आज काहीच सुचत नव्हतं. मनात खूप राग उत्पन्न झाला होता. काय करू आणि न करू असं झालं होतं. तसं म्हटलं तर, एवढा मला कधी राग येत नाही, परंतु कधी कधी अशी वेळ येते तेव्हा, योगी, संत देखील श्राप द्यायला मागे पुढे बघत नाहीत. मग आम्ही तर साधी माणसं आहोत.
जास्त तुम्हाला शब्दाच्या कोड्यात नाही फिरवत, थेट मुद्यावरच येतो. आजच्या काळातील सध्याची परिथिती पाहता, या मुक्या प्राण्यांचे जीवन बघितल्यावर डोळ्यातून अश्रूच्या धाराच वाहतात. एक मर्यादा असते. परंतु परिस्थिती पाहता माणसाला या मुक्या प्राण्याचे काहीच देणं घेणं नाही असे वाटते. आणि ते खरच आहे. येथे या माणसाला राक्षसाची उपमा दिली तर चुकीचे ठरणार नाही. जर तुम्ही या जगातले सर्वात जे काही वाईट आणि क्रूर असेल, ती जर याला उपमा दिली तरी ही सर्वात योग्यच ठरेल.
मी म्हणतो मुळात माणसाला या मुक्या प्राण्यांना त्रास देण्याच्या आणि त्यांना मारण्याचा अधिकारच कोणी दिला? एवढा बुद्धीचा आणि ताकदीचा ह्याला माज कशाला. करोड वर्ष लोटली. एवढी प्रगती झाली. परंतु या बिचाऱ्या मुक्या प्राण्याच्या नशिबी मात्र सुख आलं नाही. कधी ना कधी मृत्यूची तलवार ही त्यांच्या मानेवर पडणारच आहे. आणि हे बिचारे जन्मत: लिहूनच येतात. आणि हे सर्व कोणामुळे, तर या मूर्ख माणसामुळे.
मी सर्वत्र बघत असतो. मनुष्य विनाकारण या प्राण्यांना त्रास देत असतो. काही लोकं तर त्यांना मजा वाटते म्हणून या बिचाऱ्यांना त्रास देत असतात. या मूर्खाना आपण त्यांना का मारत आहोत? त्यातून काही मिळणार आहे का? याचे काहीही देणं घेणं नसतं, फक्त मजा वाटते म्हणून यांना त्रास द्यायचा.
जर तुम्हाला येथे माहित नसेल तर, सांगतो हे बिचारे मुके प्राणी आहेत ना.. ते तुमच्या कडे फक्त प्रेमाने बघतात हो.. त्यांना फक्त तुमच्याकडून प्रेमच पाहिजे असते. ते कधीच तुम्हाला त्रास देत नाहीत. हे तेव्हाच रागवतात जेव्हा त्यांना मृत्यूची किंवा वेदनेची चाहूल लागते. अन्यथा हे बिचारे साध सरळ आपल जीवन जगत असतात.
आपल्या सर्वाना सांगू इच्छितो की, एकदा या प्राण्यांवर प्रेम करून बघा. मग बघा, ते तुमच्यासाठी प्राण पण द्यायला तयार होतील. या प्राण्यांना भिक नको आहे. प्रेमाचे भुकेले आहेत ते. येथे महत्वाचं सांगू इच्छितो, वेदना या जशा आपल्याला होतात, तसेच या मुक्या प्राण्यांना ही होतात. त्यांना ही दु:ख होतं. वेदना होतात. ते ही रडतात.
एक सुंदर आणि आपल्या सर्वांना विचार करायला लावणारं सत्य आहे," येथे जन्म घेणारा प्रत्येक जीव येताना मृत्यूला सोबत घेवूनच येतो. मग मी म्हणतो माणसाला येवढा माज कशाला. प्रेम, वेदना या जशा आपल्याला होतात तसेच या मुक्या प्राण्यांना ही होतात. येथे थोडं वेगळं आहे ते शरीर. पण शरीर तर नश्वर आहे, ते कधी ना कधी मृत होणारच आहे, मग ते शरीर माणसाचे असो किंवा इतर प्राण्यांचे. खरच प्रत्येक माणसाने नक्कीच विचार करायला हवा आहे."
एकदा स्वतःला बदलून माणूस म्हणून जगायला शिकले पाहिजे. आणि ईश्वराने आपल्याला जी जबाबदारी दिली आहे, ती न्यायपूर्वक आणि प्रेमपूर्वक पार पाडली पाहिजे.
Read More :
जात्याची आठवणींतील माहिती : जातं म्हणजे पावित्र, जातं म्हणजे घराची शोभा
आपल्या पाळीव प्राण्याशी नातं कसं असावं ? How to have a relationship with your pet?
शाळा : बालपणाला आधार देणारं घर - माझे पान
आठवणीतल्या सरी : मनातले चांदणे
Read More :
जात्याची आठवणींतील माहिती : जातं म्हणजे पावित्र, जातं म्हणजे घराची शोभा
आपल्या पाळीव प्राण्याशी नातं कसं असावं ? How to have a relationship with your pet?
शाळा : बालपणाला आधार देणारं घर - माझे पान
आठवणीतल्या सरी : मनातले चांदणे