कोकणातील मातीची घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण

SD &  Admin
0


कोकणातील मातीचं घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण

सं म्हणतात, कोकण म्हणजे देवाला पडलेलं स्वप्न. आणि ते खरच आहे. तुम्ही जेव्हा कोकणाचं सौंदर्य आणि कोकणची संस्कृती अनुभवता, तेव्हा त्याचा प्रत्येय तुम्हाला नक्कीच येतो.

मी कोकणचा भूमीपुत्र आहे. आणि कोकण माझ्यासाठी काय आहे, हे मला शब्दात वर्णन करता येणार नाही. मी सतत कोकणाला शोधत असतो. सतत माझ्या कोकणाला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज पर्यंत माझी भूक कधीच संपली नाही. मुळात माझं कोकण आहेच सुंदर आणि गुणी. खरं तर.. मीच गुणगान गात नाही तर, माझ्या कोकणात येणारा प्रत्येकजण गुणगान गातच आपल्या घरी जातो. असं आहे माझं कोकण.

कोकणातील मातीचं घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण

मी सतत कोकणाबद्दल लिहित असतो. आणि पुढे ही सतत लिहित राहणार आहे. मला वाटत असत की, माझं कोकण सर्वांपर्यंत पोहोचाव आणि येथील संस्कृती सगळ्यांना माहिती व्हावी. हाच त्या मागचा उद्देश आहे. आज या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला कोकणातील मातीचं घर कशी असतात, ते सांगणार आहे. आमच्या येथे मातीच्या घरांना मांगर सुद्धा म्हणतात. दोन्ही ही शब्द तुम्ही वापरू शकता.

पूर्वीच्या लोकांच्या मनात घरांबद्दल जी संकल्पना होती, ती आज संपत चालली आहे असे वाटते, आणि ते बरोबर ही आहे. जर आज तुम्ही कोकणातील घर बघतली, तर सगळी कडे चिरेबंदी आणि सिमेंट कॉंक्रीटचा वापर करून बांधलेली दिसतील. परंतू पूर्वी असं नव्हत. पूर्वी घर मातीच्या भिंती आणि गवताच छप्पर यांनी बनवलेलं असायचं. फार सुंदर घर होती. यांध्ये निसर्गाला प्रथम प्राधान्य दिलेलं असायचं. घराच्या भोवती अंगण असायचं. घराच्या चारी बाजूनी झाडे असायची. त्यामुळे सतत गारवा असायचा. घरं अगदी हिरवी गार दिसायची. शहरातून जेव्हा माणूस गावाला येयाचा, तेव्हा त्याला त्या घरात शांती मिळायची. आणि मी या अनुभवाचा साक्षीदार आहे. मला त्या मातीच्या घरातच जास्त आनंद मिळतो. उन असो, पाऊस असो किंवा थंडी. या घरात नेहमी तुम्हाला मायेची उबच भेटेल.

कोकणातील मातीचं घरं | कोकणातील मांगर | Kokanatil Mangar | माझं कोकण

या घरात जास्त पैसा नव्हता, परंतु येथे, प्रेम आणि मनाला शांती होती. त्यावेळीची लोकं ही खूप प्रेमळ आणि मायाळू होती. पैसाने गरीब होती, परंतु मनाने श्रीमंत होती. तुम्हाला सांगतो, तेव्हा गावात तुम्हाला कधीच उपाशी असलेला माणूस भेटत नव्हता. कारण एक वेळ घरात खायला काही नसलं, तर शेजारी पाजाऱ्यांकडे हक्काने मांगू शकत होतो. आणि तिथे काही तरी मिळणार आहे याचा विश्वास असायचा. पण आता सांगताना दु:ख वाटत की, आज तो विश्वास कुठे तरी कमी होताना दिसतो आहे.

माझा जन्म हा ९० व्या दशकातला, त्यामुळे माझं मातीच्या घरातच बालपण गेलं. आज मात्र घराच्या रचना बदलत गेल्या आणि पर्यावरण पूरक घराचा ऱ्हास झाला. आज जेव्हा जेव्हा त्या मातीच्या घरात राहिलेल्या घराची आठवण येते, तेव्हा बालपणीच्या सुखद जीवनाची भरभरून आठवण येते. मन एका वेगळ्याच आनंदाने नाचू लागते. आज जसे  फ्रीज आणि पंख्याच्या शिवाय लोकांना राहणे मुश्कील असते, तसे त्या वेळी नव्हतं. घरं ही पर्यावरण पूरक असल्यामुळे घरात हवा खेळती असायची. चारी बाजूने मातीच्या भिंती असल्यामुळे घरात तापमान संतुलित असायचे. एकंदरीत काय... सगलं काही निसर्गाच्या नियमाला धरूनच होतं. म्हणून माणूस सुखी आणि निरोगी होता. परंतु आज माणूस सुख सोयीनी संपन्न घरात राहतो, परंतु सतत रोगी जीवन जगतो. शरीर त्याला साथ देत नाही. सध्या आपण पाहिलं तर तुम्हाला दिसेल की, माणसं म्हातारी होऊन मृत होणे फार कमी दिसते. ऐन सत्तरीच्या आता माणूस धरती सोडून निघून जातात.

माझं सगळ्यांना विनंती आहे की, आता तरी सगळ्यांनी पर्यावरण पूरक वातावरणात राहायला शिकल पाहिजे आणि ते आपल्याला खेड्यात आणि निसर्गाच्या कुशीतच अनुभवयला मिळेल. यासाठी प्रथम मनाची तयारी ठेवा आणि आतापासूनच साधं जीवन जगायला शिका.

         
                              
                    
                 
              

                
                  

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!