वर्क फ्रॉम होममध्ये पती-पत्नीने कोणत्या चुका करू नये ? अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो.

SD &  Admin
0


ती-पत्नीचे नाते जगातील सर्वात पवित्र आणि नाजूक मानले जाते. या नात्यावर जगाचा पाया उभा आहे. घरातील सुख-शांती पती-पत्नीच्या स्वभावावर अवलंबून असते. तसं म्हटल्याप्रमाणे जेथे भावनिक नातं निर्माण होतं, तेथे वाद हे होणारच. पण नात्यात समज आणि विश्वास असेल तर ते कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतात. त्यांच्या नात्यात कधीही दुरावा येणार नाही.

    सध्या कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम आहे. अशा प्रसंगी पती-पत्नीला एकमेकांसोबत खूप वेळ घालवायला मिळतो. पण असे म्हणतात की, जास्त गोड खाणे देखील आरोग्यासाठी चांगले नसते. या आधारावर पती-पत्नीने एकमेकांना जास्त वेळ दिला तर, दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने वरचढ होत राहणारच. आणि जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर निश्चितपणे भांडणे होण्याचे चान्सेस अधिक असतात.

वर्क फ्रॉम होममध्ये पती-पत्नीने अशा चुका करू नये, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो.
image credit to pexels.com 

अशा वेळी दोघांनीही स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. दोघेही नोकरी करतात, त्यामुळे दोघांकडे काम जास्त असणार हे उघड आहे. यामुळे घरातील कामावरून तुमची भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण ती हाताळणंही तुमचं काम आहे. जर तुम्ही दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांना मदत केली तर तुम्हाला वर्क फ्रॉम होममध्ये  कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Read More: जोडीदाराचे कोणते गुण प्रत्येक पुरुषाला आकर्षित करतात ?


या सर्वांचा आढावा घेवून तुम्ही जर काही गोष्टी समजुतीने टाळल्या तर, तुमच्यात भांडणाची परिस्थिती येणारच नाही. आणि तुम्ही एक सुखी आणि आनंदी जीवन जगू शकता. पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत. 

नवरा बायकोच्या नात्यात या चुका करू नका | Don't make these mistakes in husband wife relationship


१. कामाची  जबाबदारी न घेणे 

वर्क फ्रॉम होम आहे. तरीही अशा वेळी तुम्हा दोघांनी एकमेकांना घरच्या कामात मदत करणे गरजेचे आहे. घराची जबाबदारी एकाच्या खांद्यावर टाकली तर तो नक्कीच रागवेल. यासोबतच तुमच्या दोघांमध्ये भांडणही होतील. हे टाळण्यासाठी तुम्हा दोघांनीही घराची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे घरचे कामही लवकर संपेल आणि त्याच वेळी तुम्ही दोघं ऑफिसची कामेही आरामात कराल.

२. प्रायवसीचा आदर न करणे 

कोरोनामुळे दीर्घकाळ एकत्र राहिल्याने तुमची प्रायवसी धोक्यात येते. तुम्ही तुमच्या मित्राशी मोकळेपणाने बोलू शकत नाही. आणि कोरोनामुळे आणि वर्क फ्रॉम होममुळे तुम्ही बाहेरही जाऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे मन विचलित होते. या विषयावर तुम्हा दोघांचे भांडणही होते. हे टाळायचे असेल तर दोघांच्या प्रायवसीचा आदर केला पाहिजे. दरम्यान, दोघांनी विश्वासाने भरलेले नाते निर्माण केले पाहिजे. पण प्रायवसी दिल्याचा अर्थ असा नाही की तो काहीही करू शकतो, कोणाशीही बोलू शकतो. जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. अन्यथा या नात्यात दुरावा यायला वेळ लागणार नाही.

Read More : टॉक्सिक रिलेशनशिप म्हणजे काय? टॉक्सिक रिलेशनशिप केव्हा बनते ? 


३. शारीरिक सुखाची मागणी अधिक करणे

वर्क फ्रॉम होम आहे. त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यासोबत पूर्ण वेळ असतो. त्यामुळे साहजिकच तुम्हाला सेक्सची इच्छा होतच असते. आणि येणेही स्वाभाविक आहे. पण सेक्स कोणत्या वेळी आणि किती वेळा करावा, यालाही काही मर्यादा आहेत. वारंवार सेक्स केल्याने तुमच्या पार्टनरचा सेक्सबद्दलचा मूड खराब होऊ शकतो. त्याचे मन सेक्सपासून वेगळे होऊ शकते. म्हणूनच सेक्स करा पण सेक्स करताना तुमच्या पार्टनरचा आदर करा. या बरोबर तुम्हाला किती वेळा सेक्स करायचा आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

४. एकमेकांकडे दुर्लक्ष करणे

घरीच वर्क असल्यामुळे पती- पत्नी एकमेकांना खूप वेळ देत असतात. पुढे पुढे याचे प्रमाण वाढत जाते. परंतु असे करत असताना पुढे अशी वेळ येते, तेव्हा दोघानाही एकेमेकांचे आकर्षण कमी वाटते. दोघंही एकमेकांना कमी वेळ देवू लागतात. दोघाना एकमेकांची  कंपनीही नकोशी वाटते. अशावेळी दोघांचे एकमेकांकडे दुर्लक्ष होत जाते. परंतु मित्रहो अशी चूक तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकते.   

५. लपून छपून दुसऱ्या व्यक्तीशी बोलणे

संशय नात्याला लागलेला कळंक आहे. आणि यापासून दोघांनाही खूपच दूर राहिले पाहिजे. सध्या वर्क फ्रॉम होम असल्यामुळे दोघांनाही स्वतंत्र स्पेस मिळत नाही आहे. आणि यामध्ये आपल्या आवडत्या व्यक्तीला देखील फोन होण्यास अडथला येत असतो. अशात त्या व्यक्तीशी सतत लपून छपून बोलण्याचा प्रयत्न  करू नका. तुमच्या पत्नीचा तुमच्यावर संशय निर्माण होऊ  शकतो.            

वरील सर्व गोष्टी वाचताना खूप काही नसल्याच वाटतं, परंतु या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नाती फायनल स्टेजपर्यंत नेण्यासाठी याचं काटेकोरपणे आणि गंभीरपणे पालन करणे आवश्यक आहे.


      



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!