काली मिरचीचे फायदे : केस पांढरे होणे आणि केस गलतीवर रामबाण उपाय

SD &  Admin
0


ध्याची जीवनशैली माणसांची एवढी फास्ट आहे की, त्याला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला ही वेळ नाही आहे. वेळेवर खाणे नाही, मेंदूवर टेन्शनचे वजन, शरीराला पोषक जेवण वेळेवर नाही, प्रदूषण परिसरात जास्त वेळ राहणे, वेळेवर झोपणे नाही, तेलकट पदार्थाचे जास्त सेवन करणे ई. कारणामुळे माणसाच्या आरोग्यावर विचित्र परिणाम दिसत असतात.

    अशा जीवनशैलीचा वाईट परिणाम हा इतर अवयवांबरोबर आपल्या केसांवरती ही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. केसांना कोरडेपणा येणे, केस वारंवार गळणे, टक्कल पडणे, केस पांढरे होणे अशा कितीतरी समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. केस आपल्या सौंदर्यात भर टाकत असल्यामुळे, कितीतरी वेळा आपल्याला केस गलती किंवा टक्कल पडल्यामुळे अपमानाला सामारो जावे लागते आणि मग आपण केसांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पश्चाताप करत बसतो. हे आपल्याला टाळायचे असेल तर आपली जीवनशैली बदलायला हवी. आरोग्याला प्रथिमिकता देणे हेच या वाईट परिणामावरती उत्तम उपाय आहे.

काली मिरचीचे फायदे : केस पांढरे होणे आणि केस गलतीवर रामबाण उपाय

    केसांच्या उपायावरती जीवनशैली बरोबर घरीच आयुर्वेदिक पद्धतीने उपाय केले तर आपल्याला अशा समस्येपासून बचाव करता येईल. केसांच्या उपायावरती काली मिरची आपल्याला वरदान आहे. कमी खर्चात आपल्याला इतर कोणत्याही खर्चिक वस्तूचा उपयोग न करता काली मिरचीचा उपयोग करून केसांना आपण नवीन लुक आणि आरोग्य देऊ शकतो.

काली मिरची केसांवरती कशी फायदेशीर आहे : Benefits Of Black Pepper 


बाल सफेद होण्यापासून बचाव करते

    चार-पाच चमच दहीमध्ये एक चमच काली मिरची मिक्स करून तिची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना १५ ते २० मिनिटासाठी व्यवस्थित लाऊन घ्या. त्यानंतर डोके चांगल्या शाम्पूने धुवून घ्या. या पद्धतीमुळे तुमच्या केसांना चमक येईल व केस पांढरे होण्यापासून बचाव होईल.

डँड्रफपासून बचाव करते 

    काली मिरचीत असलेल्या विटामिन सी मुळे आपले डोके (टाळू ) साफ राखण्यास मदत होते. त्यामुळे डँड्रफ तुमच्यापासून कोसो दूर पळून जातो. ऑलिव ओईलमध्ये थोडीसी काली मिरची मिक्स करून, ते तेल केसांना लाऊन घ्या, पूर्ण दिवस राहू दिल्यानंतर डोके धुवून घ्या. अशा उपायामुळे कोणताही साइड इफेक्ट न होता तुम्ही केसांना डँड्रफपासून बचाव करू शकता. काली मिरची आणि ऑलिव ओईल यांचे मिश्रण बंद बाटलीमध्ये काही दिवस ( १ आठवडा) राहू द्या. त्यानंतर हे मिश्रण केसांना दरोरज लाऊ शकता. 

Read More : कॉस्मेटिक प्रोडक्ट्स त्वचेचे नुकसान करतात का?


    केस मऊ आणि चमक येण्यासाठी २-३ चमच लिंबामध्ये १ चमच काली मिरची मिसळून ते मिश्रण केसांना १५-२० मिनिट राहू द्या. त्यानंतर ते चांगल्या पाण्याने धुऊन घ्या. तुमच्या केसांना चमक तर येईल बरोबर केस ही मऊ होतील.

सूचना

    कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपण जसा तज्ञांचा सल्ला घेतो, त्याचप्रमाणे कोणत्याही औषधी पदार्थाचा वापर करताना डॉक्टरांचा किंवा वैदिक पद्धतीच्या जाणकरांकडून माहिती मिळवून घेणे आवश्यक आहे.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!