती आहेत? 

 १ > सुखी संपन्न आयुष्य जगण्यासाठी प्रथम आपल्याला दुसऱ्यांबद्दल जे वाईट विचार आहेत, ते आपल्याला सोडावे लागतील. हे जो पर्यंत आपण करत नाहीत, तो पर्यंत आपण एक चांगला माणूस म्हणून कधीच समाजात जगू  शकणार नाही.

२> धोका देणे हे सर्वात वाईट सवय आहे. ही सवय माणसाला खूप कष्टदायक पिडा देते. आपल्याला मदत करणारे असोत किंवा नसोत, आपल्याला मात्र सतत त्यांच्याशी प्रामाणिक असायला हवे. पुढे त्याचे फळ नक्कीच तुम्हाला चांगले भेटेल.

३> दुसऱ्या स्त्रीबद्दल वाईट विचार करणे. सतत सुंदर स्त्रियांबद्दल व्यभिचार मनात येणे. यात आपणच आपली पुण्यशक्ती,मानसिक आणि शारीरिक शक्ती वाया घालवत असतो. हे सर्व करत असताना आपण सतत दु:खी आणि वाईट विचारामध्ये गुंग असतो. अशा विचारांपासून खूप दूर असावे. 

4> कधीही चुकीच्या कामापासून दूर राहणे. जेवढ होईल तितके वाईट गोष्टीपासून दूर राहणेच योग्य राहील. नको त्या गुंत्यात पडण्यापेक्षा सर्वापासून अलिप्त राहिलेले बरे.

५> वाईट विचार करणाऱ्या लोकांपासून, मित्रांपासून आणि वेळ आली तर आपल्या सग्या- सोयाऱ्यापासून दूर राहणे कधीही चांगलेच राहील.

६>  गरजू लोकांना आपल्याकडून जेवढी मदत होईल  तेवढी करण्यास पुढे यावे. असे केल्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

७> सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून, जेवढं  शक्य होईल तितकं, देश हिताच काम करण्यास पुढे आले पाहिजे.

८> सतत सकारात्मक विचार केला पाहिजे. असे केल्याने येणाऱ्या दुःखाचा भार कमी होण्यास मदत होते.

९> सोशल मिडीयाचा वापर मर्यादेत करून, जेवढी गरज आहेत, तितकाच करावा. सोशल मिडीयाचा अति वापर तुम्हाला आळशी आणि रोगी बनवू शकतो.

१०> दररोज शारीरक व्यायाम केला पाहिजे. बरोबर योगासने आणि ध्यान करणे गरजेच आहे.

११> मोबाईल आणि टीवीत व्यस्त राहण्यापेक्षा, मैदानी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे.

१२> सध्यास्थिती मध्ये सगळीकडे हिंसा, भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो. परंतु आपण या सगळ्यांपासून अलिप्त राहून सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

१३> या सगळ्या विधी जेव्हा आपण मनापासून करतो, तेव्हा स्वत: आपल्याकडून ईश्वराचे चिंतन करण्यास गोडी लागते. ल 

वरील सर्व सूत्रे आपल्या आयुष्यात असणे खूप आवश्यक आहे. एक सुंदर आणि निरोगी लाइफ स्टाईल  जीवन जगण्यासाठी, इथूनच आपल्याला सुरवात करावी लागेल. 

माझे शब्द

आजच्या कलियुगात चांगले विचार करणारी माणस कमीच भेटतील. प्रत्येकजण उपभोगाच्या पाठीमागे आहे. कुणालाही आंतरिक सुख नको आहे. बाहेरील सुखाला सर्वकाही मानणारा हा वर्ग आहे. तरीही तुम्ही सकारात्मक उर्जेवर विश्वास ठेवून चांगले विचार करायला आणि वागायला शिकले पाहिजे. पुढील भविष्य आपले सुखाचे आणि समृद्धीचे होईल


Read More Post: 

आठवणीतल्या सरी : मनातले चांदणे       

महाभारतकालीन राजकन्या जिला तिच्याच पित्याने वेश्या होण्यास भाग पाडले

अचानक ती भेटली | माझे पान | Maze Pan | Delight Life

महिला दिवस २०२३ : ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस का साजरा केला जातो ?

    

                        

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!