Kana Marathi Poem by Poet Kusumagraj

SD &  Admin
0


णा
कविता ही जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे. खूप छान आहे. मला तर खूपच आवडली आहे. कदाचित ही कविता वाचताना काहींच्या डोळ्यातून पाणी नक्कीच येईल. खर तर, या कवितेचं महत्व, ज्या लोकांची घरे, पुरामध्ये, अतिवृष्टीमुळे वाहून गेली आहेत, सर्व काही नष्ट झालं आहे. अंगावरच्या कपड्याव्यतिरिक्त काहीच उरलेलं नाही. अशा व्यक्तींना एकदा विचारून बघा.

कवी  कुसुमाग्रज यांनी खरच.. खूपच छान पद्धतीने आपल्या लेखीनीच्या मदतीने पावसाच्या भयानक रुपाला बळी पडलेल्या व्यक्तीच्या मनाचा आदर करत, सगळ्या लोकांसमोर मांडलेली आहे.

कुसुमाग्रज लिहितात, एका व्यक्तीच घर पावसामुळे वाहून गेलं आहे. होत्याचं नव्हतं झालेलं आहे. घरात जे काही होतं ते सगळे वाहून गेल आहे. आता 
त्याच्या हातात काहीच उरलेलं नाही आहे. पै पै साठवून उभा केलेला संसार क्षणात या पावसाच्या रूपाने आलेल्या बाईने माहेरवशिन जशी माहेर आली की, घरात इकडून तिकडे नाचत बसते, तसी ही बाई नाचून गेली आहे. अशी मस्त उपमा लेखक देत आहे. यात फक्त त्याची बायको मात्र वाचली, हे त्याच्या साठी सौभाग्य होतं.

ही सुद्धा कविता वाचा : द्वारका मराठी कविता | Dwarka Marathi Kavita | Prabha Ganorkar 


परंतु एवढ असताना ही, ही व्यक्ती मनाने बिलकुल खचली नाही आहे. पुन्हा एकदा जोमाने आपला मोडलेला संसार उभा करण्यास तयार राहतो. आणि तो आपल्या बायकोला सोबत घेवून, तयारीला ही सुरुवात करतो. हे करत असताना काही उदार माणसं त्याला मदत करण्यास पुढे येतात, परंतु आत्मविश्वासाने मजबूत असलेल्या या व्यक्तीने क्षणभंगुर मदतीपेक्षा त्यांच्याकडून पैसापेक्षा पाठीवर मायेचा आधार आणि लढण्यास पाठीवर हात ठेवा, एवढच पुरेसं म्हणून त्यांना सांगत होता.

मस्त.. कवितेची सुरुवात आणि अस्त. खूपच छान आहे. आणि ज्या व्यक्तीची ही रूपरेखा आहे, त्या व्यक्तीचं कौतुक ही खूप वाटतं. सगळे काही नष्ट होऊन ही, पुन्हा ते स्वयं कष्टाच्या बळावर मिळविण्याचा तो आत्मविश्वास, खरच.. अशी व्यक्ती सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे.


 एकदा ही कविता आवर्जून वाचा. खूपच मस्त आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. 

कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj
Image Credit to Poet Kusumagraj 


कणा कविता (Kana)| Kusumagraj | Marathi Kavita | Delight Life | Best Poems
                                                 

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन
गंगामाई पाहुणी, आली गेली घरटयात राहुन.

माहेरवाशिण पोरीसारखी चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको माञ वाचली.

भिंत खचली चूल वीझली, होते नव्हते नेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमधे पाणी माञ ठेवले.

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बान्धतो आहे, चिखल गाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, नुसते लढ म्हणा!


                                                    _कुसुमाग्रज


  कुसुमाग्रजंच्या कविता रसिक मनावर अधिराज्य करत असतात. अशीच ही कविता आहे.



पृथ्वीचे प्रेम गीत | Pruthviche Premgeet | Kusumagraj | Marathi Kavita 
     


युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना

व्हाळीतले ना उमाळे उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

री अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ

री दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

ळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

मे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

मर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

 
                - कुसुमाग्रज (वि.वा शिरवाडकर / विष्णू वामन शिरवाडकर )

आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला कणा कवितेचा कंटेंट कवी कुसुमाग्रज यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Kana poem published in this blog is by Poet Kusumagraj. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem

 



          

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!