आजी म्हणजे बालपणातील हक्काची व्यक्ती. तिच्या शिवाय बालपण कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि खरं तर.. आजीसाठीही नातवंड म्हणजे एकातांतला आधार. तुम्ही बघितलं असेल, एक वेळ तिला आपला मुलगा दिसला नाही तर ती एवढी काळजीत पडत नाही, परंतु तिला तिची नातवंड दिसली नाही, तर ती कावरीबावरी होते. खरच... आजीचं आणि नातवंडांचं नात हे अखंड नात्याचं प्रतिक आहे.
मित्रहो अंगणातलं चांदण आजी शिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला सांगतो, बालपणी आजी आम्हाला अंगणात बसून राजा राणीच्या गोष्टी सांगायची. किती मस्त वाटायचं हो.. कधी वेळ निघून जायचा ते कळायचे देखील नाही.
Read More : कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj
Poem Content Credit to Sanket Mhatre & Image Credit to Spruha Joshi
Read More : कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj
अशा या आजी बद्दल कवीने खूप छान पद्धतीने आपल्या मनातील भावना येते मांडल्या आहेत. प्रत्येक ओळ तुम्हाला बालपणात घेवून जाईल. मला वाटत, येथे लिहिलेली प्रत्येक ओळ तुम्ही सगळ्यांनी नक्कीच अनुभवली असणार आहे. तुमच्या जर आजी बद्दल आठवणी मनात दडल्या असतील, तर त्या नक्कीच आम्हाला शेयर करा. आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून इतरांना ही शेयर करू.
आजी: कवितेची ओळ मराठी कविता | Aji MarathiPoem | Memories of Grandmother
आजीच्या सुरकुत्यांमध्ये दडली आहेत बालपणातली असंख्य पावलं.
भूतकालीन शेणानं सारवलेल्या ओसरीपासून वर्तमानकाळाच्या व्हरांड्यापर्यंत चालत जाणारी.
माझी आजी मृत्यूला जगण्याचं फुल वाहत असते दर पहाटे.
ती स्वार होते श्लोक म्हणत वास्तवाच्या यानात
आणि रोज हरवून जाते शहराच्या ढिगाऱ्यात
आजीच्या ताज्या आठवणींचे देठ उगवले आहेत आमच्या संस्कृतीत.
बाबा लिहीत असतात काहीतरी शहराबद्दल, कवींबद्दल, घरांबद्दल.
स्वतःच्याच तुटत चालेल्या आतड्यांबद्दल.
आजी मात्र गुपचूप शहर होत जाते बाबांच्या कवितेत किंवा चिमणी होऊन बसते
बाबांच्या कुठल्याशा ओळीवर.
आजीची कातडी मी जपून ठेवली आहे, माझ्या कवितेत.
रोज तिची एक सुरकुती काढून एक कविता लिहितो.
आजही तेच केले आहे.
- संकेत म्हात्रे
आभार
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला आजी कवितेचा कंटेंट कवयित्री संकेत म्हात्रे यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Aaji poem published in this blog is by Sanket Mhatre. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem