हळद शरीरासाठी फायदेशीरच आहे, परंतु तिच्या अधिक सेवनाचे तोटेही आहेत

SD &  Admin
0


युर्वेदामध्ये हळदीला खूप मोठं महत्व आहे. अनेक डॉक्टरसुद्धा जेवणात हळदीला समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. आजच्या कोरोना काळात तर हळद खाण्याचा सपाटाच सुरु आहे. आणि ते बरोबर ही. हळद आहेच मुळात गुणकारी.

हळद शरीरासाठी फायदेशीरच आहे, परंतु तिच्या अधिक सेवनाचे तोटेही आहेत

 परंतु एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वापर आपण जो पर्यंत मर्यादित करत आहोत, तो पर्यंत ती गोष्ट आपल्याला हानीकारक नसते. परंतु आपण तिचा वापर मर्यादेपलीकडे करू लागतो, तेव्हा नक्कीच ती आपल्याला हानिकारक ठरते.

Read More : मोबाईल फोनमुळे हाडे कमकुवत होतात का ? Do mobile phones weaken bones?

   
याचं समीकरणाला समोर ठेवून जर, तुम्ही हळदीचा वापर मर्यादेपलीकडे करत असला तर, समजून जावे की त्याचे परिणामही हानिकारक ठरतील.

हळदीचे अधिक सेवन केल्याने शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात?


हळदीचे जास्त सेवन केले तर रक्त अतिपातळ होते. रक्ताची गुठळी होत नाही. त्यामुळे ज्यांच्या रक्तप्रवाहात अडचणी येतात, त्यांनी अति हळद खाणे टाळावे.

दुसरी गोष्ट म्हणजे पोटाच्या काही रोगांवरती हळद घेणे चांगले असते. परंतु तेच जर तुम्ही तिचे अति सेवन करत असाल, तर पोटाचे काही रोग ही निर्माण होतात. तसेच हळदीमध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो. हे ऑक्सलेट अति प्रमाणात शरीरात गेले तर पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होऊ शकतो.

 कोणी कोणी हळदीचे अधिक सेवन टाळावे ?


ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी थेट हळदीचे सेवन करू नये. तसेच जास्त प्रमाणातही करू नये.

हळदीमध्ये असलेल्या 
ऑक्सलेट घटकामुळे किडनी स्टोन हो होऊ शकतो. रक्तामध्ये लोह हा महत्वाचा घटक आहे. परंतु हळदीच्या अधिक सेवनाने हा घटक अन्नातून शोषून घेण्याची क्षमता कमी होते.

हळद ही शरीरासाठी फायदेशीरच आहे, परंतु ती तेव्हाच फायदेशीर ठरते, जेव्हा तुम्ही तिचे सेवन योग्य प्रमाणात कराल.     
                                                   



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!