Achanak Kas Sagal Marathi Kavita | Poet Spruha Joshi

SD &  Admin
0


प्रत्येक कवितेचा अर्थ समजून घेण्यासाठी प्रथम तिचा मनापासून भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. त्या शिवाय कवितेचं रसपान पूर्णपणे घेता येत नाही.

अचानक कसं सगळं ही कविता कवयित्री स्पृहा जोशी यांची आहे. कवितेला आपण पूर्णपणे मनात साचवतो, तेव्हा कळत की, ही कविता अंधारात किंवा एकट जीवन जगण्याची आस असणाऱ्या एका व्यक्तीची आहे. मग ती व्यक्ती पुरुष असेल किंवा स्त्री.

अचानक कसं सगळं मराठी कविता | Achanak Kas Sagal Marathi Kavita | स्पृहा जोशी
Poem Content and image credit to poet Spruha Joshi

जसं आपण ऐकतो किंवा अनुभवतो की सगलं काही अचानक अनपेक्षित पणे घडत असते. आपल्या काही समजण्याच्या आत नको त्या गोष्टी घडून जातात. हे अचानक असं प्रकारे घडतं की, आपण त्या दर्दखाईत हरून जातो. कवयित्री स्पृहा जोशी यांनी अनेक अलंकारांनी कवितेला सजवले आहे. प्रत्येक शब्द आपल्या जीवनात घडत आहे असे वाटते.

Read More : कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj

    पहा एकदा ही कविता आपल्या मनात साचवून. आणि तुम्हाला काय वाटते, ते नक्कीच शेअर करा.               


अचानक कसं सगळं मराठी कविता | Achanak Kas Sagal Marathi Kavita | Spruha Joshi       



चानक कसं सगळं 

शांत शांत होतं, 

श्वास रोखून धरतं सूर्यबिंब 

बुडत बुडत जातं .. 


किनाऱ्यावर येत राहतात 

लयदार लाटा ,

उन्हामधून शोधत राहतात 

ढग वेगळ्या वाटा .. 


नारिंगी सोनेरी होतं 

केशराचं पाणी 

भरतीच्या आवेगाला 

वेदनेची गाणी.. 


वाळू सरकत जाते आणि 

पावलं भिजत राहतात,

समुद्राचा कण अन् कण 

शोषून घेऊ पाहतात. 


पल्या आत वाजत राहते 

हळुवार गाज 

अंधारावर चढत जातो 

चंद्रवर्खी साज . 


क्की कोण असतो आपण 

अशा वेळी खरंच?

आत्ता, इथे 'एकटे' आहोत 

तेही एक बरंच.. !! 


                                            कवयित्री - स्पृहा जोशी

आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला अचानक कसं सगलं कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The poetry content published in this blog is by poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem





 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!