Dakkhan Rani Marathi Kavita By Poet Vasant Bapat

SD &  Admin
0


ख्खनची राणी कोणाला म्हणतात हे महाराष्ट्रातील लोकांनाच नव्हे, तर भारतातील अधिकांश लोकांना माहितीच असेल. आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो, १९३० साली इंग्रजांनी डेक्कन क्वीन ट्रेन सुरु केली. त्या वेळी ती फक्त खास इंग्रज लोकांसाठीच सुरु केली होती. पुढे पुढे दिवस बदलत गेले आणि ही सर्वांसाठी खुली करण्यात आली. आज या डेक्कन क्वीन ने ९० वर्ष पार केलेली आहेत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असे आहे. त्याचबरोबर एका निर्जीव ट्रेन विषयी एवढ कोणीतरी लिहित आहे आणि लोकं ही त्याचा आस्वाद घेत आहे, हे देखील खूपच आनंदाची गोष्ट आहे.

दख्खन राणी मराठी कविता | Dakkhan Rani Kavita | कवी : वसंत बापट

Poem Content Credit to Vasant Bapat 

कवी वसंत बापट यांची ही कविता " दख्खन राणी" खूप छान पद्धतीने आणि आत्मयतीने त्यांनी आपल्यासमोर मांडली आहे. हजारो-लाखो लोकांना आपल्या सोबत सुखरूप घेऊन जाण्याऱ्या या दख्खन राणीला कवीणे खूप अलंकारानी सजवले आहे. डोंगर दऱ्यातून झुकझुक करत, हवेला चिरत आणि लोकांच्या आनंदाला सोबत घेत आपली परिक्रमा करण्यात व्यस्त असते. 

ती जेव्हा डोंगर दऱ्यातून मार्ग काढते, तेव्हा निसर्ग ही तिच्या सौंदर्यात सहभागी होतो. बसलेली लोकं ही आनंदाचा आस्वाद घेण्यात मंग्न होतात. लहान लहान मुले तर आनंदाने उड्या मारत या दख्खन राणीला अभिवादन करतात. अशा कित्येक अलंकारांनी कवीने या दख्खन राणीला सजवले आहे.

Read also
कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj

Read also : पृथ्वीचे प्रेम गीत मराठी कविता : कवी कुसुमाग्रज

   
 माझ्या वाचक वर्गाला देखील विनंती आहे की, तुम्हाला ही या 
दख्खन राणी बद्दल काय वाटते ते नक्कीच कळवा. 

दख्खन राणी मराठी कविता | Dakkhan Rani Poem | Deccan Queen | Poet : Vasant Bapat 


ख्खन राणीच्या बसून कुशीत

शेकडो पिले ही चालली खुशीत

सुंदर मानव तुंदिल अंगाचे
गालिचे गुलाब शराबी रंगाचे
ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी
गोजिरवाणी लाजिरवाणी
पोरटी घेऊन पोटाशी कुशीत
दख्खन रानी ही चालली खुशीत

निसर्ग नटला बाहेर थाटात
पर्वत गर्वात ठाकले थाटात
चालले गिरीश मस्तकांवरून
आकाशगंगांचे नर्तन गायन
झेलून त्यांचे नुपूर घुंगुर
डोलती डौलात दुर्वांचे अंकुर
मोत्यांची जाळी घालून भली
रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल
दख्खन राणीला नव्हती दखल

ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र
राहिले उभे हे शतके सहस्त्र
त्याच्याही पाषाण हृदया कळाली
सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी
नीला तो तलाव तांबूस खाडी ती
पांढरा प्रपात हिरवी झाडी ती
अवतीभवती इंद्राची धनुष्ये
दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये

ख्खन राणीच्या कुशीत पोटात
बुडाली जाणीव चहाच्या घोटात
किलवर चौकट इसपिक बदाम
फेकीत फेकीत जिंकित छदाम
नीरस पोकळ वादांचे मृदंग
वाजती उगाच खमंग सवंग
खोलून चंची पोपटपंची
करीत बसले बुद्धीचे सागर
दख्खन रानी ही ओलांडे डोंगर

धावत्या बाजारी एकच बालक
गवाक्षी घालून बसले मस्तक
म्हणाले "आई गं, धबधबा केवढा
पहा ना चवेणी, पहा हा केवडा
ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात
डोंगर नहाती पहाना टेसात"
म्हणाली आई "पूरे गं बाई,
काय या बेबीची चालली कटकट"
दख्खन राणीचा चालला फुंफाट

ख्खन राणीच्या पोटात कुशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत
मनाने खुरटी दिसाया मोठाली
विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी
बाहेर असू दे उन वा चांदणे
संततधार वा धुक्चे वेढणे
ऐल ते पैल शंभर मैल
एकच बोगदा मुंबई पुण्यात
दख्खन राणी ही चालली वेगात ...
दख्खन राणी ही चालली वेगात... !!

                                    कवी - वसंत बापट



आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला दख्खन राणी कवितेचा कंटेंट कवी वसंत बापट यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Dakkhan Rani poem published in this blog is by Poet Vasant Bapat. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem.



                                          

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!