चांगल्या आरोग्यासाठी सर्वात चांगला आणि स्वस्त व्यायाम म्हणजे चालणे. यासाठी एकच करावे लागते, ते फक्त सकाळी लवकर उठण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सकाळचे चालणे आपल्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम असते. चालण्यामुळे माणूस हेल्दी तर होतोच, त्याच बरोबर आपण दिवस भर काम करण्यासाठी सक्रीय राहतो.
या हेल्दी लेखात आपण चालण्यामुळे आपल्याला कोणते फायदे होतात, त्यामुळे आपण आरोग्यपूर्ण जीवन जगतो. लेख आवडल्यास like आणि Share करायला विसरू नका.
सकाळचे चालणे चुकवू नकाच : Don't Miss the Morning Walk
१. सकाळी चालण्यामुळे संपूर्ण शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण होते, जी दिवस भर आपल्याला काम करायला सक्रीय करते.
२. सकाळी चालण्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते आणि शरीर सुडौल आणि निरोगी बनते.
३. शक्य असेल तर जिथे हिरवळ आहे जसे की बाग - बगीचा तिथे सकाळी चालण्याचा व्यायाम करावा.
पूर्ण आठवड्यातून १० ते १२ किलो मीटर चालले पाहिजे. जे लोक आठवड्यातून १० ते १२ किलो मीटर चालतात, ती लोकं हमेशा निरोगी राहातात. चालताना भर भर चालले पाहिजे.
४. ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे किंवा ज्यांचे वारंवार पाय दुखतात त्यांनी तर सकाळी चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे.
५. हिरव्या गावतावर अनवाणी पायाने चालले असता डोळ्यांना शक्ती मिलते.
६. ज्यांना हार्टचा प्रोब्लेम आहे, त्यांनी तर सकाळी व्यायाम करणे लाभदायक असते. कारण चालण्यामुळे हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि हृदय सक्षम बनते.
७. ज्यांना पोट साफ न होण्याची सवय आहे, त्यांनी कुठलेही औषध घेण्यापेक्षा नियमित सकाळी चालले असता त्यांची ही समस्या काही दिवसात कमी होईल.
संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे की, ज्या लोकांना चालण्याची सवय आहे, अशा लोकांचे आयुर्मान हे दुसऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक असते.
९. सकाळी फिरायला गेले असता तंग कपडे घालू नका. मोकळे कपडे आणि शूज वापरा.
१०. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा चालू नका. कारण चालण्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते आणि आजारी व्यक्ती अधिकच थकते. तेव्हा आजारी असताना चालू नका.
११. जेव्हा तुम्ही स्वस्थ्य असाल तेव्हा नक्की चाला. हे स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी, चालणे तुम्हाला मदत करेल.
१२. प्रातर्विधी झाल्यानंतर सकाळी चालण्याचा व्यायाम केला पाहिजे.
जपानमध्ये ओकिनावा बेटावर राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान हे अन्य लोकांच्या तुलनेत खूप अधिक आहे. येथे अधिकांश लोकं १०० वर्ष पार केलेली आहेत. ज्यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुमच्या आरोग्याचे सिक्रेट काय आहे? त्यावेळी त्यांनी सांगितले की, ते कमी जेवण, नैसर्गिक हवामान आणि दररोज १० ते १५ किलोमीटर चालतात.
Read More :