Amuche Ghar Chhan Marathi Kvita by Poet Madhav Julian

SD &  Admin
0

'मुचे घर छान' या कवितेच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की, या कवितेचा खरा भावार्थ काय आहे. खानदेशी कवी माधव जूलियन यांनी ही कविता लिहिली आहे. वाचताना तुम्ही नक्कीच भावूक होऊन जाल, हे मात्र नक्की.

मी जेव्हा पहिल्यांदा ही कविता वाचायला घेतली, तेव्हा खरच बालपणीचे सगळे दिवस डोळ्यासमोर येऊन आनंदाने हसले. मला ही खूप बरं वाटलं. बालपणी आपण केलेली मजा-मस्ती ही वेगळीच असते. त्यात असीम आनंद लपलेला असतो. त्यावेळचे खेळ ही रंजक होते. त्यातून किती आपल्याला आनंद मिळायचा. बालपणीचा प्रत्येक क्षण आपण हसत घालवलेला होता.

आमुचे घर छान मराठी कविता | Amuche Ghar Chhan | माधव जूलियन
Poem Content Credit to Poet Madhav Julian  and image credit to Spruha Joshi 

थोरा - मोठ्यांचं प्रेम आणि गोड मार आज किती आपल्याला आवडतो. त्यावेळी आपण आईचा किती मार खालला असेल. पण आई ही आईच असते. काही थोड्याच वेळात ती आपल्याला जवळ घेवून, खाऊ द्यायची. आपल्या कुशीत घ्यायची. खरच आईच्या मायेची उब ही जगातल्या कोणत्याच वस्तुत मिळणार नाही. आई ही आई असते. तिच्या शिवाय कोणीच नाही.

Read Also: 
उन उन खिचडी मराठी कविता | Un Un Khichadi Marathi Kavita | कवी : मो.दा.देशमुख 

Read Also: खरा तो एकची धर्म गीत | Khara to Ekachi Dharm marathi geet | कवी : साने गुरुजी

ही कविता तसीच आहे. लहानपणी केलेल्या बाललीलांच अद्भुत वर्णन या कवितेत कवी माधव जूलियन यांनी केलेलं आहे. एकदा या कवितेला नक्कीच भरभरून वाचा.

 आमुचे घर छान | Amuche Ghar Chhan Marathi Poem | Poet: Madhav Julian 


मुचे घर छान शेजारी वाहे ओढा

कागदी होड्या सोडा दूर जाती II १ II

तुर नव्हे तर अभ्रकी पंखांचे ते

विमान उडे तिथे उन्हामाजी II २ II

थळ वाहे पाणी नितळ थंडगार

नाचता त्यात फार मौज वाटे II ३ II 

पाहून अंग ओले भरते रागे आई

मागून देई काही खाऊ गोड II ४ II 

मुचे घर छान परसू लांब रुंद

मोगरा जाई कुंद फुलतात II ५ II

खोबरे झेंडूतील मागतो सदा बाळ

झेंडूचा पहा काळ खोडकर II ६ II

डूळशाची फुले देठात थेंब गोड

करितो गोड तोंड मुलांचे तो II ७ II

सोलून कोरफड पाण्यात धुता साफ

बर्फ हो अपोआप काचेवाणी II ८ II

मुचे घर छान म्हणती आम्हा द्वाड

करितो परी लाड बाबा-आई II ९ II

अंगणी सरावल्या खडूने काढू शिडी

लंगडी चढोवढी खेळायचा II १० II

रात जिन्याखाली ताईचे घरकुल

खड्यांची थंड चूल पक्वान्न दे II ११ II

भांडून केव्हा केव्हा म्हणतो जा फू गडी!

लागेना परी घडी एक व्हाया II १२ II

मुचे घर सान आता ते कुठे गेले

बाल्याचे हे भुकेले मन पुसे II १३ II


                            कवी – माधव जूलियन      



आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला अमुचे घर छान कवितेचा कंटेंट कवी माधव जुलिअन यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Amuche Ghar Chhan  poem published in this blog is by Poet madhav Julian. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem

                                   

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!