पक्षांची शाळा | Pakshanchi Shala | 90th Childhood Memories

SD &  Admin
0


माझ्या बालपणीचा प्रवास हा अनेक सुखद आठवणींनी भरलेला आहे. आणि आज त्या आठवणी आनंदाचे झाड म्हणून सतत माझ्या सोबत असतात. मी स्वतःला खूप नशिबवान समजतो की, माझे बालपण हे ९० व्या दशकात अनुभवायला मिळाले आणि ते ही कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशात.

माझ्या बालपणीच्या आठवणी सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्यापुढे सादर करत असतो. आणि आज या ब्लॉगच्या माध्यमातून, मी तुम्हाला माझ्या आठवणीतील पक्षांची शाळा कशी होती या बद्दल सांगणार आहे. 


प्रत्येक माणूस बालपणीच्या आठवणींवर जगत असतो. माझं ही तसच आहे. मला जेव्हा जेव्हा एकटं वाटतं, तेव्हा मी माझ्या बालविश्वातल्या आठवणीत बुडून जातो. याच आठवणीतील पक्षांची शाळा ही माझ्या हृदयाच्या अधिकच जवळ होती. खरं तर.. माझं निसर्ग आणि पशु - पक्षांवर खूपच प्रेम आहे. मी यांच्या शिवाय सुखद जीवन जगण्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही. आज जेव्हा जेव्हा मी गावाला जातो, तेव्हा जास्तीत जास्त वेळ हा निसर्ग आणि पशु - पक्षांसोबत घालवतो. आणि मला यांच्याजवळ मन शांती मिळते. तुम्हाला सांगतो, या जगात माणूस सोडला तर अन्य सर्व जीव निसर्गाच्या नियमानुसारच आपले जीवन व्यतीत करतात. म्हणून ते शरीराने हेल्दी जीवन जगतात. परंतु माणूस एवढी प्रगती करून ही रोगीट जीवनच जगत आहे.

पक्षांची शाळा | Pakshanchi Shala | 90th Childhood Memories

मी तिसरी-चौथीला असेल. त्या वेळी निसर्गाची प्रत्येक गोष्ट जिथल्या तेथे होती. त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंदगडे होते. मला त्यावेळी शाळा, खेळ कुदने आणि निसर्ग यांशिवाय दुसर काहीच काम नव्हतं. त्यावेळी मला पक्षांना हवेत उडताना बघायला खूप आवडायचं. लहानपणी माझ्या मनात सतत विचार येयाचे की, हे छोटे पक्षी एवढे लहान असूनही हवेत कसे काय उडतात? किती त्यांची मजा असेल ना...? कुठे ही ते फिरू शकतात. जर मला यांच्यासारख उडता आल असत तर, किती मजा आली असती? आणि एका गोष्टीचं मला नवल वाटायचं, जेव्हा मी शाळेत जायचा ना..  तेव्हा पक्षांचे थवेच्या थवे माझ्या शाळेवरून निघून जायचे आणि बरोबर शाळा सुटायच्या वेळी म्हणजे बरोबर ५ वाजता पुन्हा ते सर्व आपल्या घरी परतत असयाचे. आणि हे सगलं न चुकता दररोज होत असायचं. मला यांचा हा दिनक्रम खूप आवडायचा. त्यावेळी मला आणि माझ्या मित्रांना आमच्या सारखी पक्षांची ही शाळा असते, असेच वाटायचे. जेव्हा पक्षांचे थवे सायंकाळी आमच्या शाळेच्या वरून जायचे, तेव्हा गुरुजी ही आम्हाला म्हणायचे.., चला बाळानो.. पक्षांची ही शाळा सुटली आहे आता तुम्ही ही पाठ्या-पुस्तके दप्तरात ठेवा. या वरून तुमच्या लक्षात येईल की, पक्षांच्या दिनचर्ये वरती आम्हा मुलांचा आणि गुरुजींचा अभ्यास किती भक्कम  झाला होता.   

