सुरमई बद्दल सगळेच जाणता. परंतु या धरतीवर फारच कमी लोकं आहेत, जे सुरमईच्या अंतर्मनाला ओळखतात. त्या पैकी एक कवी किरण येवले आहेत, ज्यांनी सुरमईच्या अंतर्मनाला ओळखत, तिच्या वेदनेची आपल्याला ओळख करून दिली आहे.
सुरमई या कवितेत खूप उत्तमपणे आणि सहज समजेल असे शब्दात कवी किरण येवले यांनी सुरमई बद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. ते म्हणतात, सुरमई सगळ्यांच आवडते. तिचा चविष्टपणा इतका अप्रतिम असतो की, सगळेच तिच्यावर तुटून पडतात. मोठ मोठ्या पार्टीत सुरमई शिवाय जेवण कधीच पूर्ण होत नाही. लोकं आवडीने तिच्यावर ताव मारतात. या वेळी लोकं सुरमईच्या चवीची आपल्या मनाला वाटेल तसी स्तुथी करतात. तिच्या उत्तम चवीमुळे बाजारात तिची किंमत ही वरचढ आहे. अशा प्रकारे लोकं या सुरमईचे गुणगान गातात.
Poem Content Credit to Kiran Yewale
परंतु पुढे कवी म्हणतात की, हे जरी सत्य असले तरी, तुम्ही सुरमईला पूर्णतः ओळखत नाही. तुम्ही सगळे तिच्या उत्तम चवीची प्रशंसा करतात. पण तुम्ही तिच्या मनाला काय वाटतं, ते कधी विचार करत नाही. ती समुद्रात कसे जीवन व्यतीत करते, या बद्दल कोणी बोलत नाही. जेव्हा तुम्ही तिला जाळ्यात पकडता, तेव्हा तिच्या मनाला किती वेदना होत असतील या बद्दल तर विचार करायला आपल्याकडे वेळच नाही आहे.
Also read : उन उन खिचडी मराठी कविता | Un Un Khichadi Marathi Kavita | कवी : मो.दा.देशमुख
पुढे ते रागातच विचारात की तुम्हाला सुरमईची चवच माहित आहे, सुरमई नाही. येथे खरच त्यांनी माणसाची चुकी किती वाईट पद्धतीची आहे, ते दाखवून दिले आहे. किरण येवले यांनी सुरमई बरोबर स्त्रीची ही व्यथा काही वेगळी नाही असे म्हणतात. स्त्रीला ही कोणीच समजून घेत नाही. तिला घरातील सगळेच राबवून घेतात, पण तिच्या मनाचा कोणी विचार करत नाही.
मला वाटतं, एक पुरुष असून ही किरण येवले यांनी स्त्रीची बाजू ओळखून घेतली आहे. सुरमई आणि स्त्री यांची व्यथा त्यांनी ज्या पद्धतीने मांडली आहे, यावरून लक्षात येते की, ते एक चांगले कवी तर आहेच बरोबर चांगले व्यक्ती ही आहेत.

सुरमई किरण येवले यांची मराठी कविता | Surmai Marathi Poem | Poet: Kiran Yevale
तुम्हांला सुरमई माहीत आहे का ?
बरोब्बर!
चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही ?
पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल ?
अरे ! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे;
तिची चमचमती त्वचा,
तिचं ताजेपण ओळखण्याची कला,
तिची महागलेली किंमत...
सगळंच.
आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही ;
तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते,
तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते,
किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.
पण माफ करा,
तुम्हांला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे
असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे;
तुम्हांला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही,
तुम्हांला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही,
तुम्हांला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहीत नाही,
आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर
तुम्हांला नक्कीच माहीत नाही!
एक सांगतो,
रागावू नका;
तुम्हांला खरं तर
सुरमईची फक्त चव माहीत आहे,
सुरमई नाही.
आणि जे सुरमईच्या बाबतीत
तेच-
अगदी
तेच-
बाईच्याही
कवी: किरण येवले
आभार आणि क्रेडीट
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला सुरमई कवितेचा कंटेंट कवी किरण येवले यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Surmai poem published in this blog is by Poet Kiran Yevale. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem.