मुलींना प्रपोज करण्याच्या बेस्ट ट्रिक : Best trick to propose a girl

SD &  Admin
0


मुले.. मुलींना प्रपोज करण्यासाठी अफलातून युक्त्या शोधत असतात. यामध्ये काही युक्त्या यशस्वी होतात तर काही अपयशी होतात. मित्रहो तसं आज पाहिले तर गरिबी आणि श्रीमंती प्रेमात दिसत नाही. म्हणूनच म्हणतात "प्रेम हे आंधळं असतं" तुम्ही कितीदा ऐकलं असेल की, एक करोडपतीची मुलगी एका गरीब मुलासोबत पळून गेली. कदाचित म्हणूनच प्रेमाला आंधळे म्हटले गेले असावे. आणि कधी कधी याचा प्रत्येय देखील येतो. 

    परंतु सायंटिफिकरित्या पाहायला गेलं तर ही वाक्यांश खोटं आहे, असे वाटते. कारण बघाना.. कोणीही डोळे मिटून प्रेम करत नाही. प्रत्येकजण उघड्या डोळ्यांनीच प्रेम करतो. फरक एवढाच आहे की, यावेळी व्यक्ती डोळ्यांनी विश्वास ठेवण्यापेक्षा मनातून आणि हृदयातून विश्वास ठेवतो. म्हणून लोकांना हे प्रेम आंधळं दिसतं.  मित्रहो.. प्रेम हे मनातल्या आणि हृदयातल्या भावनांचं एकत्रित संगम आहे. या संगमारती मुलगा-मुलगी वाहत असतात. आणि असं होण साहजिकच आहे. कारण हे प्रकृतीच्या/निसर्गाच्या आकर्षण या नियमाच्या आधारे होत असते. म्हणून यात काही चुकीचं नाही आहे. 

मुलींना प्रपोज करण्याची बेस्ट ट्रिक : Best trick to propose a girl
image credit to pexels.com 
   
मित्रहो येथे आम्ही मुलींना 
प्रपोज करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे, याबाबत आपल्याला बेस्ट ट्रिक्स शेअर करत आहोत. जर या टिप्स आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Best trick to propose a girl in marathi : मुलींना प्रपोज करण्याच्या काही खास टिप्स

सर्वप्रथम, मुलींना प्रपोज करण्यापूर्वी, तुम्हाला कोणत्या मुलींना कोणत्या परीस्थित प्रपोज करू नये, हे जाणून घेऊया.

१. तुम्हाला एखादी मुलगी आवडली असेल, परंतु त्या मुलीशी तुमची ओळख नाही, अशा वेळी तुम्ही त्या मुलीला पटकन प्रपोज करण्याचा विचार करू नये. वेळ घ्या. हेल्दी मैत्री निर्माण करा. स्वतः त्या मुलीकरता तुम्ही योग्य आहात काय, हे बघा. मगच योग्य तो निर्णय घ्या.

२. तुमची मुलीशी दूरची ओळख आहे, परंतु तुम्ही मित्रासारखे बोलत नाही. तुम्हाला एकमेकांबद्दल काहीच माहिती नाही. मित्रहो अशा वेळी प्रपोज करणे व्यर्थ ठरेल.

३. जर मुलगी एखाद्यावर प्रेम करत असेल आणि तुम्हाला हे माहित असेल तर, तिला प्रपोज करून काहीही फायदा नाही. ती मुलगी तुम्हाला नक्कीच नाकारेल. आणि असं करणे चुकीचं आहे. कारण कधीही कोणाच्या प्रेमध्ये विघ्न आणू नये.
 
४. श्रीमंत कुटुंबातील मुलीशी तुमची मैत्री असली तरी, तिला प्रपोज करण्यापूर्वी तुम्हाला तिच्या भावना आणि तुमच्या परीस्थितीचा विचार करावा लागेल. आपल्यामुळे कुण्या मुलीचं आयुष्य होऊ नये, याकडे लक्ष दिलं गेलं तर, खऱ्या प्रेमाचा आदर आणि वंदन केलं असे म्हणावे लागेल.     

