Kalcha Pavus Marathi Kavita by Poet Yashwant Manohar

SD &  Admin
0


'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही' कवितेच्या या पहिल्याच ओळीवरून आपल्याला संपूर्ण संदर्भ लागून जातो की, या कवितेत प्रत्येक्षात काय आहे.

छोटीसी कविता आहे, परंतु खूप काही आपल्याला सांगून जाते. ही कविता वाचून शेतकरी माणसाचं हृदय नक्कीच गहिवरून येईल. पहिल्यांदा मी जेव्हा ही कविता वाचली तेव्हा, एक शेतकरी म्हणून माझ्या मनाला चटका लागल्यासारखे वाटले.

कालचा पाऊस मराठी कविता | Kalcha Paus Marathi Kavita | कवी : यशवंत मनोहर
                                              Poem Content Credit to Poet Yashwant Manohar


आजच्या घडीला पावसाचे अनियमितपणा खूपच वाढला आहे. त्यामुळे अधिकांश दुष्काळी भागात पावसाचं प्रमाण खूपच कमी असते. शेतीला पुरेस पाणी ही मिळत नाही. त्यामुळे शेतीला चांगले पीक येत नाही, परिणामी शेतकरी नैराश्येच्या छायेत निघून जातो. कधी कधी तो आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवून टाकतो.


 कवितेची प्रत्येक ओळ ही शेतकऱ्याची व्यथा सांगत आहे. आणि कवी यशवंत मनोहर यांनी छोट्या शब्दात उंच अर्थ सांगितला आहे. मला वाटत अशा कविता नक्कीच वाचल्या पाहिजेत. जेणे करून कधीही न बघितलेल्या आणि न ऐकलेल्या गोष्टी आपल्या समजल्या जातात.       
                  

कालचा पाऊस मराठी कविता | कवी यशवंत मनोहर  



कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली, माथी हरपली
नदीच्या काठाने मरण शोधित फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही...

                                                    कवी : यशवंत मनोहर 
       

आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला कालचा पाऊस कवितेचा कंटेंट कवी यशवंत मनोहर यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Kalcha Pavus  poem published in this blog is by Poet Yashwant Manohar. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!