'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' हे सुंदर गीत साने गुरुजी यांनी लिहिले आहे. त्यांच्या या कवितेवरून आपल्या लक्षात येईल की, ते किती उच्चकोटीचे कवी होते.
जी माणसं प्रामाणिक असतात. त्यांच्या मनात इतर लोकांबद्दल आदर, प्रेम असते. ते सतत चांगला विचार करतात. त्यांच्या नसानसात देशभक्ती भरभरून असते. अशा माणसापैकी आपले आदरणीय साने गुरुजी होते. त्यांच्या आईने दिलेले संस्कार ते जीवनात कधीच विसरले नाही. आपल्या अंतिम क्षणापर्यंत ते लोकांसाठी आणि देशासाठी जगले. अशा महात्म्यास लाख लाख मुजरा.
Poem Content Credit to Poet Sane Guruji
ही सुद्धा कविता वाचा : द्वारका मराठी कविता | Dwarka Marathi Kavita | Prabha Ganorkar
ही सुद्धा कविता वाचा : मन वढाय वढाय मराठी कविता | कवयित्री बहिणाबाई यांची कविता | Man Vadhay Vadhay Kavita
पुढे ते म्हणतात, आपण सर्व एकच ईश्वराची लेकरं आहोत. म्हणजे आपण सर्व बंधू आणि भगिनी आहोत. सगळे आपलेच आहेत. म्हणून सगळ्यांवर प्रेम केल पाहिजे. रंजले- गांजले जे लोकं आहेत त्यांना जवळ करा. त्याचं दु:ख दूर करा. जी अनाथ आहेत त्यांना मदत करा. त्यांना आधार द्या. आणि सगळ्यांशी प्रेमाने, दयेने आणि विश्वासाने वागा. खरच कवितेचा प्रेत्यक शब्द अमुल्य आहे. प्रत्येक शब्दातून अमृतासमान अर्थ बाहेर पडत आहे. मला वाटतं, या अमृतासमान शब्दांना आपल्या मनात रुजवायला पाहिजे. असे जर आपण केले तर, जगात कायमचा अहंकाराचा / गर्वाचा अंधकार नष्ट होईल. त्याने जगात शांतात निर्माण होईल. जग आपुलकीने एकत्र येईल आणि मग सगळीकडे प्रेम आणि प्रेमच दिसेल.
ही कविता खरच आपल्या संग्रही असायलाच पाहिजे. ही कविता आपल्या जवळ असेल तर, एक सकारात्मक उर्जा आपल्या सोबत राहील असे, मला वाटते. तुम्हाला काय वाटते, ते नक्कीच कळवा.
गीत : खरा तो एकची धर्म । खरा धर्म काय आहे? Khara to Ekachi Dharm marathi Poem
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती, सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात, असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
कवी : आदरणीय साने गुरुजी
आभार आणि क्रेडीट
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला खरा तो एकची धर्म कवितेचा कंटेंट कवी साने गुरुजी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Khara to Ekachi Dharm poem published in this blog is by Poet Sane Guruji. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem.