ज्या माणसाला शब्दाची गुंतागुंत सोडवता आली, त्या माणसाला आयुष्य चांगलं जगता येतं, असं मला वाटतं. परंतु कधी कधी शब्दाची सांगड घालणं अवघड होऊन जातं आणि पुढे नात्यात आपल्या रुसवा येऊन जातो. असा या कवितेचा सारांश सांगतो. आणि मला वाटतं, या कवितेत कवयित्री स्पृहा जोशी यांचाही लिहिण्याचा उद्देश हाच जवळपास असावा असे मला वाटते.
प्रेम हे दोन प्रकारे व्यक्त करता येते. एक म्हणजे आपल म्हणनं दुसऱ्याला बोलून आणि दुसरं निशब्द राहून आपल्या भावना चेहऱ्याच्या मदतीने दुसऱ्याला सांगणे. या सर्व प्रकारामध्ये आपले शब्दाची भावना खूप मोठा रोल बजावते. यातूनच दुसऱ्याला आपल्याबद्दल काय वाटते, ते सांगू शकतो.
Poem Content and image Credit to Spruha Joshi
Read More : द्वारका मराठी कविता | Dwarka Marathi Kavita | Prabha Ganorkar
याचं वेलीवर ती दोघं खूप प्रेम करतात. एकेमकांना आधार देतात. खूप दु:खे आली, भांडण झाली आणि बरेच काही, परंतु ते शब्दांची सांगड घालत आयुष्य आनंदी जगतात. परंतु कधी कधी शब्दांची सांगड चुकते आणि त्यांचा आनंदाचं पूल दु:खात हरवला जातो. दोघांना एकमेकांना समजून घेण्यात अडचणी येवू लागतात. दोघ एकमेकांना गर्द खाईत शोधू लागतात. परंतु ते आपल्या माणसाला जवळ येण्यासाठी आतुरतेने वाटत पाहत असतात. आणि त्यांनी तसा रस्ता ही मोकळा केलेला असतो.
या कविते बद्दल तुम्हाला काय वाटते, ते नक्कीच कळवा. वाट पाहत आहे.
या कविते बद्दल तुम्हाला काय वाटते, ते नक्कीच कळवा. वाट पाहत आहे.
शब्द मराठी कविता | Shabd Marathi Poem | स्पृहा जोशी यांची शब्द कविता
आपल्या दोघांमध्ये शब्द कधीच आले नाहीत
ते होते सतत आपल्यासोबत, आणि नव्हते ही, महत्वाचे होतेच आपल्यासाठी आणि नव्हतेही!
कारण अवघड वळणांचे शब्द अर्थासह पोचायचे,
कुणीही न समजावता...
हसरे, दु:खी, रागीट, गंभीर. असंख्य शब्दांची असंख्य वळणं
हसत हसत पर पडली, कारण संवादाचा पूल होता...!!
आता तो पूलच धुक्यात हरवलाय
आणि आपण दोघेही 'शब्दात' हरवलोय !
एकच सांगते, शब्द शोधता कधी मला शोधावसं वाटलं, तर मी तिथेच असेन दडलेली
शब्दांच्या आड...!!
कवयित्री : स्पृहा जोशी
कवयित्री : स्पृहा जोशी
आभार आणि क्रेडीट
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला शब्द कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Shabd poem published in this blog is by Poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem