महाराष्ट्रालाच नव्हे तर, पूर्ण भारतालाच खाद्य संस्कृती लाभली आहे. त्यात आपला महाराष्ट्र हा खाद्याचा भारी शौकीन आहे. येथे नाना प्रकारच्या पदार्थाचे सेवन केले जाते. प्राचीन काळापासून खाद्य संस्कुतीवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. आणि त्यात पदार्थाचे वर्गीकरण, जेवणाचे प्रकार, जेवण कसे शिजवले जाते आणि ते कसे वाढले जाते याची ही आपल्याला माहिती मिळते.
Read also : मन वढाय वढाय मराठी कविता | कवयित्री बहिणाबाई यांची कविता | Man Vadhay Vadhay Kavita
ग.दि माडगुळकर सारखे दिग्गज कवी, जेव्हा खाद्य संस्कुतीवर अलंकाराचा पाऊस टाकतात, तेव्हा जेवणाला वेगळीच चविष्टता येते. मला ही माझ्या खाद्य संस्कुतीचा अभिमान आहे. या कवितेत कवीने आपल्या येथे जेवणात वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक पदार्थाचे वर्णन केले आहे. खरच.. वाचताना खूप छान वाटतं.
एकदा तुम्हीही न चुकता ऐका किंवा कुठे वाचायला भेटली तर नक्कीच वाचा. तुम्हाला ही अभिमान वाटेल.
काय वाढले पानावरती कविता | Kay Vadhale Panavarti Marathi Poem | Poet : G. D. Madgulkar
काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती
धवल लवण हे पुढे वाढले, मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले, आणि लिंबू रसरसलेले
किसून आवळे मधुर केले, कृष्णा काठचे वांगे आणले
खमंग त्याचे भरित केले, निरनिराळे चटके नटले
चटण्यांचे बहु नवे मासले, संमेलनची त्यांचे भरले
मिरची खोबरे ती सह ओले, तीळ भाजूनी त्यात वाटले
कवठ गुळाचे मिलन झाले, पंचामृत त्या जवळी आले
वास तयांचे हवेत भरले, अंतरी अण्णा अधीर जाहले!
भिजल्या डाळी नंतर आल्या, काही वाटल्या काही मोकळ्या
काही वाटुन सुरेख तळल्या, कोशिंबिरी च्या ओळी जमल्या
शुभ्र काकड्या होत्या किसल्या, मुळा कोवळा मिरच्या ओल्या
केळी कापून चकल्या केल्या, चिरुन पेरुच्या फोडी सजल्या
एकरूप त्या दह्यात झाल्या, भाज्या आल्या आळू-घोसाळी
रान कारली वांगी काळी, सुरण तोंडली आणि पडवळी
चुका चाकवत मेथी कवळी, चंदन बटवा भेंडी कवळी
फणस कोवळा हिरवी केळी, काजुगरांची गोडी निराळी
दुधी भोपळा आणि रताळी, किती प्रकारे वेगवेगळी
फेण्या, पापड्या आणि सांडगे, कुणी आणुनी वाढी वेगे
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या, खिरी तयांच्या शोभत होत्या
शेवयांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या
सार गोडसे रातंब्याचे, भरले प्याले मधुर कढीचे