नुकतच लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरहून माहेरी येते | ए डिलाईट लाइफ

SD &  Admin
0

नुकतच लग्न झालेली मुलगी जेव्हा सासरहून माहेरी येते


सं म्हणतात पुरुषांपेक्षा स्त्री मध्ये सहनशीलता अधिक असते. आणि ते बरोबर आहे. याची प्रचीती आपल्याला नव्या नवरीकडून नक्कीच मिळेल.

मुलगी जेव्हा वयात येते. तेव्हा बाप तिच्यासाठी जोडीदार निवडण्यास सुरुवात करतो. आणि खूप निवडा निवड आणि विचारविनिमय करून अखेर तो तिला मुलगा शोधून आणतो. मुलगी लग्नाला तयार होते आणि आपल्या सासरी निघून जाते.

इथून खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाला सुरुवात होते. बंधन आणि जबाबदारी तिच्या भोवती कायमच्या येऊन उभ्या राहतात. परंतु येथे पण आपल्या आयुष्याचा भाग समजून, त्यांना आपलं मानते आणि संसारात व्यस्त होते.

इकडे जेव्हा मुलगी आपल्या बापाच्या घरी होती, तेव्हा तिला कशाचे ही बंधन नव्हते. तिला घरात कोणी बोलणारं  ही नसते. बापाची परी एवढी लाडकी असते की, नुसत पोरीच्या डोळ्यातून पाणी आलं तर, बाप अगदी तिच्या वर जीव ओवाळून टाकत असतो. तिला काय कमी पडलं म्हणून स्व:तलाच त्रास देतो. तिच्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी तो काहीही करण्यास तयार होतो. तिच्या खाण्या - पिण्या, कपड्यापासुन ते तिच्या सौंदर्य प्रसांदनापर्यंत प्रत्येक हट्ट पुरवत असतो. तिला कोणी दुखावलं तर बाप अगदी उग्र रूप घेतो आणि तिच्या सोबत उभा राहतो. अशी ही मुलगी जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा बापाची आणि तिची अवस्था काय होत असेल. कदाचित याची पिडा फक्त या दोघांनाच माहित असते.

हा ब्लॉग वाचा : कोकणातील मातीची घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण

अशा या सासरवसनीला जेव्हा माहेरवरून बुलावा येतो, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. काय करावे आणि काय नाही असे तिला होऊन जाते. तिच्या डोळ्यात अश्रू येऊन जातात. तिला सगळ्यांची आठवून येऊन जाते. आई बाबा, छोटा भाऊ, छोटी बहिण घरातील अन्य सदस्य यांच्या आठवणीने कासावीस होते. आज तिचा दिवस संपता संपत नव्हता. प्रत्येक क्षण ती स्वप्नातच दडलेली होती. 

अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन ती 
आपल्या माहेरला जाण्यास निघते. माहेर कडे जाणारा रस्ता आज काही केल्या संपतच नव्हता, असं तिला वाटत होतं. शेवटी तिची इच्छा पूर्ण झाली आणि एकदाची ती माहेरी घरात येऊन ठेपते. घरी येताच आई-बाबांना घट्ट मिठी मारते. त्यांच्या कुशीत अश्रूंना वाट देते. आपल्या लहान भावंडाना आपल्या कुशीत घेते. घरात ती सैरावरा धावत सुटते. घरातल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करून न्याहाळत बसते. तिने बागेत लावलेल्या फुलांना न्याहाळत त्यांच्याशी जणू काही बोलतच बसते. हे सगलं तिचे आई बाबा पाहत असतात. परंतु ते तिला न थांबवता तिला काय करायचे ते करू दे, म्हणून एका बाजूला उभे राहून तिला आनंदने बघत बसतात. आज तिचे लहान भांवड देखील तिला त्रास देत नाही. खूप दिवसांनी आलेली ताई आपली, तिला कोणताही त्रास होऊ नये म्हणून, ते ही एका बाजूला उभे राहतात.

घरातल्यांशी मिलन झाल्यानंतर, ती आपल्या शेजारी पाजाऱ्यांना धावत भेटायला जाते. त्यांची विचारपूस करते. मायेच्या गोष्टी होतात. यावेळी अश्रू थांबत नव्हते. अशा वेळी तिच्या बालमैत्रिणी कुठे लांब राहणार आहेत. गावात ती आपल्या मैत्रिणींना भेटण्यास धावत जाते. त्यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडते. तिच्या मैत्रिणी ही रडू लागतात. बालपानासून एकत्र जगलेलं आयुष्य, अचानक अंतर पडल्यामुळे दोघींनाही विरह सहन होईना. मग रडता रडता सगळ्या गप्पा गोष्टी होतात. बालपणीच्या आठवणींना उजाळा निघतो. दोघीही त्यात डुबून जातात. 

सगळ्याशी मिलन झाल्यावर ती घरी येते. पुन्हा आपल्या आई बाबाच्या, भावंडाच्या प्रेमात बुडून जाते. आजचा दिवस कधी संपून गेला हे तिलाच समजले नाही. आज रात्री जेवण आईने बनवले होते. आज तिने काहीच काम केले नव्हते. आज ती आईने बनवलेलं जेवण जेवणार होती. आईने ही तिच्या साठी गोड जेवण बनवलं होतं. सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. खूप गप्पा गोष्टी झाल्या. रात्री आईच्या कुशीत तिला अशी निवांत झोप लागली, की तिला 
कधी सकाळ झाली आहे, हेच समजलंच नाही. 

खरच... मुलगी ही आई-बाबांच्या छत्रछाये खालीच सुरक्षित वाढत असते. आणि ती इथेच जास्त सुखी आणि आनंदी जगते. इथेच तिला हक्काची आणि मायेची माणसं भेटतात.     

माझे शब्द

कोकणात लहानपणी मला आलेले हे अनुभव. फार भावनिक आणि परिवर्तनशील तो क्षण असतो. लहान असताना आई-बाबांच्या छत्रछाये खाली वाढलेली मुलगी, कधी लग्नाच वय येते हेच मुळात समजलं नाही. लग्न होतं मुलगी सासरी जायला निघते. हा क्षण फक्त आणि फक्त त्या मुलीचे आई-बाबाच समजू शकतात आणि कोणी नाही. शेवटी निरोप तर द्यावाच लागतो. मुलगी सासरी गेल्यावर तिच्या आई-वडिलांच्या मनाची अवस्था खूप भावनिक होते. पण ते संभाळून घेतात.

परंतु त्यांना पुन्हा चाहूल लागते, ती म्हणजे मुलगी काही दिवस माहेरी परत येणार. तो क्षण त्यांचा खूप महत्वाचा असतो. मुलीलाही माहेरची ओढ लागलेली असते. आणि तो क्षण शेवटी येतोच......


Read More :

सुंदर आणि कलरफुल कोंकण | Beautiful and Colorful Konkan | कोकण फोटो कलेक्शन         

आनंदाचं झाड माझ्या अंगणी आहे | आनंदाने जीवन कसं जगावं

कोकणातील मातीची घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण





                                                                      

                     

           
     
     

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!