Read More: माझे अंगणातील चांदणे | Maze Anganatil Chandane | ए डिलाईट लाइफ

पक्षांची शाळा माझ्यासाठी हा एक विषय नसून आनंदाचा एक भाग आहे. म्हणून मी यांच्यापासून कधीच विभक्त राहू शकत नाही. लहानपणी मी आकाशात एकत्रित शेकडोच्या संख्येने पक्षी पाहायचा. त्यांना एक एक मोजताना मी सतत चुकायचा. कारण असे की, दुरून पक्षी एकसारखेच वाटायचे. पण मला त्यांना आकाशात उडताना बघायला आणि ते किती आहेत ते मोजायला खूप आवडायचे. खरं तर.. आज ही असं करायला खूप आवडतं. आज असं करताना लोकं लहान झालास की काय म्हणून चिडवतात. पण त्यांना काय कळणार, कधीकाळी हा आमच्या बालपणीचा आनंदाचा एक भाग होता. आम्ही बालपण यांच्याबरोबरच घालवलेल होत.

बालपण हे सगळ्यांसाठीच प्रिय असतं. आपण बालपणीच्या आठवणींपासून कधीच वेगळ राहू शकत नाही. सुख- दु:खाच्या चढ उतारावर बालपणीच्याच आठवणी  आनंदाचे झाड म्हणून आपल्या सेवेला धावून येतात. आणि त्यात आपण मनसोक्त डुबकी मारतो. अशाच बालपणीच्या पारावर आपण केलेल्या बाललीलांच आनंदाचं झाड हे पुस्तक आहे. प्रत्येक शब्द हा तुम्हाला नक्कीच तुम्हाला बालपणीच्या विश्वात घेवून जाईल, हे तुम्हाला विश्वासाने सांगेन. तुम्हाला बालपणीच्या विश्वात जगायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. शुल्क फार कमी आहे. PDF आणि Amazon Kindle मध्ये उपलब्ध आहे.

 

Maza gav Maza Balpan Book
 
Available on  Google Play Store : 
माझं गाव माझं बालपण 

या आनंदाबरोबर मला सतत काहीतरी चुकीची होत आहे वाटायचं. कारण असं की, मी जस जसे एक एक वर्ग पुढे पुढे जात होतो, तसं तसे पक्षांची संख्या कमी होताना दिसत होती. पुढे माझी दहावी झाल्यानंतर अधिकांश पक्षी गायबच झाले होते. पक्षांचे ते थवे आता बघायला सुद्धा भेटत नाहीत. एखादाच पक्षी हवेत उडताना बघायला मिळतो. मला वाटतं कदाचित तो इतर पक्षांची वाट पाहत असावा? आता तर.. आकाशात पक्षीच पाहायला मिळत नाही. बिचाऱ्यांच्या आयुष्याला कोणाची नजर लागली माहित नाही?

लहानपणी याचं कारण माहित नव्हतं. परंतु आता मात्र माहित झालं. याला आपणच जबाबदार आहोत. वाढते इंटरनेटचे जाळे आणि भरमसाट वृक्ष तोड यामुळे या पक्षी राजाचं आयुष्यच नष्ट झालं. पण मानवाला याचं काही देण घेण नसत. स्वतःच्या प्रगतीच्या पुढे इतर जिवांच आयुष्य त्यांच्या साठी माती आहे. मला वाटत असा विचार करणाऱ्या प्राण्याला राक्षसच म्हणावे लागेल. 

मला वाटत.. आपल्या सर्वांना या मुक्या पशु - पक्षांसाठी काही तरी केल पाहिजे. त्यांच्या रक्षणाची आपली जबाबदारी आहे. या धरतीवर स्थित प्रत्येक गोष्टीवर सगळ्या जीवांचा अधिकार आहे. आणि आपल्याला ते मान्य केले पाहिजे. 

तुम्हाला सांगतो.. माझ्या बालपणीच्या प्रत्येक गोष्टीबद्दल लिहायच्या आधी विचार करतो की, तुम्हाला थोडक्यात थोडक सांगाव.. परंतु मी लिहिताना एवढा वाहत जातो की, शब्दसंख्या अपोआप वाढत जाते. पण काय करणार आमचं बालपण होतच तसं. 

तुमच्या या विषयाबद्दल प्रतिक्रिया काय आहेत त्या नक्कीच कळवा......       
 


                  
 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!