Read More : एखादी व्यक्ती खरच तुमच्या प्रेमात आहे, हे कसं ओळखावं

मुलींना प्रपोज केव्हा करू शकतो?

१. मुलीशी तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असावेत आणि तुमचं मोबाईलवर किंवा इतर वेळी हेल्दी बोलणं सुरु असतं, मग तुम्ही अशा वेळी मुलीला प्रपोज करू शकता. अशा मुलीला प्रपोज करण्यात कोणताही धोका नाही. आणि जर तुमच्या दोघांमध्ये प्रेमळ हेल्दी संबध आहेत तर, तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल.

२. तुम्ही एकमेकांना भेटता. कधी कधी तुम्ही दोघे एकमेकांच्या गोष्टी शेअर करता. त्या मुलीशी बोलत असताना तुम्हाला तिच्या डोळ्यात समजते की, ही मुलगी तुमच्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार करते, अशावेळी तुम्ही प्रपोज करण्याचा विचार करू शकता.

३. तुम्ही दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहात. तुम्ही अनेक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात सहभागी झाला आहात. जर तुमची तिच्यात खोलवर ओढ असेल तर, तुम्ही त्या मुलीला प्रपोज करू शकता.

४. जर एखादी मुलगी तुमच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होत असते. तुमच्या घरच्या सुख-दु:खात आवर्जून तुमच्या सोबत असते. तुमचा घरातील कोणताही कार्यक्रम चुकवत नाही. प्रत्येक सुख-दु:खात वैयक्तिक तुमच्या पाठीशी उभी असते. मुलगी तेव्हा असे करते, जेव्हा तिला त्या मुलासोबत राहायला आवडते, बोलायला आवडते. अशी मुलगी तुम्हाला प्रपोज केल्यानंतर ९९% होच म्हणेल.

५. मुलगी तुमच्यासोबत कुठेही जाण्यास सहमत असते. एखादी मुलगी असे तेव्हा करते, जेव्हा तिला तुमच्याबद्दल भावनिक अटॅचमेंट आहे. अशा मुलीला तुम्ही नक्कीच प्रपोज करू शकता.

६. मुलगी फक्त तुमच्याशी इंटरनेटवर चॅटिंग तासंतास करत असते. तिच्या प्रत्येक शब्दामध्ये तुम्ही असता, अशी मुलगी तुम्हाला लगेच स्वीकारेल.

मनातले विचार 

मित्रहो तुम्हाला एक महत्त्वाचं सांगू इच्छितो. हे खूप महत्वाचं आहे. जर एखाद्या मुलीने तुमचा प्रस्ताव नाकारला तर लगेच आक्रमक होऊ नका. मित्रहो तुम्ही ऐकलं असेल, मुलीने प्रपोजल नाकारल्यावर एका मुलाने मुलीवर ऍसिड फेकले. मित्रहो असे घाणेरडे कृत्य करू नका. प्रत्येक व्यक्तीला आपला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो. 

तुमचं खरच तिच्यावर प्रेम असेल, तर तिच्या निर्णयाचा आदर करा. तिने जरी नकार दिला असला तरी, तिच्याशी हेल्दी मैत्री कायम ठेवा. तिच्या गरजे प्रसंगी मदत करा. आणि तिला विश्वास द्या की, तुम्ही तिच्यासाठी प्रेमाच्या पलीकडे जाऊन प्रेम करत आहात. आणि हे सर्व स्वार्थासाठी नव्हे तर, फक्त तिला सुख देण्यासाठी. मित्रहो खरच तुमचं प्रेम आणि आई प्रकृतीचा आशीर्वाद मिळाला तर, तुम्ही तिच्या प्रेमाला नक्कीच जिंकाल.






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!