आजकाल मुलीसोबत डेटिंगवर जाणे ही फार मोठी गोष्ट नाही आहे. परंतु डेटिंगवर जाण्यापूर्वी काय करावे लागते, हे फार कमी मुला-मुलींना माहीत असते. तुमची पहिली डेट अशी असावी की तुम्हाला ती शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहीले पाहिजे. जसं म्हटले जाते की डेटिंग ही लग्नाची पहिली पायरी आहे. या डेटिंगमुळे तुमच्या आयुष्यात प्रेमाबद्दलचे अनेक विचार सुरू होतात, मग तुम्ही अशा तारेवर पोहोचता, जिथे तुम्हाला स्वर्ग जवळून दिसतो. सांगायची गोष्ट अशी की, डेटिंग अशा प्रकारे करा की त्याच्या आठवणी तुमच्या आयुष्यात कायमच्या राहतील.
या लेखात मुलाने आपल्या प्रेयसीला डेटिंग करताना कशी काळजी घ्यावी, याबद्दल माहिती दिली आहे. वाचल्यानंतर काही टिप्स आवडल्या तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका.
डेटिंगच्या उत्कृष्ट टिप्स : Dating Excellent Tips
या टिप्स मुलं आणि मुली दोघानाही फॉलो करायच्या आहेत. स्पेशली या टिप्स मुलांना जास्त प्रभावी ठरू शकतात. कारण डेटिंगच्या बाबतीत मुलांनाच जास्त पुढाकार घ्यावा लागतो.
१. जोडीदाराच्या आवडी-निवडीची माहिती मिळवा
जर तुम्ही पहिल्यांदाच डेटिंग करत असाल तर, तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. डेटिंगच्या वेळी असे होऊ नये की त्याची निवड वेगळी आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी वेगळे करत आहात, केलेले काम बिघडण्याची शक्यता अधिक असते.
२. डेटिंगचे स्थान सुरक्षित आणि निसर्गरम्य निवडा
चांगले स्थान निवडणे देखील खूप महत्वाचे असते. कोणतीही जागा निवडून फायदा नसतो. म्हणूनच अशी जागा निवडा, जिथे जास्त गर्दी नसेल. जेणेकरुन तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही अडथळ्याशिवाय एकांतात बोलू शकाल. जागा निसर्गरम्य निवडा.परंतु लक्षात ठेवा की निर्जन जागा असू नये. कारण आज माणसाची विचारसरणी बदलत राहते.
३. जोडीदाराच्या पसंदीचे जेवण ऑर्डर करा
डेटिंग करताना तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता, तेव्हा तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल विचारा. त्याला कोणते अन्न आवडते ते ऑर्डर करा. जर त्याला मांसाहारी आणि मद्यपान आवडत नसेल तर, अशा हॉटेलमध्ये जाणे टाळावे.
४. तुमच्या जोडीदाराचे ऐका
डेटिंग करताना तुम्हाला हे नक्कीच लक्षात ठेवावे लागेल. बोलत असताना तुमचा आवाज कमी ठेवा. तसेच तुमचा पार्टनर ज्या विषयावर बोलत आहे, त्यावर वाद घालू नका. जर त्याने काही प्रश्न विचारला, तर त्याचे प्रामाणिकपणे उत्तर द्या.
५. उदास / दु:खी विषयावर बोलू नका
जोडीदाराशी बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्याशी उदास किंवा दु:खी विषयावर बोलू नका. तुमच्या घरातील समस्या त्याच्यासोबत शेअर करू नका. त्यामुळे त्याचे मन विचलित होऊ शकते.
६. स्वभावामध्ये आणि बोलण्यात आदर ठेवा
डेटिंगला जाण्यापूर्वी तुमच्या स्वभावामध्ये आणि बोलण्यात योग्य समतोल ठेवा. तुमच्या पार्टनरला या गोष्टी नक्कीच आवडतील. बरोबर तिच्या मनात तुमच्याविषयी चांगली भावना निर्माण होईल. तुमची डेटिंग यामुळे यशस्वी होईल.
७. दुसऱ्याची उणीधुनी काढू नका
डेटिंग ही दोन जीवांची मिलनाची भाषा असते. ती यशस्वी होण्यासाठी कुण्यादुसऱ्याचा चुकीचा आधार घेऊ नका. कधी कधी काय होतं, आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून, दुसऱ्याची निंदानालस्ती करतो. अशा गोष्टी डेटिंग करत असताना कधीच करू नका. अशा वागण्यामुळे तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये तुमच्या विषयी चुकीचा विचार येवू शकतो.
Read More : डेटिंग अॅप्सच्या प्रेमात भारतीय तरुणाई
८. भेटवस्तू घेवून जा
जर पहिले डेटिंग असेल तर तुमच्या जोडीदाराचे आवडते गिफ्ट घ्यायला विसरू नका. भेटवस्तू प्रत्येक मुलीला आकर्षित करतात. भेटवस्तू अशा प्रकारे द्या की त्याला ती डेटिंग नेहमीच लक्षात राहील.
डेटिंग हा प्रेम आणि विवाहाचा आधार आहे. त्यात तुम्ही एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करता. आवडी किंवा नापसंती बद्दल एकमेकांची ओळख करून घेता. म्हणूनच डेटिंगच्या वेळी तुम्ही त्याच्याशी प्रामाणिकपणे बोला आणि त्यासाठी चांगल्या टिप्स फॉलो करा. म्हणजे तुमची डेटिंग नक्कीच यशस्वी होईल.