एका कुमाराची कहाणी ही कविता वसंत बापट यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्यावरती लिहिली आहे. महान शास्त्रीय संगीताचे ज्ञाता कुमार गंधर्वांनी लहानपासुनच या क्षेत्रात आपले कौशल्य साऱ्या जगाला दाखवले होते. कवी वसंत बापट यांनी खरच या कवितेतून कुमार गंधर्व यांचे संगीताच्या क्षेत्रातले कौशल्याचे आणि त्यांचे प्रभावी व्यक्तीमत्वाचे दाखले दिले आहेत.
कुमार गंधर्व यांच्याबद्दल सांगितले जाते की, त्यांना एकच फुफुस होते. दुसरे निकामी झाले होते. तरीही ते एका फुफुसाच्या मदतीने गायन क्षेत्रात अव्वल होते. खरच.. तुम्ही याला दैवी चमत्कार म्हणू शकता.
Read More : कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj
Read More : पृथ्वीचे प्रेम गीत मराठी कविता : कवी कुसुमाग्रज
वसंत बापट यांनी कुमारांच्या या मेहनतीला सलाम करत, त्यांच्यावर ही कविता लिहिली आहे. खूप छान आणि कुमारांच्या जीवनाला ओळख करून देणारी आहे.
एका कुमाराची कहाणी | Eka Kumarachi Kahani | Pandit Kumar Gandharv
दिसेल त्या आकाराला सोन्याचे हात दिले.
टिंबा टिंबा मधे जसे बिम्ब आपले भरून ठेवले,
वडीलधाऱ्या वडांचेही माथे जरा खाली लवले.
एवढ्या मधे कोणीतरी कौतुकाची टाळी दिली,
तशी हा जो सावध झाला, आपली आपण हाक ऐकून दूर दूर निघून गेला.
सूर्य सन्मुख सूर्यफूल, एक टक तप करते,
धरणी वरती पाय रोवून आकाशाचा जप करते.
तसा तो ही इमानदार अग्र एकाग्र झाला,
तेव्हा म्हणे कुणी याला आदरचा मुजरा केला.
तशी हा जो तडक उठला,
मृगजळ पिण्यासाठी रानोमाळ धावत सुटला.
खजुरीच्या बनामधे संध्याकाळची सावळी झाला,
तेव्हा याच्या देहावरुन लमाणांचा तांडा गेला.
मग म्हणे कुणीतरी याच्यासाठी हाय म्हटले.
तशी याने काय केले, कोशासारखे वेढून घेतले कबीराचे सारे शेले.
मीरेच्या मंदिरात मारवा होऊन घुमत राहिला,
कोणी म्हणतात निर्गुणाच्या डोहाचाही तळ पहिला.
एवढ्यामधे काय घडले,
महाकाल मंदिरात सनातन डमरु झडले.
कण्यामधल्या मण्यामधून मल्हाराची नागीण उठली,
चंद्राच्या तळामध्ये ओंकराची लाट फुटली.
तेव्हा म्हणे जरा कुठे कंठामधली तहान मिटली.
आता तसा कुशल आहे,
पण स्वप्नात दचकून उठे,
म्हणे माझा सप्तवर्ण श्यामकर्ण घोडा कुठेय?
कवी - वसंत बापट