माझे अंगणातील चांदणे | Maze Anganatil Chandane | ए डिलाईट लाइफ

SD &  Admin
0

 
"माझे अंगणातील चांदणे" माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. जेव्हा जेव्हा ते अंगणातील चांदणे आठवते, तेव्हा माझे हृदय गहिवरून येते. जसे तहान लागल्यावर घसा व्याकूळ होतो, त्याचप्रमाणे माझे मन देखील त्या आठवणींनी व्याकूळ होते.

माझी आजी त्या अंगणातील चांदण्यांची खरी आठवण. जेव्हा जेव्हा अंगणात चांदणे पडते, तेव्हा मला माझ्या आजीची आठवण खूप येते. खरं तर.. अंगणातील चांदणे आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे माझी आजी. माझ्या आजी शिवाय अंगणातील चांदणे माझ्यासाठी रिकामंच आहे.

आज मोठा झालो. परंतु लहानपणी ज्या पद्धतीने सायंकाळच्या चांदण्याकडे पाहत होतो, तसेच आज ही त्याच पद्धतीने सायंकाळच्या चांदण्याकडे पाहत असतो. मनात काय चालले आहे, ते माहित नसतं. परंतु मन मात्र कोणत्यातरी आठवणींनी आनंदी झालेले असते.

माझे अंगणातील चांदणे : ए डिलाईट लाइफ

तुम्हा सगळ्यांशी अशा गोष्टी शेअर करताना खूप आनंद होत आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. तुम्हाला सांगतो बालपणी मला राजा राणीच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या. आज ही आवडते. परंतु त्यावेळची रीतच वेगळी होती. कारण असे की, माझी आजी ही माझ्या गोष्टींची गुरु आणि दुनिया होती. तिच्याकडे गोष्टींचा घडाच भरलेला होता. दररोज ती आम्हाला एकतरी गोष्ट सांगणारच. आणि मला तर दररोज एक गोष्ट ऐकल्याशिवाय झोपच येत नसायची. आणि मी खूपच हट्टी असल्यामुळे आजी आम्हाला दररोज एका गोष्टीची तरी सोय करून ठेवायची.

माझ्या घरात आम्ही सात ते आठ भावंड होतो. या सगळ्यात मी खूप लाडला आणि मस्तीखोर होतो. घरात काहीही आणलं तर ते मलाच आधी पाहिजे म्हणून माझा हट्ट असायचा. आणि बहुतांशी माझी भावंड ही ते मान्य करायची. आणि कदाचित त्यांनी असं नाही केलं, तर त्यांच्या डोक्यावर बसून ते त्यांना मान्य करायला लावायचो. यात माझी आजी मला सतत साथ देत असायची. खरं तर, तिचा मी खूपच लाडका होतो. मला कोणीही मारलेलं अथवा चुकीच बोललेलं तिला आवडायचं नाही. आणि जर कुणी असं धाडस केलं, तर माझी आजी त्याला काही सोडत नव्हती. असी माझी आजी, मला खूप प्रिय होती.

Also Read: ९० व्या दशकातलं बालपण | कधी ही न संपणारा प्रवास | 90th Childhood Memories | ब्लॉग - १

Also Read: ९० व्या दशकातील बालपण | Childhood in the 90s | माझा पहिला पावसाला | ब्लॉग - २

शाळेतून घरी आल्यावर अभ्यास वैगरे झाला की, मग आम्हाला चाहूल लागायची, ती म्हणजे 
आज आजी कोणती गोष्ट सांगणार आहे. मी तर पटपट अभ्यास आवरून आजीच्या कुशीत येऊन तिच्या सुंदर वाणीतून गोष्टी ऐकण्यात दंग होऊन जायचा. तिची गोष्ट सांगण्याची पद्धत एवढी प्रभावी होती ना... मन आणि शरीर माझं अगदी खिळून बसायचं. कधी कधी मोठी माणसं देखील गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या आजीच्या जवळ येऊन बसायची. खरच.. तेव्हाचा काळ किती सुंदर आणि शांतीप्रिय होता. कोणाला कशाचाही माज नव्हता. सगळीकडे आनंदी आनंदीगडे होते. मी आज स्वतःला नशिबवान समजतो की, माझा जन्म हा ९०व्या दशकात झाला आणि तो ही कोंकणासारख्या निसर्गरम्य प्रदेशात. 

वाढत्या वयानुसार आता माझ्या आजीला गोष्टी सांगायला जमत नव्हते. ती सांगण्याचा प्रयत्न करायची, परंतु तिला तिचे शरीर साथ देत नव्हते. माझं मन सारखं घाबरत होतं. माझ्या आजीच्या चेहऱ्याकडे बघितलं की वाटायचं, काय होत असेल माझ्या आजीला? तिचं काही दुखत तर नसेल? तिला कसली भीती तर वाटत नसेल? मी माझ्या आजीला कशी मदत करू? मी सतत माझ्या आजीकडे बघत असायचा. आजीला ही मला जवळ घेऊ वाटत होतं .तसा तिचा चेहराच सांगत होता. मी माझ्या आजीला एकटं वाटू नये म्हणून, तिच्याच जवळ बसलेला असायचा. तिला काय पाहिजे ते बघायचा. माझ्या कडून जेवढी मदत होईल तेवढी मदत मी माझ्या आजीला करायचा. तिच्या कोणत्याही इच्छा अपुऱ्या राहू नयेत म्हणून धडपड करत बसायचा. माझी धडपड बघून माझी आजीच्या चेहऱ्यावर हसू येयाच,. हे बघून मला खूप बरं वाटायचं.

आणि तो दिवस उजडला. माझी आजी खूप दूर जाणार होती, आणि तेच झाले. मी खूप दु:खी झालो. मला सतत माझ्या आजीची आठवण येत होती. तिचं प्रेम. तिने अंगणात बसून सांगितलेल्या गोष्टी. अश्या अनेक आठवणींनी मी बुडून गेलो. खरच.. घरात आजी असणे किती चांगले आणि आधाराचे असते, ते मला माझी आजी गेल्यानंतर कळकळीने जाणवून येवू लागले. 

आज मोठा झालो. परंतु माझ्या आजीने जो वारसा मला बालपणात दिला होता, तो आज ही चालवत असतो. अंगणात ज्या जागेवर बसून माझी आजी गोष्टी सांगायची, त्या जागेवर बसून मी सतत आकाशाकडे पाहत असतो. त्यावेळी माझ्याबरोबर माझी भावंड ही होती, परंतु आता मात्र मी एकटाच त्या निरभ्र आकाशाकडे पाहत असतो. वाटतं, त्या आकाशातल्या चांदण्यापैकी एक माझी आजी तर नसेल? आणि म्हणून मी आज ही सतत चांदण्याकडे पाहत त्यांना मोजत असतो. त्यांना हाताने बाय बाय करत असतो. खरच.. बालपणीच्या आठवणी आता किती हव्या हव्यास्या वाटतात. वाटतं.. पुन्हा एकदा बालपणीचे दिवस मिळावेत. पण आपल्याला माहित आहे. गेलेले दिवस कधीच परत येणार नाहीत. आता मात्र आठवणीवरच दिवस काढावे लागणार.

बालपण हे सगळ्यांसाठीच प्रिय असतं. आपण बालपणीच्या आठवणींपासून कधीच वेगळ राहू शकत नाही. सुख- दु:खाच्या चढ उतारावर बालपणीच्याच आठवणी  आनंदाचे झाड म्हणून आपल्या सेवेला धावून येतात. आणि त्यात आपण मनसोक्त डुबकी मारतो. अशाच बालपणीच्या पारावर आपण केलेल्या बाललीलांच आनंदाचं झाड हे पुस्तक आहे. प्रत्येक शब्द हा तुम्हाला नक्कीच तुमच्या  बालपणीच्या विश्वात घेवून जाईल, हे विश्वासाने सांगेन. तुम्हाला जर बालपणीच्या विश्वातले जग जगायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. शुल्क फार कमी आहे. PDF आणि Amazon Kindle मध्ये उपलब्ध आहे.

 




  Buy Now Google Play Store : माझं गाव माझं बालपण 

माझ्या अंगणातील चांदणे हे माझ्या आजीची देण आहे. आणि मला तिला पुसावी बिलकुल वाटत नाही. जो पर्यंत जीवन आहे, तो पर्यंत माझ्या आजीचा वारसा मी असाच पुढे चालवत राहणार आहे. 

खरं तर.. प्रत्येकालाच अंगणातील चांदणे आवडत असते. कारण प्रत्येकाने अंगणात बसून अनेक बाललीला केलेल्या असतात. आणि त्या आज आठवणी म्हणून आपल्या आनंदाचे झाड झालेल्या असतात. तुमच्या या आठवणी बद्दल काय वाटते, ते नक्कीच कळवा.      



                    `                                                        

           

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!