ईश्वर काय आहे? कोणाला माहित आहे ईश्वराच अस्तित्व कशात आहे?

SD &  Admin
0


'ईश्वर' या एका शब्दामुळे आज जगात माणूस माणसांपासून दुरावला आहे. ईश्वराच्या नावाखाली जातीभेद आणि धर्मभेद एवढ्या स्थराला पोहोचला आहे की, असे म्हणावे लागेल कली युग संपून राक्षशी युग सुरु झाले आहे.

आज माणूस सहज देवाच्या नावाखाली दुसऱ्या माणसाची आणि मुक्या प्राण्यांची हत्या करतो. आणि त्याला वाटते की, हे त्याने देवासाठी सगलं केलं. माझाच देव मोठा आणि बाकी सगळ्यांचे खोटे देव. मी असं केलं म्हणजे देव माझ्यावर प्रसन्न होईल, अशा काही तो भ्रमात असतो.

खरच.. असे हे सर्व बघितल्यावर वाटतं.. या धरतीवर जन्म नकोच. कधी कधी वाटतं.. ज्याला नर्क म्हणतात तो हाच नव्हे का? काही माहित नाही, परंतु आजची परिस्थिती बघता, वाटतं.. आपण नरकातच राहत आहोत. आज आपण जेथे राहत असतो, तेथे सतत भीतीच्या सावटाखाली राहत असतो. कोण कधी हा मनुष्य रुपी राक्षस येईल आणि होत्याच नव्हतं करेल हे सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो या जगात माणूस फक्त माणसालाच घाबरतो. बघाना.. रात्री अपरात्री आपण भूतांना कमी, परंतु गुंड, दरोडेखोर लोकांना अधिक घाबरतो. कारण आपल्याला माहित असते. भूत काही आपल्याला स्पर्श करणार नाही, परंतु हा मनुष्य रुपी राक्षस आपल्याला नक्कीच भयानक इजा पोहचवेल.

ईश्वर काय आहे?  कोणाला माहित आहे ईश्वराच अस्तित्व कशात आहे?

हे सगलं मनुष्य कोणासाठी करतो? माहित आहे. "ईश्वरासाठी/ देवासाठी" या मूर्ख निर्बुद्धी माणसाने देवालाच सगळ्यासाठी कारणीभूत ठरवले आहे. या मुर्खाने ईश्वरालाच जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली वाटले आहे. हा हिंदूचा देव, तो मुसलमानांचा देव, हा बुद्धाचा देव ई. काय म्हणावे या माणसाला, ईश्वराला विभागण्याचे काम या मुर्खाने आपल्याच विचाराने केले आहे. कोणाच काही मार्गदर्शन नाही. कोणाच काही ऐकायचं नाही. जे  मनाला पटतं ते करतो. मग त्यातून काहीही निष्पन्न होऊदे, त्याला त्याचे काही देण - घेण नसते.

हा लेख सुद्धा वाचा : आम्हाला जगण्याचा अधिकार द्याल का ? Why do some of us enjoy torturing animals?

खरच.. माणसाने ईश्वराला ओळखलं असतं ना.. तर या धरतीवर हिंसाचार झालाच नसता. हे या माणसाला कधी कळणार माहित नाही. आजच जीवन खरच नर्क म्हणायला चुकीचे ठरणार नाही. कधी कधी डोळ्यातून अश्रू वाहतात. आपण कोणत्या विश्वात जगत आहोत. ईश्वराला शोधण्यासाठी माणूस नको त्या मार्गाला लागला आहे. खरा मार्ग त्याला सापडलाच नाही आहे. आणि तो कधी त्याला सापडणारच नाही.

या सगळ्यांचा आढावा घेवून थोडक्यात ईश्वर म्हणजे काय आहे? त्याच अस्तित्व कशात आहे, हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्याला माझं म्हणण थोडं फार समजल तरी, मी स्वतःला नशीबवान समजेन.

ईश्वर काय आहे? ईश्वराच अस्तित्व कशात आहे?

'ईश्वर' समस्त ब्रम्हांडातील अविनाशी शक्ती. या शक्तीला ओळखणारे या धरतीवर फारच कमी आहे. आणि ज्यांनी ज्यांनी या शक्तीला ओळखलं ते भगवान बनले. आणि आज आपण त्यांची पूजा करत आहोत.

खरं तर, ईश्वर कधीच कोणाला भेटू शकत नाही. आपली किती ही इच्छा झाली तरी आपण त्याचं खर स्वरूप बघू शकणार नाही. आज पर्यंत अनेक महात्मे होऊन गेले, त्यांनी ईश्वर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाच ईश्वर भेटला नाही. याचा अर्थ असा होतो की, ईश्वर ही एक अशी शक्ती आहे, तिला आपण कधीच स्पर्श किंवा बघू शकणार नाही. मग प्रश्न असे उत्पन्न होतात की, ईश्वर काय आहे? त्याचं अस्तित्व काय आहे? आज पर्यंत ज्या ज्या लोकांनी, ग्रंथांनी आपल्याला ईश्वराची उदाहरणे दिली आहेत ती खोटी आहेत का?  मग एकुरूप ईश्वर म्हणजे काय आहे? आपण त्याला कधीच भेटू शकणार नाही? मग आमच्या विश्वासाचे काय? 

असे प्रश्न तुमच्या मनात येणे स्वाभाविक आहे. कारण आज पर्यंत तुम्हाला कोणीच असे प्रश्न किंवा  तुम्ही कधीच या बद्दल विचार केला नाही. कारण तुम्हाला देव हा फक्त दगडात, मूर्तीतच भेटतो. ज्या मार्गांनी ईश्वराचे अस्तित्वाचे दर्शन घडते, तो मार्ग आजपर्यंत कोणीच शोधला नाही. या धरतीवर जितकेपण धर्माचे लोकं राहतात, त्यांनी कधीच  ईश्वराकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध लावला नाही. शोध लागला तो फक्त दगडाचा, मूर्तीचा आणि धर्माच्या नावावर देवाला वाटण्याचा. जर या धरतीवर कोणी मूर्ख आणि बेअक्कल असेल, तो म्हणजे मनुष्य. स्वतः एक मातीची राख आहे. या धरतीवरचा पाहुणा आहे. तो या ईश्वराला जाती - धर्माच्या कचाट्यात वाटत बसतो. हा माझा देव, तो तुझा देव. असच बर काही. मग सांगा बर ईश्वराला तुम्ही कसे बघाल?

खरच.. जर माणसाने ईश्वराला थोडा तरी ओळखण्याचा प्रयत्न केला असताना, तर आज धरतीवर हिंसाचार, भ्रष्टाचार, व्यभिचार, जातीभेद, धर्मभेद कधीच दिसला नसता. कधी कधी लाज वाटते मनुष्य असल्याची, कारण विवेकबुद्धी असून ही आपण दुर्बुद्धी सारखे वागत असतो. राग, लोभ, तृष्णा सारखे भयानक अवगुणांना आपण असे काय चिटकून बसलो आहे की, ईश्वरालाच आपण विसरून गेलो आहे.

ईश्वर म्हणजे काय आहे? ईश्वर आपल्याला कशात भेटेल ?

खूप सुंदर प्रश्न आहे, परंतु यावरती कोणी गंभीरपणे विचार करत नाही. लाखो वर्षाचा इतिहास साक्षी आहे, तुम्ही कितीही पोती, पाठ-पठण करा, ईश्वर कोणालाही आजपर्यंत भेटला नाही. कितीही देवाच्या नावावर उधळआपट करा, ईश्वर तुम्हाला कधीच भेटणार नाही. देवासाठी बलिदान दिलत, तरी तुम्हाला ईश्वर भेटणार नाही. 

मग ईश्वर आपल्याला कशात भेटेल? माणसाचा जो विश्वास आहे, माझं ईश्वर चांगलच करेल. या अतूट विश्वासामध्ये जे सकारात्मक चैतन्य आहे ना... तेथे आपल्याला ईश्वर भेटेल. मुक्या प्राण्याला मृत्युच्या किंवा दु:खातून बाहेर काढल्यानंतर त्या प्राण्याच्या चेहऱ्यावर जो आनंदाचा भाव आणि विश्वास असतो ना.. त्या आनंदात आणि विश्वासात ईश्वर असतो. ज्या ज्या कृती - अकृती मध्ये सकारात्मक उर्जा असते, ती प्रत्येक जीवाला किंवा सृष्टीमधील प्रत्येक शक्तीला  नियंत्रित करत असते, तेथे ईश्वराचे अस्तित्व असते. सकारात्मक उर्जेने भरलेल्या नंदनवनात जी शीतलता आणि परमानंद मिळतो, त्यात ईश्वर सामावलेला असतो. कोणाच चांगलं होऊदे, हे जेव्हा तुम्ही निश्वार्थ पणे देवाकडे प्रार्थना करता, तेथे आपल्याला ईश्वर भेटेल. देव हा ना कोणत्या जाती - धर्मात आहे, ना मंदिरात, ना मश्जीद, ना चर्च ई. जागा मध्ये. येथे तुम्हाला देव नाही भेटत. येथे तुम्हाला शांती आणि सुखी होण्याचा विश्वास मिळतो. म्हणून तुम्ही मंदिरात जाता. आणि खर तर.. याचं विश्वासात ईश्वर असतो.

ईश्वराला एकठिकाणी कोणी बांधून ठेवू शकत नाही. मग तुम्ही त्याच्यासाठी सोन्याचे - हिऱ्याची जागा बसण्यासाठी दिली तरी तो तेथे बसणार नाही. ईश्वर तेथेच थांबतो, जेथे क्षमा, शांती, अहिंसा, प्रेम, विश्वास भरभरून असतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही या गोष्टी बघाल तेथे तुम्ही वास करा, तेथेच तुम्हाला ईश्वर भेटेल. तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. 

खरच खूप साधा सरळ मार्ग आहे हो.. ईश्वराकडे जाण्याचा. आपणच तो कठीण केला आहे. जाती धर्मात आपण एवढे अडकून गेलो आहे की, ईश्वराचे अस्तित्वच विसरून गेलो आहोत. मुक्या जिवांच बलिदान देऊन स्वतः ईश्वर प्राप्ती साठी आपण प्रयत्न करतो. खरच, यापेक्षा या धरतीवर मूर्ख आणि राक्षस कोणी नसेल. कोणता मायबाप आपल्या मुलांना कापून मांगेल. एवढ ही समजत नाही या माणसाला. ईश्वर ही अशी अविनाशी उर्जा आहे ती प्रत्येक जीवात, चराचरात, कणा-कणात विद्यमान आहे. तीच उर्जा प्रत्येकाला संचालित आणि नियंत्रित करत असते. म्हणजे तो आपला माय-बाप आहे . मग तो कसा काय आपल्या मुलाचं मांस ग्रहण करेल? मूर्ख लोग... सगलं काही सत्य समोरा समोर उघड असतना, काही माहित नसल्याचा भाव आणतो.

एकदा शांत डोक्याने विचार करा आणि सत्याचा मार्ग जवळ करा. तिथेच आपल्याला ईश्वराचं सानिध्या अनुभवायला मिळणार आहे. जाती - धर्मात न अडकता, एकच मानवता धर्माचं पालन करा. ईश्वरावर विश्वास ठेवा आणि जीवन व्यतीत करा. सुख - आनंद आपल्या जवळच असतो.   

        



 










 

             
      

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!