'वामांगी' ही कविता कवी अरुण कोलटकर यांनी लिहिली आहे. स्त्रीच जीवन काय असते, हे त्यांनी शाक्षात आई जगदंबेच्या ( रुक्मिणी) तोंडूनच बोलून घेतलं. ही कविता माझ्या हृदयाच्या जवळची आहे. ही कविता वाचताना आपल्याला कशाचाही संदर्भ घेण्याची गरज नाही.
या कवितेत स्वतः आई रुक्मिणीच म्हणतात, युगानयुगे मी अशीच या विठेवरती उभी आहे. बाजूला काय चालले आहे ते कळतच नाही. आपण इथे स्त्रीचं जीवन जेल सारखं असते असा अर्थ घेतला तर काहीच चुकीचे ठरणार नाही. कुटुंबांबरोबर समाज ही स्त्रीचा शोषण करत असतो. घर आणि मुल संभाळणे या शिवाय स्त्रीला कोणताच अधिकार नसतो. आज २१ व्या शतकात जर अशी परिस्थिती आहे, तर या पूर्वीची कशी परिस्थिती असेल याचा विचार करतानाच अंगावर काटा येतो.
Read More : पृथ्वीचे प्रेम गीत मराठी कविता : कवी कुसुमाग्रज
Read More : पृथ्वीचे प्रेम गीत मराठी कविता : कवी कुसुमाग्रज
कवी अरुण कोलटकर यांनी खरच खूप छान पद्धतीने स्त्रीच्या जीवनावरती उजेड पाडत, तथाकथित समाजाला दोन चांगल्या गोष्टीचं ज्ञान दिलं. खूप काही आपल्याला सांगायची गरज नाही. कविता वाचताना आपल्याला सगलं काही समजून येईल.
वामांगी मराठी कविता | Vamangi Marathi Poem | Poet : Arun Kolatkar
देवळात गेलो होतो मधे
तिथं विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुस्ती वीट
मी म्हणालो -हायलं
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढं मागं
लागेल म्हणून
आणि जाता जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठं गेला
दिसत नाही
रख्माय म्हणाली
कुठं गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला
मी परत पाह्यलं
खात्री करुन घ्यायला
आणि म्हणालो तिथं
कोणीही नाही
म्हणते नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही
कधी येतो कधी जातो
कुठं जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं
एकटेपण
कवी : अरुण कोलटकर
आभार आणि क्रेडीट
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला वामांगी कवितेचा कंटेंट कवी अरुण कोलटकर यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The content of Vamangi poem published in this blog is by Poet Arun Kolatkar. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem