कवी ग्रेस यांच्या अधिकांश कविता मावळतीकडे नेणाऱ्या म्हणजेच संध्या कविता आहेत. निरोप कविता देखील याचं साच्यातील आहे. कवितेच्या नावावरूनच आपल्याला समजते की.. आयुष्याच्या सरतेवक्त मनात राहिलेल्या इच्छा / वेदना आपल्या माणसाला सांगत आहे.
Poem Content and image Credit to Poet Grace
Read More : जोगिया मराठी कविता | Jogiya Marathi Kavita | कवी : ग. दि. माडगूळकर
मला ही कविता खूपच आवडली. आणि या कवितेत अनेक भावार्थ आहेत, ते मनाला चटका देतात. तुम्हाला ही कविता खूप आवडेल. जर ही कविता तुमच्या मनाला भावली, तर नक्कीच कमेंट्स द्वारा प्रतिक्रिया कळवा.
कवी ग्रेस यांची निरोप कविता | Nirop Poem Of Poet Grace
मी खरेच दूर निघालो
तू येवू नको ग मागे
पाऊस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे
शेतावर ढग अडलेला
घे त्याला मागून पाणी
झाडावर कोकीळ येतं
घे मागून एक विराणी
या फुलपाखरांनाही
ते उरेल मरणावाचून
सगळ्याच ऋतूंना मिळते
दुःखाचे उत्कट दान...
भरपूर सोडली आहे
पडवीत निजेला जागा
अन दूर तुझ्यावून दूर
प्राचीन फुलांच्या बागा
थिजलेल्या वेलूनमधला
लगटेल तुलाही वारा
पाऊस थांबल्यावरही
ताऱ्यांच्या पडतील गारा...
उध्वस्त मंदिरे येतील
नजरेत तुझ्या दिप्तीने
खंडांतर करते पक्षी
दिसतील तुला तृप्तीने..
माझ्याहून गर्द मिठीचा
अंधार गळ्याला येईल
शिल्पास रूप देणाऱ्या
हातांचा विळखा होईल
फुटणार अशा अनुरादे
वेदनेस नसते वीण
पडछाया तुडवीत जाणे
अंगाईत फक्त मुलांना तू सांग एवढे गाणे...
कवी : ग्रेस
आभार
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला निरोप कवितेचा कंटेंट कवी : ग्रेस यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
आभार
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला निरोप कवितेचा कंटेंट कवी : ग्रेस यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Nirop poem published in this blog is by Poet Grace. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem