Un Un Khichadi Marathi Kavita by MO.DA Deshmukh

SD &  Admin
0

 

न उन खिचडी या कवितेचे कवी मो.दा.देशमुख यांनी खरच स्त्रीच्या जीवनावर सखोल अभ्यास केलेला दिसतो आहे. ही कविता वाचल्यावर आपल्याला ही प्रत्येय येईल.

उन उन खिचडी  मला वाटतं, ही कविता प्रत्येक स्त्रीला वाचायला हवी आहे. मुख्य करून लग्न झालेल्या स्त्रियांनी वाचलीच पाहिजे. असं म्हटलं जातं, स्त्रीच्या मनात कधी काय येईल आणि ती कधी कशी वागेल यात काही नेम नाही. ज्या वेळी तिला जे पटतं, ती तेच करते. 

असच या कवितेमध्ये  मो.दा.देशमुख यांनी लग्न झालेल्या स्त्रीच्या मनातील विवंचना काय असते, हे दाखवून दिले आहे. स्त्री जेव्हा लग्न करून घरी जाते, तेव्हा तिला स्वतःची वेगळी स्पेस हवी असते. त्यामुळे ती सासरच्या इतर माणसापासून वेगळ राहण्यासाठी खटाटोप करत असते. घरात जास्त माणस असल्यामुळे तिला वैताग आलेला असतो. सकाळी उठलं की, मुलांपासून ते मोठ्यापर्यंत तिलाच करावे लागते. मग तिची मुलं असतो किंवा दिरांची मुलं. घरात काही सुख मिळत नाही असे तिला वाटत असते. यासाठी ती वेगळ होण्यासाठी नवऱ्याकडे सतत मांगणी करत असते.

नवऱ्याकडे सतत केलेल्या कटकटीमुळे बिचारा नवरा ही वैतागून जातो. आणि एकदा बायकोच्या मनासारखं होवूदे म्हणून तो आपल्या घरच्यांपासून वेगळा राहतो. आता तिला खूप आनंद झालेला असतो. आता तिला कोणी बोलणार नसतं. ना सासू- सासरा, ना दीर - जावबाई, ना नणंद आणि नाही दिरांच्या मुलांची कटकट. आता ती जे पाहिजे ते करायला मोकळी असते.

उन उन खिचडी मराठी कविता | Un Un Khichadi Marathi Kavita
                                       Poem Content Credit to Poet Mo.Da Deshmukh 


परंतु यात ती विसरून गेलेली असते की, आपल्या माणसापासून दूर जाण्याने, तिला किती कठीण गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे. जेव्हा ती सगळ्या लोकांसोबत होती, तेव्हा ती काम करत होतीच, परंतु तिला इतर ही मदत करत होते. स्वयंपाक करायला सासू - जावबाई मदत करत होत्या. मुला-बालांना सासरे बघत होते. इतर घराच्या मोठ्या कामांना दीर मदत करत होते. नवऱ्यावर एवढ मोठ ओझं नव्हतं. परंतु वेगळं झाल्यापासून आता घरातील कामे फक्त तिलाच करावी लागत आहेत. मुलं उठ्ल्यांपासून ते झोपेपर्यंत सर्व काही त्याचं तिलाच कराव लागतं. आता नवऱ्याची जबाबदारी ही तिलाच सांभाळावी लागते. कधी कोणी आजारी पडलं तर रात्रंदिवस तिलाच रात्र जागावी लागते. मदतीला कोणीच नसतं. 

ही सुद्धा कविता वाचा : मन वढाय वढाय मराठी कविता |  Man Vadhay Vadhay Kavita

आता मात्र तिला आपली चूक समजली होती. कुटुंब आणि कुटुंबातील माणसं एकत्र का असावीत हे तिला आता समजल होतं. स्वतंत्र राहीलं तर स्वतः ची स्पेस मिळते, पण पुढे एकटपण नशिबी येते हे कुणीच विचार करत नाही. आता तिला सासू - सासऱ्यांची, नणंद- दिरांची खूपच आठवण येत होती. माणसे कशी का असेनात, शेवटी ती आपली असतात. सुख- दु:खात तीच पुढे धावून येत असतात. हे आता तिला कळून चुकले होते.

अशी ही उन उन खिचडी कविता खरच सगळ्यांसाठी काहीतर चागंल सांगून जाते. विस्कटलेल्या कुटुंबाला बांधण्याच काम ही कविता नक्कीच करेल, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, ते नक्कीच कळवा.. 

उन उन खिचडी साजुकसं तुप मराठी कविता | मो.दा देशमुख 


न ऊन खिचडी साजुकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख.
ऊन ऊन खिचडी  साजुकसं तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख.

क नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं त्यो बाजारच सारा.
सासुबाई - मामंजी, नणंदा नी दीर,
जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणेरावळे सण नी वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,
वेगळं राहायचं भारीच सुख…

गळ्यांना वाटतं माझं घर प्रेमळ,
प्रेमळ प्रेमळ म्हटल तरी सासू ती सासू,
अन् एवढासा जीव झाला तरी विंचु तो विंचु.
चिमुकली नणंदबाई चुगलीत हलकी,
वीतभर लाकडाला हातभर झिलपी.
बाबांची माया काय मामंजीना येते,
पाणी तापवलं म्हणुन साय का धरते?
बहीण अन् जाऊ यात अंतरच खुप,
वेगळं राहायचं भारीच सुख….

दोघांचा संसार सदा दिवाळी दसरा,
दोघात तिसरा म्हणजे डोळ्यात कचरा.
दोघांनी रहायचं, छान छान ल्यायचं,
गुलुगुलु बोलायचं नी दुर दुर फिरायचं.
आठवड्याला सिनेमा, महिन्याला साडी,
फिटतील साऱ्या आवडी निवडी.
दोघांचा असा स्वयंपाकच काय?
पापड मेतकुट अन् दह्याची साय ,
त्यावर लोणकढ साजुक तुप,
वेगळं राहायचं भारीच सुख….

डले पडले नी अबोला धरला,
तेव्हा कुठे वेगळा संसार मांडला.
पण मेलं यांच काही कळतच नाही,
महिन्याचा पगार कसा पुरतच नाही.
साखर आहे तर चहा नाही,
तांदुळ आहेत तर गहु नाही.
ह्यांच्याही वागण्याची तऱ्हाच नवी,
घोटभर पाणि द्यायला पण बायकोच हवी.
बाळ रडल तर ते खपायचं नाही,
मिनीटभर कसं त्याला घ्यायचही नाही.

स्वयपाक करायला मीच,
बाळ रडल तरी घ्यायच मीच.
भांडी घासायची मीच,
अन् ह्यांची मर्जी पण राखायची मीच.
जिवाच्या पलीकडे काम झालं खुप,
वेगळं राहायचं कळायला लागलं सुख….

सासुबाई रागवायच्या पण बऱ्याच होत्या,
सकाळचा स्वयंपाक निदान करत तरी होत्या.
मामंजी दिवसभर बाळाला घ्यायचे,
बाजारहाट करायला भावजी जायचे.
कामात जावेची मदत व्हायची, नणंद बिचारी ऊर नीपुर निस्तरायची.
आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,
बारा महिन्याला एकच साडी.
थंडगार खिचडी, संपलं तुप,
अन् वेगळं व्हायचं कळलं सुख!

                            कवी : मो.दा.देशमुख 



आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला उन उन खिचडी कवितेचा कंटेंट मो.दा देशमुख यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Un Un Khichadi poem published in this blog is by Poet Mo. Da Deshmukh. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem



 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!