Deva Yahi Deshant Pavus Pad Marathi Kavita by Poet Di.Pu Chitre

SD &  Admin
0


रच.. पाऊस आणि शेतकरी याच नातं माय लेकरा सारखं असते. लेकरू कितीही खट्याळ आणि मास्तोखोर असलं, तरी माय कधीच त्याला आपल्या पासून दूर करत नाही. परंतु  एखाद्या वेळी माय रुसली की लेकराची काय अवस्था होते, हे शब्दात सांगण फार कठीण आहे.

देवा, याही देशात पाऊस पाड मराठी कविता | कवी : दि. पु. चित्रे
                                                          Poem Content Credit to Di.Pu Chitre


याचं अनुशंगाला धरून कवी दि. पु. चित्रे हे देवाला साकडे घालत आहेत की, देवा कोणीही पाण्याविना नाही राहिला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी पाऊस पाड आणि सगळ्यांना आपल्या अमृत जलाने तृप्त कर. या कवितेत त्यांनी अनेक अलंकारांनी पावसाला साकडे घातले आहे. या पूर्वी आपण अनेक दुष्काळी भागाचे चित्र बघितले असेल. फार मोठी दैनीय अवस्था आपण बघतली असेल. काही ठिकाणी पिके जाळून खाक झाली होती. पिकांची ही अवस्था बघून शेतकऱ्याच्या मनाला काय वाटले असेल, हे वर्णन करने खूप कठीण आहे.

Read More : कणा कविता : कवी कुसुमाग्रज | Kana Poem : Poet Kusumagraj

या कवितेचा आशय खूप गहन आहे. आणि तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. अनेक कवींनी पावसावरती आणि बळीराजा वरती कविता केल्या आहेत. त्या पैकी ही कविता देखील सामाजातील कठीण प्रश्नांना उजाळा देते.

देवा, याही देशात पाऊस पाड मराठी कविता | कवी : दि. पु. चित्रे 


देवा, ह्याही देशात पाऊस पाड  

जिथे पाण्याला येतो खुनाचा वास

जिथे हिंसेच्या मळ्यात पिकतो ऊस किंवा ताग

देवा, जिथे तू आहेस तोवर निषिद्ध आहे वैताग

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे माणसांचं ख़त घालून समाज उगवतात

जिथे बळी जाणारे तुझ्यावर विश्वास ठेवतात

आणि बळी घेणारे तुझेच अवतार असतात

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

जिथे दुष्काळही नशिबं फळवून जातात

जिथे माणुसकीची यंत्र अखंड चालू असतात

जिथे परोपकाराचा ओव्हरटाईम सदैव चालतो

देवा, ह्याही देशात पाऊस पाड

कारण इथे भरपूर खाणारे गाणी गातात

आणि ऊपाशी मरणारे त्यांना साथ करतात

जिथे दुश्काळ आणि सुकाळ एकत्र नांदतात

देवा, ह्याही देशात पाऊस पाड


                                                कवी : दि. पु. चित्रे 


आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला देवा या ही देशात पाऊस पाड कवितेचा कंटेंट कवी दि.पू चित्रे यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Deva Yahi Deshant Pavus Pad poem published in this blog is by Poet Di.Pu Chitre. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!