Pavus Kadhicha Padato Marathi Kavita by Poet Grace

SD &  Admin
0


हान कवी ग्रेस यांची ही कविता. असे म्हणतात या कवीच्या कविता कधी कधी पटकन समजून जातात, तर कधी कधी आपल्या सारख्या सामान्य माणसाला अर्थच लागत नाही. परंतु एक मात्र नक्की त्या कवितेचा भावार्थ काय आहे, ते मनाला चटकन समजला जातो.

पाऊस कधीचा पडतो मराठी कविता | Pavus Kadhicha Padato | कवी : ग्रेस
Poem Content and image Credit to Poet  Grace  


पाऊस कधीचा पडतो कविता ही अशाच प्रकारची आहे. कवितेच्या ओळी वरूनच आपल्याला समजले असेल की, ही कविता दु:खात हरवेलेल्या कुण्या व्यक्तीची आहे. आयुष्यात आलेल्या दु:खाना मावळतीकडे नेता नेता त्या व्यक्तीला आलेल्या पिडांच येथे अस्खलितपणे वर्णन केले आहे.

Read More : अचानक कसं सगळं मराठी कविता | Achanak Kas Sagal Marathi Kavita | स्पृहा जोशी


कवी ग्रेस यांच्या कविता तुमच्या संग्रहात असायलाच पाहिजे. यांच्या कविता खरोखर हृदयाला भिजवून टाकतात. नक्कीच त्यांच्या कवितेचा आस्वाद घ्या. आणि तुम्हाला या कवितेमधून काय अर्थ लागला ते नक्कीच कळवा. 

                 

कवी ग्रेस यांची कविता पाऊस कधीचा पडतो | Poet Grace Poem : Pavus Kadhicha Padato 


पाऊस कधीच पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद स्वराने

डोळ्यांत उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडाला परा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शूभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला

संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनाऱ्यावरती, लाटांचा आज पहारा 


                                                        कवी - ग्रेस   



आभार आणि क्रेडीट 

या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला पाऊस कधीचा पडतो कवितेचा कंटेंट कवी ग्रेस  यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम  ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.

The content of Pavus kadhicha Padato  poem published in this blog is by Poet Grace. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem

               

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!