कोंकण म्हणजे या धरतीवरचं स्वर्ग. आणि ते खरच आहे. येथील हवामानानुसार जर सुंदर दृश्य पहिली तर, डोळ्याबरोबर मन ही तृप्त होतं. वाटेल, येथून परत कधीच जाऊ नये. निसर्गाने नटलेल्या या प्रदेशाला निसर्ग देवतेच वरदानच आहे. येथे येणारा प्रत्येकजण स्तुती केल्याशिवाय कधीच परतणार नाही.
माझं अधिकांश वेळ हा कोंकणातल्या निसर्गाच्या कुशीतच जातो. जेव्हा जेव्हा शहर सोडून गावाला येतो, तेव्हा माणसाच्या गर्दीत अधिक वेळ न राहता सरळ सरळ निसर्गाच्या कुशीत जाऊन या धरती मातेच्या मायेच्या उबेचा आस्वाद घेण्यात मग्न होतो.
मला अधिकतर सकाळचं बहरदार क्षणाचा आस्वाद घेणे आणि संध्याकाळचं सूर्य अस्थाला गेलेला नयनरम्य दृश्य माझ्या मनाला अगदी तृप्त करून टाकतात. अशा वेळी माझे मन अगदी सैरावैरा पळत सुटते. निसर्गाच्या प्रत्येक निर्मितीचा आस्वाद घेण्यासाठी माझे मन अगदी ललाईत झालेले असते.
मनाला हूर हूर लागली की, हमकास मी गावाला प्रस्थान करतो. तसेच या ही वेळी सप्टेंबर संपता संपता गावात माझ्या पायाचे आगमन झाले. हिरव्यागार रंगाची साडी घातलेल्या या निसर्गाचे रूप बघितल्यावर माझे मन इकडून तिकडे दौडू लागले. वातावरणातील ते सकारात्मक चैतन्य अगदी शरीराला, मनाला आणि आत्म्याला उल्हासित करत आहे असं वाटतं. खरच एक वेगळीच मजा वाटत असते. वाटतं इथून परत कधीच शहरात जावू नये. परंतु म्हणतात ना.. काहीतरी मिळवण्यासाठी काही तरी गमवाव लागतं.
मी गावाला आल्यानंतर अधिकांश वेळ हा निसर्गाच्या कुशीतच घालवतो. तसेच आज ही संध्याकाळचे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी मी आणि माझे सवंगडी घराच्या बाजूला असलेल्या डोंगरावर निसर्गाचे मनमोहक दृश्य टिपण्यासाठी प्रस्थान केलं. खरच.. सायंकाळी सूर्य जेव्हा अस्थाला येतो ना.. तेव्हा त्याचे रूप एवढे सुंदर आणि शीतल असते ना... बघताना अगदी जीवन सार्थक झाले असे वाटते.

पाहूया काही सुंदर आणि मनमोहक दृश्य जी माझ्या हृदयाला आनंद देतात. तुम्हाला ही नक्कीच ती आवडतील यात काही शंका नाही.
कोंकणातलं निसर्गाचं सकाळचं आणि सायंकाळचं मनमोहक दृश्य
खरच.. आपला निसर्ग हां खूपच सुंदर आणि दानवीर आहे. त्याने प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी दिली आहे. आपणच त्याच्याकडे कानाडोळा करतो. आणि मग दु:ख करत बसतो. मला वाटतं.., असं करू नका. एकदा निसर्गाच्या कुशीत येऊन बघा. खरच आयुष्य खूप सुंदर वाटेल.