चेहरा हा सर्वच लोकांचे, सौंदर्याची भूमिका बजावणारा शरीराचा महत्वाचा घटक. परंतु तुम्हाला माहित आहे का? चेहरा हा सौंदर्या बरोबर माणसाच्या मनातल्या भावना अचूक पद्धतीने दाखवण्याचं ही काम करतो.
कधी कधी माणूस बोलतो एक आणि करतो एक. म्हणजे एखाद्या माणसाला हसायचं नसत, परंतु लोकांच्या मनाचा मान ठेवण्यासाठी त्याला तिथे हसावं लागतं. काही लोकांच्या मनात खूप दु:ख दडलेलं असते. परंतु इतर लोकांच्या आनंदात विरजण नको म्हणून त्याला ही आनंदी असण्याची नकल करावी लागते. आणि असं अधिकांश लोकांच्या बाबतीत घडतं. आणि मुख्य या सर्व गोष्टी चेहरा बरोबर सांगत असतो.
या सर्व गोष्टींना समोर ठेवून, ह्या चेहरा कवितेत कवयित्रीने अचूक पद्धतीने उदाहरणासहीत चेहरा आणि मन एकमेकांना किती पूरक आहेत ते आपल्या समोर मांडल्या आहेत. शेवटी त्यांनी मनाच दु:ख ही सांगितलं आहे. कोणाला समजलं तर ठीक आहे आणि नाही समजलं तर कुणाला त्याचा काही दु:ख नसतं.
Poem Content and image Credit to Spruha Joshi
या सर्व गोष्टींना समोर ठेवून, ह्या चेहरा कवितेत कवयित्रीने अचूक पद्धतीने उदाहरणासहीत चेहरा आणि मन एकमेकांना किती पूरक आहेत ते आपल्या समोर मांडल्या आहेत. शेवटी त्यांनी मनाच दु:ख ही सांगितलं आहे. कोणाला समजलं तर ठीक आहे आणि नाही समजलं तर कुणाला त्याचा काही दु:ख नसतं.
एकदा ही कविता तुमच्या मनाच्या आतून नक्कीच वाचून घ्या आणि तुमच्या साठी चेहरा काय बोलतो, ते नक्कीच सांगा.
चेहरा मराठी कविता | Chehara Kavita | Poet Spruha Joshi
आज किती नंबरचं हसशील?
३१७, २७५ की ५०१?
हो, पण ते ३८ नंबरचं नको हं;
खूप वेळा रिपीट झालंय!
तेच एक्सप्रेशन फार वेळा रिपीट झालं
की नट खोटा आहे असं समजतात म्हणे..
हो! बरोबर आहे तुझं!
नटाचं तेच काम आहे म्हणा,
खोट्याचं खरं करणं..
पण ते प्रेडिक्टेबल झालं ना
की बाजारातली 'वर्थ' उतरते म्हणे..
असो, कुठे होतो आपण?
असो, कुठे होतो आपण?
हं.. अश्रू.. ते एका डोळ्यातून तीन थेंब
आणि दुसऱ्यातून असे खळ्ळकन फुटू दे
काच तडकल्यासारखे!
तेवढं एक साधलं, की मग
तेवढं एक साधलं, की मग
नेहमीच्याच ८८, ७५ आणि २७ नंबरच्या
प्रेम, आशा आणि लाज
अशा मागोमाग कट- पेस्ट कर
की झालंच.
अरे.. हो हो!
अरे.. हो हो!
सकाळपासून रात्रीपर्यंतचा
स्क्रीनप्ले रंगवायला
एवढं कॅलक्युलेशन खूप झालं!
नाहीतरी मन काय?
नाहीतरी मन काय?
असलं तर असलं;
नसलं तर..
तसंही कोणाला दिसलं..!!??
कवयित्री - स्पृहा जोशी
आभार
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला चेहरा कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Chehara poem published in this blog is by Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem