आज केवळ सेलिब्रिटीच नाही तर सामान्य वर्गातील महिला देखील स्वतःला स्मार्ट आणि सुंदर बनवण्यासाठी कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करतात. या कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये लिपस्टिक, नेल पेंट, काजळ, ब्लीच क्रीम इत्यादींचा समावेश होतो. असे प्रोडक्ट्स वापरण्याचा ट्रेंड प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आपल्याला सुंदर आणि स्मार्ट बनवतात, परंतु कदाचित तुम्हाला हे माहित असेल की, या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे काही दुष्परिणाम ही आहेत. आणि जेव्हा त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतात, तेव्हा तुमचा चेहरा दिसण्यालायक राहत नाही. तसेच तुम्हाला अनेक घातक समस्यांना तोंड द्यावे लागते.
image credit to pexels.com
या लेखात, विशेषतः महिलांसाठी, कॉस्मेटिक प्रोडक्ट्सच्या अतिवापरामुळे, आपल्या शरीरावर कसे परिणाम दिसून येतात. याबाबत सविस्तर माहिती आपणास देण्यात आली आहे. तुम्हाला या लेखातील काही टिप्स आवडल्या असतील तर हा लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Read More: निरोगी जीवनासाठी स्वयं-शिस्त कशी अंगीकारावी?
चेहरा स्मार्ट आणि सुंदर दिसण्यासाठी महिला पार्लरमध्ये दिवसभर मेहनत करतात. यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरता. परंतु मी तुम्हाला सावधान करू इच्छितो की, तुम्ही वापरत असलेले कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, हे तुमच्या चेहऱ्यासाठी किती हानिकारक आहे. कदाचित तुम्हाला त्याबद्दल माहितीही नसेल. म्हणूनच कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरण्यापूर्वी त्याबद्दल माहिती घेणे आवश्यक आहे.
लिपस्टिकमध्ये आढळणाऱ्या लीडमुळे मेंदूला इजा होण्याची शक्यता असल्याचे वैज्ञानिकांच्या संशोधनात आढळून आले आहे.
या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर कमी करा, अन्यथा स्किन खराब होण्याची शकता आहे
१. नेल पॉलिश
तुमची नखे सुशोभित करण्यासाठी तुम्ही हेवी, डार्क आणि शिमरी नेल पॉलिश वापरता. पण जर तुम्ही हे नेल पेंट जास्त वेळ वापरत असाल तर, ते तुमच्या नखांना हानिकारक आहे. जर तुम्ही रोज लाल आणि काळा रंग वापरत असाल तर तुमच्या नखांना इजा होऊ शकते. घातक रसायनांमुळे तुमची नखे पिवळी होऊ शकतात.
२. लिपस्टिक
लिपस्टिकमुळे ओठ कोरडे होतात. त्याच्या जागी लिप बाम लावल्यास ते खूप चांगले आहे. जर तुम्हाला गडद रंगाची लिपस्टिक लावायची असेल तर, लिप बाम लावून त्यावर लिपस्टिक लावा. लिपस्टिक आणि लिंप ग्लासमध्ये तेल आणि रसायने वापरली जातात आणि ते तुमच्या ओठांसाठी खूप हानिकारक आहे. लाल लिपस्टिकमध्ये भरपूर लीड असते, त्यामुळे तुम्हाच्या मेंदूचे नुकसान होण्याची शक्यता असते.
३. काजळ
काजल हे खूप जुनं प्रसाधन आहेत. जे तुमच्या डोळ्यांना खूप छान लुक देते. पूर्वी मुलांच्या जन्मानंतर काजळ लावायचे. परंतु आज काजळचा वापर खूप हानिकारक आहे. काजळध्ये रासायनिक विषारी पदार्थ असल्यामुळे डोळ्यांमध्ये कंजक्टिवायटीस,ग्लुकोमा, ड्राय आयचा धोका वाढतो. म्हणूनच मेकअप करताना काजळ वापरणे टाळा.
४. टॅल्कम पावडर
स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी तुम्ही टॅल्कम पावडर वापरता. पण टॅल्कम पावडरच्या वापरामुळे तुम्हाला ऍलर्जी होऊ शकते आणि फुफ्फुसात इन्स्पेक्शन होऊ शकते. टॅल्कम पावडरमुळे तुमच्या शरीरातील आर्द्रता कमी होते आणि तुमची त्वचा कोरडी आणि फिकट होते.
५. ब्लीच क्रीम
अनेक वेळा ब्लीच क्रीम वापरल्याने तुमच्या शरीराला हानी पोहोचते. त्यामुळे तुमची त्वचा लाल आणि कोरडी होते.
६. मॉइश्चरायझर
सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे तुमच्या शरीराला खूप नुकसान होते. परंतु अशा वेळी मॉइश्चरायझर तुम्हाला शरीराच्या हानीपासून वाचवते. परंतु मॉइश्चरायझर क्रीममध्ये मिनरल ऑइल आणि पॅराफिन मिक्स असते, जे तुमच्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. कॉस्मेटिक कंपन्या मॉइश्चरायझर्समध्ये डिटर्जंट रसायनांचा वापर करतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला खूप नुकसान होते. चांगले मॉइश्चरायझर हे पाणी, हायड्रोसल, प्लांट ऑइलपासून बनवलेले असतात, अशा मॉइश्चरायझरचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा स्मार्ट आणि सुंदर बनवू शकता.
आज प्रत्येक प्रोडक्ट्समध्ये कोणते ना कोणते प्रकारचे रसायन वापरले जाते आणि ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असते. त्यामुळे कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती घ्या, त्यानंतरच तुम्ही ते वापरू शकता.