९० व्या दशकातील बालपण | Childhood in the 90s | माझा पहिला पावसाला | ब्लॉग - २

SD &  Admin
0


ला कुणी जर विचारलं, की या धरती वर स्वर्ग सुख कशात आहे? तर मी कशाचा ही विलंब न घेता, लगेच उत्तर देईन, खरं खुरं स्वर्ग सुख हे, मी अनुभवलेल्या बालपणात होते. आणि ते ही ९० व्या दशकातलं.

वाह! काय होते ते दिवस. आज नुसती आठवण झाली तरी, अंगावर आनंदाचे काटे येतात. मन आनंदाने फुलून जाते. काय करावे आणि काय नाही असे होऊन जाते. तुम्हाला कसे वाटते ते मला माहित नाही, परंतु माझं मात्र न चुकता असं होतं.

माझा जन्म हा ९० व्या दशकातला. आणि तो ही कोकणातला. हे तुम्हाला 
आज अभिमानाने सांगावेसे वाटते. खरं तर, ज्यांनी ज्यांनी ९० व्या दशकातलं बालपण अनुभलेलं आहे, त्यांचे देखील नक्कीच माझ्यासारखेच विचार असणार आहेत. आज दुरून असे प्रसंग आठवले की, मनाला नक्की काय होत आहे, हेच मुळात सांगता येणार नाही. बघाना... कधी कधी खूप आनंद होतो, तर कधी कधी बालपण दूर निघून गेलं म्हणून रडू देखील येते. आता या दोन्ही गोष्टींना काय म्हणावे बरे...

खरं तर, दोन्ही ही गोष्टी मनातल्या विहिरीत साठलेला आनंदाचा प्रवाहच आहे. या प्रवाहाला कशाचे ही बंधन नसते. मन जेथे जाईल तेथे वेगाने दौडत असते. काय सांगू.. असच असतं.. हो बालपण. खूप मजा असते. कसले काही बंधन नाही. कोणती जबाबदारी नाही. घर कामात मदत वैगरे जर मूड असेल तर.., नाही तर जा उडत म्हणून तिथून पळ काढण्यात एक नंबरच. काय म्हणावे या बालपणाला. एवढं सुंदर असते बालपण. कदाचित आनंदाच्या पलीकडे जाऊन म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही.

९० व्या दशकातील बालपण | Childhood in the 90s | माझा पहिला पावसाला

    
माझ्या वाचक परिवारास खूप खूप धन्यवाद. या माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला बालपणीच्या सुखद आनंदाची मेजवानी देणार आहे. ही सिरीज नक्कीच तुम्हाला आवडेल, अशी मला आशा आहे.

माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात पावसाळ्यापासून करणार आहे. पावसाला म्हणजे बालपणीचे नंदनवनच. मनावर कोणतेही ओझं नसणाऱ्या या फुलाला पावसाला जलमग्न करून टाकतो. ते फुल ही या पावसाशी खेळू लागते आणि मग सुरु होते पकडापकडी. वाह! काय मजा येते हो.. आज ही ते क्षण आठवले की, मन आठवणीने गहिवरून येते.

पावसाचे आगमन आणि जून महिन्यातील शाळेची शुरुवात हा मेल कोणी जुळवला ते माहित नाही, पण आम्ही बच्चे कंपनी मात्र त्यांचे आणि या वरूण राजाचे मनपासून खूप खूप आभार मानत असत. उन्हामुळे कोमेजून गेलेला जीव या वरूण राजाची आतुरतेने वाट पाहत असायचा आणि मी आजही त्याच पद्धतीने पाहत असतो. विजांचा कडकडाट स्रुरू झाला आणि काळ्या ढगांची चादर घेवून पावसाचे आगमन झाले की, हा रोमहर्षक क्षण अनुभवण्यासाठी आम्हीच नाही तर, धरतीवरचा प्रत्येक जीव आतुरतेने वाट पाहत असतो. आम्हा बच्चे कंपनीचा तर उत्सवच असतो या वेळी. माझे तर पावसाशी एक विशेष नात आहे, कधी ही न तुटणार. प्रत्येक पावसाला मी आतुरतेने वाट पाहत असतो. आणि हा पाऊस मला प्रत्येकवेळी काही ना काही देवूनच जात असायचा, आज ही देतो. खूप ऋण आहे त्याचं माझ्यावर.

