Mazi Kanya Marathi Kavita by Kavi B

SD &  Admin
0


जुन्या काळात शाळेत गेलेल्या प्रत्येक मुलाने या कवितेचं रसपान नक्कीच केलेलं असणार आहे. खूप प्रसिद्ध आणि मायेने परिपूर्ण असणारी ही कविता आहे. नात्यामध्ये बांधलेली ही कविता वाचणाऱ्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

बाप आणि मुलगी यांच्या पवित्र नात्यावरती कवी नारायण मुरलीधर गुप्ते ( कवी बी ) यांनी अस्खलितपणे ही कविता लिहिली आहे. या कवितेचं गांभीर्य एक बाप आणि एक मुलगीच समजू शकतात. मला या कवितेचं गांभीर्य आणि तिच्या मध्ये असलेली मायेची उब जाणवली म्हणून तिला आपल्यापुढे सादर करावीशी वाटली. 

माझी कन्या मराठी कविता | Mazi Kanya Marathi Kavita | कवी :  बी
                                                           Poem Content Credit to Kavi B


येथे बापाला आपल्या मुलीच्या मनात दडलेल्या भावना रुपी प्रश्नांना सोडवता खूप घालमेल झालेली असते. तरीही तो बापच. आपल्या मुलीचं सांतवन किती मायेने तो करतोय. हे असं करण फक्त बापालाच जमतं.

Read More : माझ्या मित्रा मराठी कविता | Mazya Mitra Marathi Kavita | कवयित्री : अरुणा ढेरे

खूप गरीब असलेल्या मुलीला शाळेत तिच्या मैत्रिणी खूप चिडवतात. तिला भिकारीण सुद्धा म्हणतात. तिला सतत चिडवत बसतात. त्यामुळे ती बिचारी मुलगी दु:खी झालेली असते. घरी येऊन ती आपल्या बापाला सगळा वृतांत सांगते. आणि ती बापाजवळ खूप ढसा ढसा रडते. आपल्या लाडक्या मुलीला रडताना पाहून बापाला राहावेने. तिची कशी समजूत काढावी म्हणून तो मार्ग शोधू लागला. त्याला आपल्या दु:खी मुलीच्या मनातून अशा कृत्यांना बाहेर काढायचे असते. म्हणून ते मुलीला समजावतात. चिखलातल्या कमळाची गोष्ट सांगतात. ते तिला म्हणतात, कमळ चिखलात असते म्हणून ते घाणरडे असते का? नाही.. ते चिखलात राहून ही सुंदर आणि जगाला सुघंधित करते. मग तुझ्या सारखी सुंदर आणि गुणी मुलगी कशी काय भिकारणी होऊ शकते? तू अशा मुलींकडे लक्ष देवू नकोस.

पुढे बाप अनेक सुंदर अलंकारांनी नटलेल्या उदाहरणांनी आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करतो. कवितेची प्रत्येक ओवी हा अमृतासमान आहे. वाचताना कधी मनात भरते ते समजत नाही. मला वाटते, तुम्हाला ही या कवितेचं रसपान करायला पाहिजे. 

  माझी कन्या मराठी कविता | Mazi Kanya Kavita | कवी : नारायण मुरलीधर गुप्ते ( कवी बी )  


गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?

का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?

उभय पितरांच्या चित्तचोरटीला

कोण माझ्या बोलले गोरटीला ?

ष्ण वारे वाहती नासिकात

गुलाबाला सुकविती काश्मिरात,

नंदनातिल हलविती वल्लरीला,

कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची

दूड रचलेली चिमुकली मण्यांची

गडे ! भूईवर पडे गडबडून,

का ग आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या

अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या

गौर चैत्रींची तशा सजुनि येती,

रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान

पाहुनीया, होवोनि साभिमान

काय त्यातिल बोलली एक कोण

’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

मुली असती शाळेतल्या चटोर;

एकमेकीला बोलती कठोर;

काय बाई ! चित्तांत धरायाचे

शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

त्‍न सोने मातीत जन्म घेते,

राजराजेश्वर निज शिरी धरी ते;

कमळ होते पंकांत, तरी येते

वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?

धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?

सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?

कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान

नशीबाची चढतीच तव कमान;

नारिरत्‍ने नरवीर असामान्य

याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,

सरस्वतिही असणार सहज तेथे;

रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,

भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

नेत्रगोलातुन बालकिरण येती,

नाच तेजाचा तव मुखी करीती;

पाच माणिक आणखी हिरा मोती

गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,

त्यात चंद्राचे चांदणे पडावे;

तसे गाली हासता तुझ्या व्हावे,

उचंबळुनी लावण्य वर वहावे !

|गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या

छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या

सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा

खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,

विविध वसने वा अधिक शोभवावे ?

दानसीमा हो जेथ निसर्गाची,

काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

रे सारे ! पण मूळ महामाया

आदिपुरुषाची कामरूप जाया

पहा नवलाई तिच्या आवडीची

सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे

प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;

विश्वभूषण सौंदर्यलालसा ही

असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,

सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;

तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,

विलासाची होशील मोगरी तू !

पःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,

’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;

पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,

’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,

’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;

दिवसमासे घडवीतसे विधाता

तुला पाहुन वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,

कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,

हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,

परी आवरि हा प्रलय महाभारी !

गे बळकट झाकोनि चंद्रिकेला,

तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,

हास्यलहरींनी फोडुनी कपाट

प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,

कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;

तदा बापाचे ह्रदय कसे होते,

न ये वदता, अनुभवि जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,

असा माझा अभिमान गरीबाचा

प्राप्त होता परि हे असे प्रसंग

ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्‌गुणी बालकांना

काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?

लांब त्याच्या गावास जाउनीया

गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली

पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !

गळा घालुनि करपाश रेशमाचा

वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !


                                                    कवी : नारायण मुरलीधर गुप्ते ( कवी बी )


आभार आणि क्रेडीट  

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला माझी कन्या कवितेचा कंटेंट कवी बी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of mazi kanya poem published in this blog is by Kavi B. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!