कवयित्री इंदिरा संत यांची मृण्मयी कविता पहिल्यांदा आपण वाचायला घेतो, तेव्हा असं वाटतं आपण प्रत्येक ऋतुचा अनुभव घेत आहोत. ह्या कवितेचा अर्थ प्रत्येक रसिकाचा वेगळा असू शकतो, परंतु कवितेचा जो भाव आहे, तो मात्र एकच राहणार आहे.
मी जेव्हा ही कविता वाचायला घेतली तेव्हा मला ही असच वाटल की, कवयित्री प्रत्येक ऋतुचं गुणगान गात आहे. तिने मनात साठवलेल्या आठवणींचा, आनंदाचा ती मनमोकळेपणाने उधळण करत आहे.
Also Read: खरा तो एकची धर्म गीत | Khara to Ekachi Dharm marathi geet | कवी : साने गुरुजी
Also Read: उन उन खिचडी मराठी कविता | Un Un Khichadi Marathi Kavita | कवी : मो.दा.देशमुख
ही कविता एकदा नक्कीच वाचा आणि तुम्हाला तिचा अर्थ काय लागतो, ते कमेंट्स द्वारा नक्कीच कळवा. मी आपल्या कमेंट्सची वाट पाहीन.
इंदिरा संत यांची मृण्मयी मराठी कविता | Poet : Indira Sant | Mrunmayee Marathi Kavita
रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर
आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे