पृथ्वीचे प्रेम गीत : प्रेम म्हणजे काय असते. प्रेमाची सीमा काय आहे, एखादी व्यक्ती कोणत्या सीमे पर्यंत प्रेम करू शकते, हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर, ही कविता नक्कीच एकदा वाचायला हवी. माझ्या आवडत्या कविता पैकी ही आहे.
कवी कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द काळजात आरपार घुसणारा आहे. या कवितेमध्ये ते पृथ्वीचे उदाहरण देत म्हणतात की, ही पृथ्वी आपल्या प्रियकराच्या म्हणजे भास्कराच्या(सूर्य) प्रेमात एवढी वेडी झाली आहे की, ती इतरांविषयी विचार ही करू शकत नाही. तिच्या प्रेमात अनेकजण पडले आहेत. आणि ते तिला प्रेम स्वीकारण्यास विचरणा करत आहेत. परंतु ही पृथ्वी आपल्या विचारावर, आपल्या मनावर स्थिर आहे.
ही सुद्धा मधुर कविता वाचा : कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj
या कवितेमध्ये कवीने पृथ्वीचे उदाहरण देत, एका स्त्रीची रुपेखा मांडलेली आहे. ही स्त्री आपल्या विचारांवर ठाम असणारी आहे. ही स्त्री प्रेमात नक्कीच पडलेली आहे, परंतु ती एकनिष्ठेने एकाच्याच प्रेमात प्रामाणिक आहे. ती आपल्या प्रियकराला विनविण्या करत आहे. कदाचित तिचा तो प्रियकर रुसलेला असावा, म्हणून ती विनविण्या करत असावी. यामध्ये ती त्याला सांगत आहे. मी तुझ्या शिवाय कुणाचाही विचार करू शकत नाही. मला आतापर्यंत अनेकजन प्रेमात पाडण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु मी कधीच त्यांचा विचार केला नाही. कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे.
पुढे ती आपल्या प्रियकराला मित्राची उपमा देत आहे. ती त्याची प्रेमात स्तुती करत आहे. त्याची थोरवी गात आहे. यात ती नुसती त्याच्या प्रेमात वेडी नाही आहे तर, ती त्याला कोणत्याही बंधनात न बांधता त्याला मित्राची उपमा देत आहे, त्याची गोडवी गात आहे.
ही कविता पूर्ण वाचल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की, या स्त्रीचे प्रेम किती पवित्र आणि स्थिर आहे. एकदा नक्कीच वाचा.. पृथ्वीचे प्रेम गीत मराठी कविता : कवी कुसुमाग्रज
पृथ्वीचे प्रेम गीत | Pruthviche Premgeet | Kusumagraj | Marathi Kavita | A Delight Life
- कुसुमाग्रज (वि.वा शिरवाडकर / विष्णू वामन शिरवाडकर )
आभार आणि क्रेडीट