Ivalishi Ek Muth Marathi Kavita by Spruha Joshi

SD &  Admin
0


भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होऊन गेली, तरीही आज समाजात समानता दिसून येत नाही. खरं तर.. आपण त्या समानतेच्या जवळपासच गेलो नाही आहोत. फार वाईट वाटत की, आपण आज २१ च्या शतकात जगत आहोत.

कवयित्री स्पृहा जोशी यांनी  इवलीशी एक मुठ या कवितेमधून आपल्याच हेच सांगितले आहे. गरिबीत वाढलेल्या मुलांना आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किती कष्टदायक यातना सहन कराव्या लागतात. त्या मुलांच्या अपेक्षांचा आणि इच्छांचा विध्वंश कसा  होतो. त्यांच्या मनाला किती दु:ख होतं, हे परखडपणे या कवितेत सांगितले आहे.

इवलीशी एक मुठ मराठी कविता | Ivalishi Ek Muth Marathi Kavita | स्पृहा जोशी
image credit to google.com   

असे वाटते, त्यांना स्वप्न बघण्याचा अधिकारच नसतो. आणि जर त्यांनी अशी मोठी स्वप्न पहिली, तर पुढे त्यांना पक्षपातांना आणि समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. कवितेची शेवटची ओळ हृदयाला भिडणारी आहे. गोष्ट सरे, रात्र उरे, चिमणी उडे भुर्र, हरवलं स्वप्न इवलं, कुठे दूर दूर. तो/ ती खूप स्वप्न बघतात. खूप मेहनत करतात. परंतु समाज त्यांचा एवढा दुश्मन झालेला असतो की, त्यांची स्वप्न वाऱ्याच्या झोक्याप्रमाणे हवेत भुर्र उडून जातात. शेवटी राहतात त्या फक्त न सहन होणाऱ्या वेदना.

Read More : उन उन खिचडी मराठी कविता | Un Un Khichadi Marathi Kavita | कवी : मो.दा.देशमुख

कविता छोटीशी आहे, परंतु आजच्या पक्षपात करणाऱ्या समाजाला लाजवणारी कविता आहे. ही कविता माझ्या मनाला खूप भावली, म्हणून आपल्यापुढे सादर करावीशी वाटली.

    आपल्याला या कवितेबाबत काय वाटते, ते नक्कीच कळवा...  
                            

इवलीशी एक मुठ मराठी कविता | Ivalishi Ek Muth Kavita | Poet : Spruha Joshi 


वलीशी एक मूठ

त्यात इवलंसंच स्वप्न

चुरगाळलेलं मन, 

त्याचं इवलंसंच मागणं.


वल्या खांद्यावरती

इतकं मोठं ओझं,

थकले इवले डोळे

आणि करपली नीज,


कुठले मंद वारे

आणि कसले शांत तारे

इवल्या कानांसाठी 

नाही पाखरांचे गाणे


वले दोन हात 

तरी लावतात दिवा

इवल्याशा सुखासाठी 

इवलासा ठेवा.


गोष्ट सरे, रात्र उरे 

चिमणी उडे भुर्र, 

हरवलं स्वप्न इवलं 

कुठे दूर दूर..


                                        कवयित्री - स्पृहा जोशी 


आभार 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला इवलीशी एक मुठ कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Ivalishi poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!