कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ही सुंदर कविता. मूलतः खानदेशी असलेल्या बहिणाबाईणी आपल्या अहिराणी भाषेचा सन्मान करत फार सुंदर पद्धतीने कविता मांडली आहे.
खरं तर, बहिणाबाई या शिकलेल्या नव्हत्या. तरीही त्या हृदयाला ही रडवेल अशा कविता करायच्या. पुढे आचार्य अत्रेणी त्यांच्या या कविता समाजापुढे आणून समाजाला कृत्यकृत केले.
बहिणाबाई या कवितेत मनाचे सामर्थ्य किती आहे याचे वर्णन करत आहेत. ज्या मनावर वैज्ञानिक गेली कित्येक शतके संशोधन करत आहेत, त्या मनावर या कवयित्रीने, कधीच शाळेत गेलेली नसताना ही, साध्या सोप्या पद्धीने मनाचे सामर्थ्याचे वर्णन केले आहे. यातून तिचे विचार करण्याचे कौशल्य किती महान होते, हे आपल्याला दिसून येते.
त्या सुरुवातीला म्हणतात, मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर. मन किती चंचल आहे ते बघाना, त्याला किती ही हाकला ते पुन्हा तिथेच येऊन ठेपते. त्यांनी येते पिकाला खायला येणाऱ्या ढोर म्हणजे जनावरांची उपमा दिली आहे. ती म्हणते या जनावरांना किती ही हाकला, ते पुन्हा ते खायला येतात.
अशा मनाला किती ही आवरण्याचा प्रयत्न केला तरी, तुम्ही त्याला आवरू शकणार नाही. ते सतत वाऱ्याप्रमाणे दौडत असते. पुढे त्या म्हणतात, जर माणसाला साप चावला तर त्यावरती उतारा आहे. पण मनावर कोणताच उतारा नाही आहे. मन किती चपळ आहे, हे सांगताना म्हणते, त्याला अजिबात स्थिर राहता येत नाही. क्षणात ते धरतीला चक्कर मारून येते. पुढे त्या म्हणतात, उडत्या पाखरा प्रमाणे ते इथे असते, तर क्षणात ते आकाशात कधी भरारी घेऊन येते, ते ही सांगता येणार नाही.
पुढे त्या देवाला ही विणतात, म्हणतात, हे देवा कसं काय तू या मनाला निर्माण केलस. खूप मला आश्चर्य वाटत आहे. तुझा खूप हेवा वाटत आहे. तू खूप मोठा योगी आणि निर्माता आहेस.
मन वढाय वढाय कवियित्री बहिणाबाई यांची कविता | Man Vadhay Vadhay Poem
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे
इचू साप बरा, त्याले उतारे मंतर
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं
कवयित्री : बहिणाबाई चौधरी
कवयित्री : बहिणाबाई चौधरी
आभार आणि क्रेडीट
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला मन वढाय वढाय कवितेचा कंटेंट कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Man Vadhay Vadhay poem published in this blog is by Poet Bahinabai Choudhari. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem