कविता खूप छोटीसी आहे परंतु तिचा अर्थ खूप मोठा आहे. जसे सूर्याला दिवस निघलू पाहत आहे, पण सूर्य हा सूर्य आहे. त्याला कोणीच निघलू शकत नाही. तो आज जरी संध्या मावळला तरी, तो उद्या नव्याने जागा होऊन जगाला प्रकाशमान करेल.
Poem Content and image Credit to Spruha Joshi
मित्रहो थोडक्यात ही कविता झोपेलेल्या गोष्टीला क्षणात जागे करणारी आहे. मनात आणि शरीरात विजेच्या झटक्याप्रमाणे उर्जा संचारते, तसा मनुष्य आपल्या लक्षा पर्यंत त्याच विजेच्या गतीने पुढे सरकतो. खूप छान पद्धतीने कवयित्रीने आपल्या समोर या कवितेच्या माध्यमातून महत्वकांशी व्यक्तिरेखा साकारली आहे.
Read More : त्या मंतरलेल्या रानी मराठी कविता | Tya Mantarlelya Raani | कवयित्री : स्पृहा जोशी
मित्रहो या कवितेला बरेचसे अर्थ निघतील. तुम्ही ज्या नजरेने या कवितेकडे बघाल, त्या नजरेने ही कविता तुमचं स्वागत करेल. खूप मस्त कविता आहे. विनंती आहे की, ती इतरांना ही शेअर करा. जेणे करून त्यांना ही कवितेचे विश्व आवडू लागेल.
भिंतीला टेकून उभी आहे मी मराठी कविता | कवयित्री स्पृहा जोशी
भिंतीला टेकून उभी आहे मी
मावळत्या सूर्याकडे एकटक पहात
तोही एकटक, माझ्याकडे पहात
टेकलाय लालभडक क्षितिजाला
थकलाय दिवसभराची शर्यत खेळून..
लाटा किती जवळ जातायत त्याच्या
असं वाटतंय आत्ता पिऊन टाकतील त्याला
एका घोटात!
पण त्याला कायमचा संपवू नाही शकणार त्या कधीच…
उद्या सकाळी तो उगवणाराच आहे
आजच्या इतकाच तेजस्वी,
पुन्हा उद्याची नवी शर्यत खेळायला..!!
कवयित्री स्पृहा जोशी
कवितेचे इंग्लिशमध्ये भाषांतर
Bhintila Tekun Ubhi Ahe Mi
Mavaltya suryakade ektak pahat
Tohi ektak mazyakade pahat
Teklay lal bhadak kshitijala
Thaklay divasbharachi sharyat khelun
Lata kiti javal jatayat tyachya
As vatatay atta pivun taktil tyala
Eka ghotat!
Pan tyala kayamacha sampvu nahi shakanar tya kadhich..
Udya sakali to ugvanarach ahe
Ajachya itaka tejasvi
Punha udyachi navi sharyat khelayala..!
- Spruha Joshi
आभार आणि क्रेडीट
या ब्लॉगमध्ये पब्लिश केलेला कवितेचा कंटेंट कवयित्री स्पृहा जोशी यांचा आहे. ए डिलाईट लाइफ.कॉम ब्लॉग त्यांचे अभिवादन करत आहे, तसेच त्यांना या कवितेसाठी क्रेडीट देत आहे.
The poetry content published in this blog is by poet Spruha Joshi. A Delight Life.com blog expresses its thanks to him, as well as giving him credit for this poem