Read More: बालपणीच्या आठवणी | ९० व्या दशकातील बालपणीच्या आठवणी | Childhood Memories in marathi

धरतीवर पडलेला पहिला पाऊस आमच्या बच्चे कंपनीचा आनंदाचे झाडाचा उगमच असायचा. या पावसात भिजण्याचा आनंद घेताना, पाठीवर आईचा मार पडत आहे, याचे देखील भान नसायचे. तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात मला आईचा खूप मार खावा लागायचा. कारण माझ्या पावसाळ्यात खूप करामती होत असायच्या. करामती कधी कधी दुखापतीला कारण बनायच्या. अशा वेळी आई मला नाइलाजाने काठीच्या किंवा हाताच्या फटक्याने माझ्या पाठीची पीठाई करायची. अशा वेळी मी पावसात अशी काय धूम ठोकायचा की, मी आईच्या हातातून गायब होऊन इकडे तिकडे पावसात पळत बसायचा. मग कधी कधी आईला पण राग येयाचा. मग ती पण माझ्या पाठीमागे लागायची. मला मात्र खूप आनंद होत असायचा. अशा वेळी तिच्या हातात आलो की, मार बसायचा, पण त्यानंतर लाड पण खूप होत असयाचे. आणि मला हेच पाहिजे असायचे.

तुम्हाला माहित आहे, पहिल्या पावसाची सर जेव्हा मातीत मिसळते ना.. तेव्हा त्या मातीचा सुगंध एवढा मनमोहक वाटतो की, ती खावीसी वाटते. आमचं त्यावेळी असच होत असायचा. मी तर.. कधी कधी माती नाका जवळ घेऊन सुंगत असायचा. तुम्हाला सांगतो, आज ही त्या मातीचा सुगंध माझ्या नाकावाटे दरवळत असतो. मी आणि माझे सवंगडी या मनमोहक सुगंधाचा आस्वाद घेत, त्या मातीत बागडत असत. यावेळी आम्हाला कशाचेही भान नसायचे. शरीराबरोबर मन ही बेभान झालेले असायचे. आज तर या नुसत्या विचाराने देखील अंग शहारते.

प्रत्येक अनुभव हा वेगळाच होता. आज ही आठवत, त्या धो धो पडणाऱ्या पावसात मी आणि माझे सवंगडी आकाशातून पडणाऱ्या गारा गोळा करताना, आमची अशी धावपळ होत असायची ना.. याचं शब्दात वर्णनच करता येणार नाही. एक मुल गारा निवडताना बघितलं की, सगळेच गारा गोळा करायला धावत असत. मग आमची शर्यत लागायची ती, कोण किती गारा निवडतं ते.

कसं सांगू तुम्हाला, खूप असे प्रसंग आहेत, त्यांनी आम्हाला बालपणात आनंद दिला. आमच आयुष्य सुखाचं केल होतं. प्रत्येक प्रसंगाची एक वेगळीच वैशिष्ट्ये होती. त्यामुळे आनंद हा मनाला सुखावून सोडायचा. त्यामध्ये हा खेळ आम्हाला खूप आवडायचा, तो म्हणजे पावसाच्या पाण्याने भरलेल्या डबक्यात कागदी होड्या सोडणे. इथे पण आमची सगळ्यांशी शर्यती होत असायच्या. प्रत्येकजण आपली होडी पुढे कशी जाईल म्हणून आपल्यातच मग्न असायचा. एक मात्र इथे सांगू इच्छितो, आमच्या शर्यती नक्कीच होत असायच्या, पण येथे घातक स्पर्धा नव्हती. आम्ही सगळे आमच्या आनंदासाठीच खेळायचे.

तसे म्हटले तर पावसाळ्यातील खेळाची लिस्ट आमची खूपच होती. प्रत्येक खेळ हा आमच्या हृदयाशी जोडलेला होता. आणि आज त्यांच्या आठवणींनी हृदय अगदी गहिवरून येते. मन अगदी आठवणींनी सुन्न होते. वाटतं गेलेले दिवस परत मिळावेत. पण आम्हाला ठाऊक आहे. गेलेले बालपण कधीच परत येणार नाही. हां... पण त्या आठवणी मात्र आपण मनात जागवून त्याचा आनंद घेऊ शकतो.            
                    

                                                                             

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!