सतत कुठे ना कुठे वृत्तपत्र किंवा इतर सोशल मिडीयाच्या माध्यमांतून अपघाती मृत्यू झाल्याचे आपण वाचत असतो. वाचत असताना आपल्याला खूप दु:ख होतं. मृत झालेल्या व्यक्तीबद्दल आपण खूप हलहल व्यक्त करतो. त्याच्याबद्दल सतत विचार करत बसतो. त्याच्या कुटुंबाचीही आपल्याला आठवण येऊन जाते. दु:खाची झळ काय असते याचे आपण मनातून वर्णन करतो असतो.
परंतु याहून पुढे जाऊन कित्येक जणांना एक प्रश्न नक्क्कीच पडला असणार की, या अपघातात चुकी कोणाची? एवढा भयानक हादसा झालाच कसा? याला जबाबदार कोण? याला कोणी थांबवू शकत नाही का? असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला पडतात.
एक मनुष्य म्हणून आपल्याला असे प्रश्न पडणे साहजिकच आहे. परंतु असे अपघात होतातच का? यावर कोणी सहजा विचार करत नाहीत. असे अपघात होऊ नये म्हणून कोणी पूर्णतः प्रयत्नही करत नाहीत. काही ठराविक लोकं याचा विचार करतात, परंतु हाताच्या बोटावर लोकांनी विचार करून जगाला बदलू शकत नाही. यासाठी प्रत्येकाने बदलायला हवे. अपघात होऊ नये म्हणून गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. परंतु काय सांगावे या माणसाला, सगलं काही त्याचं क्षणभंगुर वेळापुरतच असतं. म्हणजेच थोड्यावेळापुरत.. काहीसं तास-एखादा दिवस चांगला विचार केला की, पुढे सगलं विसरून पुढल्या दिवसाची वाट बघत बसतो.
नक्कीच अशा गंभीर विषयावर गप्प बसने आपल्या येणाऱ्या पिढीला धोक्याची घंटा आहे. अपघातात निष्पाप माणसाचा जीव जातो. आपण तेवढ्यापुरतच बोंबा मारतो. सोशल मिडीयावर कमेंट्स करतो आणि तासाभरानं आपल्या कामाला लागतो. त्या मेलेल्या जीवाचे संस्कार झाले की, विषय तिथेच संपला जातो. जसे काही घडेलच नाही.
माझ्या मित्रानो विषय इथे संपत नाही आहे. एकदा आपल्या अंतर्मानला विचारून बघा, नेमकं हे दु:ख किती मोठ आहे. बाळ जन्माला येतं. आई वडील खूप आनंदी होतात. मुलाला वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतात. आपलं सगलं आयुष्य खर्ची करतात. आई वडील आपल्या भविष्याबद्दल खूप स्वप्न रंगवतात. तो मुलगा \ मुलगी मोठे होतात. शिकून चांगल्या नोकरीला लागतात. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू लागतात. आणि एके दिवशी एका बुद्धीने अशिश्क्षित ड्रायवरच्या चुकीमुळे त्या मुलाचा अपघाती मृत्यू होतो. सगलं काही क्षणात नष्ट होतं. आईवडिलांचा हंबरडा ऐकून दगडाला ही पाझर फुटेल एवढा तो भयानक क्षण असतो. घर क्षणात उध्वस्त झालेले असते. आनंदाची पहाट आता त्यांच्या जीवनात कधीच येणार नसते. काय करावं त्या आई वडिलांनी.
एवढ सगलं झालं, आता सांगा यात चुकी कोणाची? वर्षानु वर्ष रोपाला पाणी घालून मोठ केलेलं झाड. अचानक कोणी तोडून नेल, तर मालकाला किती दु:ख होत याची मोजमाप करता येईल का? मग हा प्रश्न माणसाच्या जीवनाशी निगडीत असूनही, आपण सगळे कसे काय गप्प बसू शकतो?
आता वेळ आली आहे, जागे होण्याची आणि जे निष्काळजी पणे वाहने चालवतात त्यांना कडक दंड करण्याची. त्या शिवाय या लांडग्यांना वठणीवर आणता येणार नाही. आपला जीव खूप मोलाचा आहे. मृत्यू नंतर जीवन आहे किंवा नाही कोणालाच माहित नाही. परंतु आता जे जीवन आपल्याला मिळाले आहे, ते सुखाने- आनंदाने जगायला शिकले पाहिजे. आणि मुख्य आपल्याबरोबर इतरांना ही आनंदाने जगण्याचा अधिकार दिला पाहिजे.
प्रत्येकाने आतापासूनच गाडी सावकाश चालवून स्वतःचा जीव वाचावाच, बरोबर इतरांचाही जीव वाचवला पाहिजे. मित्रानों पुन्हा एकदा सांगतो, जीवन खूप अनमोल आहे. यासाठी स्वतःला जपले पाहिजे. स्वतःला जपाल, तेव्हाच दुसऱ्याच्या जीवाला किंमत द्याल.