माझ्या बालपणीचा पावसाला | ९० व्या दशकातला पावसाला | 90th Childhood Rainy Season

SD &  Admin
0


काशात काळे ढग जमा होऊ लागले. सगळीकडे सोसाट्याचा वारा वाहू लागला. मधूनच कडाक्याची वीज वाजू लागली. सारे पशु-पक्षी सैरा वैरा पळू लागले की समजून जावे, त्या अन्नदात्याचे आगमन होणार.

वरुण राजाच्या आगमनाने सगळीकडे अंधार झालेला सारखं वाटत होता, तसा मी घराच्या खिडकीतून आकाशाकडे पाणावलेल्या नजरेने पाहत होतो. घरा बाहेर जाण्यास आईने मनाई केली होती. तिला माहित होत की, याला बाहेर सोडलं तर, वाऱ्यासारखा पावसात पळत सुटेल. म्हणून आईने घराला कडी लावून मला आतमध्ये डांबून ठेवलं होतं. परंतु माझं मन काही मला एका ठिकाणी स्वस्त बसू देत नव्हतं. सतत इकडे तिकडे पळत होतं. अचानक विजेचा कडकडाट झाला, तसा घाबरल्यासारखा आईच्या कुशीत येऊन मुरी मारली. थोडा वेळ तसाच आईच्या कुशीत होतो. थोड्या वेळाने सगलं काही शांत झालं. तसा मी हळूच खिडकीच दार उघडून बाहेर पाहू लागलो. सारं वातावरण पावसाच्या आगमनाने हर्षित झाले होते. सगळीकडे लोकं आनंदाने इकडे तिकडे नाचत होती. काही माणसं वस्तूं भिजू नयेत म्हणून त्यांची जुळवा जुळव करत होती. काही तर मोकाट इकडे तिकडे नाचत होती. त्यांना बघून माझं मन ही बाहेर बागडायला नाचत होतं. पण आईने घरात डांबून ठेवल्यामुळे मला कुठेच जाता येत नव्हते.

माझ्या बालपणीचा पावसाला | ९० व्या दशकातला पावसाला | 90th Childhood Rainy

शेवटी त्या वरूण राजाचं आगमन झालं. तसं वातावरण प्रफुल्लीत झालं. एक प्रकारचा गारवा वातावरणात दौडू लागला. सगळीकडे पाणीच पाणीच झाले. घराच्या ओसरीवर गारा जमा होऊ लागल्या. त्यांना जमा करायला मला राहावेने. शेवटी आईकडे बाहेर जाण्यासाठी जोराचा हट्ट सुरु केला. पण आई काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी आदल आपट सुरु केली, तेव्हा कुठे घराच्या अंगणापर्यंत जाण्यास परवानगी मिळाली. मी खुश झालो. तसा वाऱ्याच्या वेगाने अंगणात इकडे तिकडे पळू लागलो. आई सारखी ओरडत होती. पण मी काही ऐकायका तयार नव्हतो. दाव्याला बांधलेलं जनावर जसं सुटलं की, इकडे तिकडे दौडत सुटतं, तसा मी करू लागलो. कदाचित आईली आपली चूक समजली असावी की, याला घरातच डांबून ठेवलं पाहिजे होत.

Read More : माझे अंगणातील चांदणे | Maze Anganatil Chandane | ए डिलाईट लाइफ

मला खेळताना बघून माझे सवंगडी ही मला येऊन मिळाले. मग काय धमालच.सगळीकडे जल्लोष सुरु झाला. आमच्या आवाजाने वातावरण दण
दणू लागले. आम्हा मुलांच्या आनंदाला सीमाच नव्हती. जो तो इकडे तिकडे आपल्याच खुशीत वाऱ्यासारखा दौडत होता. तुम्हाला सांगतो, पावसात भिजत खेळणे म्हणजे स्वर्ग सुखाचा अनमोल क्षणच. मला वाटतं.. असा क्षण जीवनात फार कमी वेळा येतो. म्हणून जेव्हा कधी असा क्षण येईल तेव्हा सगलं काही विसरून तो अनुभवण्याचा प्रयत्न करा. मी आज ही अशा क्षणांना अनुभवण्याचा प्रयत्न करतो. असे करताना लोकं लहान झालास की काय म्हणून चिडवतात. परंतु त्यांना काय कळणार, कधी काळी हे क्षण आमच्या बालपणीच्या आनंदाचा एक भाग होता. यांच्या शिवाय आमचं बालपण अधूर होतं.

तुम्हाला सांगतो मित्रहो.. बालपणीच्या प्रत्येक आठवणी आपल्यासाठी प्राण असतात. आपण त्यांच्या खूप जवळ असतो. आज जेव्हा जेव्हा असे क्षण बघतो, तेव्हा आपण आपल्या बालपणीच्या जीवनात डोकावू लागतो. त्यात आपण इतके खोलवर बुडून जातो की, अक्षरश.. डोळ्यातून पाणी येते. असं बऱ्याच लोकांच होत असणार... माझं मात्र न चुकता असं होतच.

त्यात पावसाला हा आपल्या जिवाभावाचा साथी. खरं म्हणजे.. पावसाचं आणि लहान मुलाचं एक विशेष नातं असतं. ज्या वेळी दोघही एकत्र येतात, तेव्हा एक वेगळाच हंगामा होतो. वातावरण अगदी हर्षित होऊन जाते. मित्रानो.. आज ही मी असे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, परंतु बालपणीसारखी मजाच येत नाही. कुठेतरी काही कमीच पडत असते. त्यावेळी आम्ही पावसात कागदी होड्या खूप सोडायचे. त्यांची शर्यती ही लावायचे. हा क्षण जेव्हा बालपणी अनुभवला होता,  तेव्हा अंगात एक वेगळीच उर्जा होती. परंतु आता तेवढी अंगात उर्जा नसते. आता एकटाच असे खेळ खेळतो. बरोबर मित्रही नसतात. सगळेजण आता मोठे झालेत ना.. त्यांची अशा खेळातली आवडच संपली आहे असं वाटतं. पण माझं नाही आहे असं.. मी किती ही मोठा झालो तरी... मी बालपणी ज्या ज्या गोष्टी करत होतो, त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न करतो. मला त्यात खूप आनंद मिळतो.   

बालपण हे सगळ्यांसाठीच प्रिय असतं. आपण बालपणीच्या आठवणींपासून कधीच वेगळ राहू शकत नाही. सुख- दु:खाच्या चढ उतारावर बालपणीच्याच आठवणी  आनंदाचे झाड म्हणून आपल्या सेवेला धावून येतात. आणि त्यात आपण मनसोक्त डुबकी मारतो. अशाच बालपणीच्या पारावर आपण केलेल्या बाललीलांच आनंदाचं झाड हे पुस्तक आहे. प्रत्येक शब्द हा तुम्हाला नक्कीच तुम्हाच्या  बालपणीच्या विश्वात घेवून जाईल, हे विश्वासाने सांगेन. तुम्हाला बालपणीच्या विश्वातले जग जगायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. शुल्क फार कमी आहे. PDF, Google Play Store आणि Amazon Kindle मध्ये उपलब्ध आहे       

 

 

Maza gav maz balpan book


Now Available On Google Play Store : माझं गाव माझं बालपण 

                       
९० वे शतक म्हणजे स्वर्ग सुखाचं शतक. या शतकात ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला, त्यांना नशीबवान म्हणावे लागेल. कारण याच शतकात बालपणीचा सुखद आठवणी स्वर्गसुखासारख्या होत्या. या शतकात माणसं ही खूप प्रेमळ होती. एकमेकांना साथ अगदी पदोपदी द्यायची. गावात कुण्या घरात एखाद माणूस आजारी पडलं तर, पाच मिनिटात सगळा गाव गोळा व्हायचा. आपल्या परीने जो तो मदतीला पुढे येयाचा. प्रत्येक कार्यक्रम येथे आनंदात पार पडायचे. जाती धर्माचं ओझं गावात खूप कमी बघायाल मिळायचं. एक वेगळीच मजा त्यावेळी होती. त्याचबरोबर प्रत्येक मुला- माणसात एकमेकांबद्दल आदर होता. हे तुम्हाला येते आवर्जून सांगावे लागेल. अशा या शतकाला कोटी कोटी प्रणाम. ज्याने आम्हाला स्वर्गसुखाच्या आठवणी सोबत दिल्या.

माझ्या मित्रानो.. तुमचा  
९० व्या दशकातला पावसाला कसा होता, ते आम्हाला नक्कीच कळवा. त्याच बरोबर तुमच्या बालपणीच्या आठवणी ही आम्हाला शेयर करू शकता.                          
                                                

          

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!