विचार माणसाला बदलायला भाग पाडतात. यात जर विचार चांगले असतील तर मनुष्य चांगला व्यक्ती बनतो. परंतु विचार जर वाईट असतील तर मनुष्य वाईट मार्गाला जातो. म्हणून म्हणतात की, ज्याचे विचार आणि वाचा चांगली आणि पवित्र असते, त्या माणसाच्या विचारात साक्षात सरस्वती वास करते,
Image credit to Spuha Joshi
Also Read : चांगले विचार मेसेज | Good Thought Marathi Message
अशा वेळी माणसाला जर कोणी चांगला गुरु मिळाला तर, त्या व्यक्तीला निसंदेह या रोगातून मिळू शकते. या साठी सर्वप्रथम आपली ही तयारी लागते. प्रेरणादायी विचार माणसाच्या खोलवर जाऊन वाईट विचारांना नष्ट करून माणसाला नवीन जीवन जगण्यास मदत करतात.
म्हणून आपल्याला सतत प्रेरणादायी विचार ऐकले पाहिजे आणि त्याप्रमाणे वागले पाहिजे. मी या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रेरणादायी विचार पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्यासाठी नक्कीच ते फायदेशीर होतील अशी मला आशा आहे.
प्रेरणादायी विचार मेसेज | Motivational Quotes | सकरात्मक विचार मेसेज
जीवनाचं सौंदर्य यात नाही की,
तुम्ही किती आनंदी आहात.
तुम्ही किती आनंदी आहात.
सुंदर जीवन यातून कळतं,
की तुम्हाला भेटून किती लोकं आनंदी आहेत.
किनाऱ्यावर सागराचा
खजिना नाही येत पुन्हा
आयुष्यात मित्र जुने नाही येत
जगा या क्षणांना हसून
मित्रानों, पुन्हा फिरून
मैत्रीचा काळ नाही येत!
एवढे लहान बना की
प्रत्येकजण तुमच्यासोबत बसू शकेल
आणि एवढे मोठे बना की,
जेव्हा तुम्ही उभे राहाल
तेव्हा कोणीही बसलेला नसेल.
स्वतःला असं बनवा
जिथे तुम्ही आहात तिथे
तुम्हाला सर्वानी प्रेम करावं.
तिथून तुम्ही जाल,
तिथे सर्व तुमची आठवण करतील.
जिथे तुम्ही जाणार असाल तिथे,
सर्व तुमची वाट पाहत असतील.
संयम ठेव, वाईट दिवसही निघून जातील
आज तुला पाहून हसतात,
ते उद्या तुला पाहतच राहतील
ज्याप्रकारे लिंबाच्या रसाचा
एक थेंब हजारो लिटर दूध नासवतो,
त्याच प्रकारे माणसाचा अहंकार सुद्धा
चांगली नाती नासवतो.
जीवनामध्ये आपली तुलना,
कधीच कुणाशी करु नका.
तुम्ही जसे आहात तसेच सर्वश्रेष्ठ आहात,
कारण देवाची प्रत्येक रचना ही सर्वोत्तम
आणि सर्वश्रेष्ठ आहे.
जगातील सर्वात अवघड शब्द आहे वा !
जेव्हा तुम्ही कोणासाठी असे बोलता
तेव्हा तुम्ही तुमच्या अहंकारालाच सोडत
नाहीत तर मनसुद्धा जिंकून घेता
आंधळ्याला देवळात बघून लोकं त्याला हसू लागले व
म्हणाले मंदिरात दर्शनासाठी आलास तर काय
देवाला पाहू शकशील? त्यावर तो म्हणाला, काय
फरक पडतो देव तर मला बघू शकतो न,
दृष्टी नाही दृष्टीकोन चांगला असावा.
एक चांगल जीवन जगण्यासाठी
हे स्वीकारणे आवश्यक आहे की,
सर्व काही सर्वांना नाही मिळू शकत.
ना गोष्टीनी ना पैशांनी
जीवन तर बनते फक्त नात्यांनी
जीवनाला सोपं नाही फक्त स्वतःला
खंबीर बनवावं लागतं.
योग्य वेळ कधीच येत नाही,
वेळेला योग्य बनवावं लागतं.
समस्यांपासून पळत राहिलास तर,
त्या तुमचा पाठलाग करतच राहतील.
त्याचा सामना करून बाहेर पडलात,
तर त्यापासून कायमची मुक्ती मिळेल.
सुखासाठी कधीकधी हसावं लागतं
तर कधी रडावं लागतं.
सुंदर धबधबा बनण्यासाठी
पाण्याला उंचावरून पडाव लागतं.
इतरांसाठी जगत होतो तर
कोणाला काही तक्रार नव्हती
जरा स्वतःसाठी काय विचार
केला तर सर्व जग शत्रू बनलं
इच्छा पूर्ण झाली नाही तर
क्रोध वाढतो आणि
इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो
पराभवाने माणूस कधीच
संपत नसतो
तो तेव्हा संपतो
जेव्हा तो प्रयत्न
करणे सोडतो