"आठवणीतल्या सरी" जन्म कोंकणातला, त्यामुळे पाऊस म्हणजे काय असतो याची प्रचीती नसा नसात भिनलेली आहे. या पावसाच्या सऱ्यामध्ये खेळताना, बागडताना जी मजा येत होती ती आज अनुभवयाला मिलने खूपच कठीण झाले आहे. मोठपण आल्यामुळे जबादारी नावाची बायको पाठीमांगे उभीच असते. त्यामुळे पावसामधल्या सऱ्यांसोबत खेळण्याचा क्षण हा कधी कधीच येतो. आणि जरी आली तरी लहानपनी जसी मजा येयाची तशी मजा आज येत नाही. मित्रांबरोबर रानावनात बागडताना जी मजा येयाची ना.. काही बोलूच नका. खरच, म्हणतात ना बालपण हे पावसाच्या सरी सारख असते, ते सतत बागडत असतं.
शाळेतून घरी येताना पावसाची सरी अंगावरती घेतल्याशिवाय घरी येनच होत नसायचं. अशावेळी समजून जायचं की घरी गेल्यावर पाठीवर मार नक्कीच मिळणार आहे. पण अशावेळी मार पण ह्या आनंदा पेक्षा छोटा वाटतो. शाळा तीन चार किलोमीटर दूर असल्यामुळे आम्हाला बहुतेक रानातुनच जावं लागायचं. त्यामुळे आम्ही रस्त्याने कमी चालणार आणि रानातूनच चालण्यात आम्हाला आनंद वाटत असे.
आठवणील सरी या मनाला ओलचिंब करून जातात. आज कधीही आठवण झाली, तर मन कस प्रसन्न होऊन जातं. त्या सरी किती ही थंड असल्यातरी अंगावरून घेऊच वाटतात. मन उधान होऊन जातं. म्हणतात ते अगदी बरोबर आहे.. "लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा." बालपण हे प्रत्येक व्यक्तीचं आनंदचं झाड असते. या आनंदाच्या झाडाखाली सतत बागडावस वाटतं असतं. या झाडाखाली बागडत असताना अचानक एक सर त्या झाडाच्या पानाच्या मधून गुपचूप आपल्या अंगाला टिपावी आणि पटकन आपण उड्या मारत आईच्या खुशीत जाऊन मिठी मारावी. परत या सऱ्यांच्या पाठीमागे लागावे आणि तिच्या बरोबर खेळत बसावे. मधून आईचा मधुर शब्द ऐकू येतो…आपण मात्र या सऱ्यांबरोबर मस्त होऊन धुंध पणे बागडत राहतो.
दुःख कितीही येओत, परंतु या दुःखाच्या डोहात आपल्याला आठवणीतील एक जरी सर मनाला स्पर्श करून गेली तर.. आपल्याला सकारात्मक आशेचा मार्ग मिळतो.
शाळेचा पहला दिवस आणि पाऊस येण्याचा पहला दिवस. असा योगायोग आला म्हणजे कदाचित शाळेला सुट्टी मिळेल या आनंदाने पावसाला येण्यासाठी आम्ही त्याला गाण्याच्या मधुर शब्दान हाक मारायचो ……………….”येरे येरे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा”. या गाण्याने आम्हाला एवढं वेड लावलेलं होतं की, झोपेत देखील या सरी आम्हाला भीजवून जायच्या. एक वेगळाच आनंद या छोट्या मनाला मिळत असायचा. सकाळ झाल्या झाल्या पावसाच्या गारा कुठे मिळतात का ते शोधण्यासाठी आम्ही सारी बच्चे कंपनी बाहेर पडत. त्या वेळी लाईट नव्हती, टीवी नव्हता, मोबाईल नव्हता, तरी पण आजच्या पेक्षा किती तरी पटीने आनंद त्यावेळी बालपणीचा होता. या सऱ्यांबरोबर खेळण्याची एवढी मजा होती, ती या शहराच्या मैदानात खेळण्यात केव्हाच आली नाही.
भात लावणी आली म्हणजे आम्ही सारे बच्चे कंपनी आनंदून जायचो. भात लावणी आणि पावसाची सर यांच्याबरोबर आमचं घट्ट नातं असायचं. भात लावणीच्या चिखलात उड्या मारताच एखादी सर पटकन वाऱ्याचे वेगाने अंगावरती टिपली की, आमच्या अंगात नुस्त उधान येयाच. आज कौतुक वाटतं.. त्यावेळी अंगात उड्या मारण्यासाठी उर्जा कोठून येयाची हे कळतच नव्हतं. ही सर मनाला स्वर्ग सुखाचा आनंद भरभरून देऊन जायची. भरलेल्या डबक्यात कागदी होड्या सोडून आम्ही सारे बच्चे कंपनी होड्यांची शर्यत करायचो. ही शर्यत आमच्यामध्ये खेळीमेळीची असायची. आजच्या सारखी जीव घेणी शर्यत बिलकुल नसायची. ही सर मनाला एवढा आनंद देऊन जायची की, आज जरी या क्षणाची आठवण झाली तरी, आलेला त्राण देखील कुठच्या कुठे पळून जातो ते.. कळतच नाही. मनाला एक वेगळाच बालपणीचा आनंद मिळून जातो.
पाऊस म्हणजे सृष्टीमधील अलौकिक क्षण. त्रस्त झालेल्या मुला, माणसांना, दुःखी असलेल्या माणसांना नवीन चेतना देणारे गुण फक्त या पावसाच्या सऱ्यांमध्ये असतात.
आनंदाने जगणे काय असतं? हे आम्हाला या शीतल स्पर्श देणाऱ्या पावसाच्या सऱ्यांनी शिकवलं. माणसांनी नेहमीच लहान मुलासारख रहाव. कधीच कुणी मनात चिंता, वैर, स्पर्धा आणू नये. पावसाच्या सऱ्यांसारखे स्वच्छंद पणे बागडत असावं.
या सऱ्यांमध्ये मातीला पण अमृता समान सुगंध आणण्याची क्षमता असते. अशावेळी माती पण आपल्याला खावीशी वाटते. त्यातून निर्माण होणारा सुंगंध आम्हाला वेगळीच चेतना देऊन जातो. आज खरच.. या सृजन कर्त्याला दंडवत करावसं वाटतं, जेव्हा पहल्या पाऊसाची पहली सर आम्हा गर्मीने त्रासून गेलेल्या मुलांच्या अंगाला स्पर्श करुन जाते, तेव्हा कोमेजलेलं मन हर्षित होऊन जातं.
Read More :
आनंदाचं झाड माझ्या अंगणी आहे
ईश्वर काय आहे? कोणाला माहित आहे ईश्वराच अस्तित्व कशात आहे?