खऱ्या मैत्रीची गाथा किती मोठी असते, हे या कवितेमधून कवयित्री अरुणा ढेरे यांनी उत्तमपणे आपल्या समोर मांडली आहे. वाचताना खरच.. मैत्री कशी असावी, हे आपल्याला समजून येते.
नाती ही काचेसारखी असतात. कधी तडा जाईल हे सांगता नाही. यामध्ये मैत्री हे नात असं असते, ते जर निभावलं गेलं तर, या सारखं नातं दुसरं नाही. हे नातं घट्ट या साठी असते, कारण येथे शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुखाला प्राधान्य दिले जाते. आणि जिथे असे नाते निर्माण होते, तेव्हा तिथून मैत्रीची सुगंध यात्रा सुरु होते.
Read More: उन उन खिचडी मराठी कविता | Un Un Khichadi Marathi Kavita | कवी : मो.दा.देशमुख
मैत्री बद्दल प्रत्येकाच्या मनात खूप काही दडलेलं असते. प्रत्येकाला मैत्री करावी वाटते आणि आयुष्यात एकतरी मित्र निश्वार्थ प्रेम करणारा असावा असे वाटते. असच... तुम्हाला ही या मैत्री बद्दल काय वाटते, ते नक्कीच कळवा.
माझ्या मित्रा मराठी कविता | Mazya Mitra Marathi Poem | Poet : Aruna Dhere
ऐक ना,
मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर
आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही
आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करू नकोस,
हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,
तर प्रेमिक असशील,
समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील ?
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे
समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,
कवयित्री : अरुणा ढेरे
आभार आणि क्रेडीट