निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर काय करू नये आणि काय करावे

SD &  Admin
0


पल्या दैनंदिन जीवनात आपण कोणती ना कोणती कामे करतच असतो. काही कामे आपल्यासाठी फायदेशीर असतात तर काही नुकसान करतात. म्हणूनच आपण जे काही काम करतो, ते चांगलं आहे की वाईट, याचा विचार आपल्याला करायला हवा. अन्यथा त्याचे परिणाम कधी ना कधी आपल्याला भोगावे लागतात.

    यामध्ये प्रथम आपल्याला शरीराची उत्तमपणे काळजी घ्यावी घेणे. हे आपल्या आयुष्यातील सर्वात चांगले आणि महत्वाचे काम आहे. त्यासाठी शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला प्रथिनेयुक्त आहार आवश्यक असतो. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे आपण अन्न कसे खातो. कोणत्या वेळी खातो याकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा चांगले अन्न खाल्ल्यानंतरही त्याचा आपल्यावर वाईट परिणाम दिसून येतो.

निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर काय करू नये आणि काय करावे
image credit to pexels.com 

माझ्या प्रिय मित्रांनो, या लेखात आम्ही तुम्हाला आरोग्याविषयी आवश्यक माहिती देणार आहोत आणि ती म्हणजे तुम्ही जेवल्यानंतर काय करावे आणि काय करू नये. हे जर तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही निरोगी आयुष्य जगाल. जर तुम्हाला हा लेख वाचून आवडला असेल तर, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.

Read More : अक्षय कुमारचा डाएट प्लॅन कसा असतो? जाणून घ्या त्याच्या फिट असण्याची जीवनशैली

निरोगी राहण्यासाठी आपली जीवनशैली कशी पाहिजे? 

निरोगी राहण्यासाठी आपल्याला प्रथम सवयी बदलल्या पाहिजेत. या चांगल्या सवयीच आपल्याला निरोगी आयुष्य देवू शकतात. पाहूया आपल्याला काय करायला पाहिजे आणि नाही. ज्यामुळे आपण आपले आयुष्य निरोगी करू शकतो.   

जेवल्यानंतर काय करू नये

१. जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू नये 

पचनासाठी आपल्याला उर्जेची आवश्यकता असते. या क्रियेसाठी आपल्या पोटाला अधिक शक्ती लागते. परंतु आपण जेवल्यानंतर लगेच आंघोळ केली तर आपल्या शरीराचे तापमान कमी होते आणि आपल्या शरीराचे तापमान सामान्य करण्यासाठी रक्त प्रवाह सक्रिय होतो. यावेळी रक्त आपल्या पोटात पोहोचत नाही. हे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम दर्शविते.

२. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये 

व्यायाम केल्यावर ताजेपणा जाणवतो. परंतु जेवल्यानंतर व्यायाम केला तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसतात. जर आपण खाल्ल्यानंतर व्यायाम केला तर, आपले शरीर मंद आणि निष्क्रिय होते. म्हणूनच आपण जेवल्यानंतर हळू चालण्याचा व्यायाम करतो, यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहते.

३. चहा कॉफी टाळणे 

अनेक लोकांना जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. विशेषतः भारतातील महिला जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी पितात. ही त्यांची अत्यंत वाईट सवय आहे. चहामध्ये पॉलिफेनॉल आणि टॅनिन असतात जे आपल्या शरीरातील लोह निष्क्रिय करतात. त्यामुळे अशा महिलांमध्ये लोहाचे प्रमाण खूपच कमी असते.

४. खाल्ल्यानंतर लगेच फळांचे सेवन करू नये 

काही लोकांचा असा विश्वास आहे की, जेवल्यानंतर फळे खाणे चांगले असते. परंतु त्यांचा हा विश्वास अत्यंत चुकीचा आहे. फळे खाल्ल्याने पचनशक्ती सुलभ होते. खाल्ल्यानंतर फळांचे सेवन केल्यास पचनशक्ती बंद होते. अन्न आहे तसेच पोटात राहते. यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही.

५. सिगारेट सोडा

जर तुम्हाला सिगारेटची सवय असेल आणि तुम्ही त्याशिवाय राहू शकत नसाल तर, जेवल्यानंतर सिगारेट ओढू नका. संशोधनानुसार आपण जेवल्यानंतर सिगारेट ओढली तर, अन्न विषारी होते. सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीन, टार आणि इतर हानिकारक रसायनांमुळे अन्न विषारी बनते. पोटात ट्यूमर जन्माला येतो आणि आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते.

७. जेवल्यानंतर बेल्ट सैल करू नये

बरेच लोक जेवल्यानंतर आपला बेल्ट सैल करतात. याचा अर्थ असा होतो की आपण आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाल्ले आहे. जर तुम्ही हे रोज करत असाल तर, तुम्ही लठ्ठ व्हाल आणि तुमच्या कंबरेचा आकार वाढेल आणि तुमची चरबी वर दिसू लागेल. यामुळे तुमच्या शरीराचा आकार पूर्णपणे खराब होईल.

८. जेवल्यानंतर झोपू नये 

तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपता, ही तुमची चुकीची सवय आहे. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतो. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पचन थांबते. यामुळे तुम्ही खाल्लेले अन्न पोटात तसेच राहून आपले वजन व पोट वाढते. संशोधनानुसार जर तुम्ही दररोज असे केले तर, काही दिवसात तुम्ही जाड दिसू लागता.

खाल्ल्यानंतर काय केले पाहिजे?

१. गरम पाणी प्यावे 

गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. गरम पाण्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि आपण जे अन्न खातो ते लवकर पचते. ऊन असो वा थंडी, जेवल्यानंतर कोमट पाणी प्यावे.

२. थोडा वेळ शतपावली केले पाहिजे

जेवल्यानंतर लगेच नाही, परंतु काही वेळाने शतपावली केले पाहिजे. त्यामुळे पचन सोपे होते. हे आपल्याला अन्न पचवण्यास मदत करते.

३. गोड खाणे टाळावे

अनेकजणांना खालल्यानंतर गोड खाण्याची सवय असते. ही सवय आताच सोडा. आरोग्यासाठी ही सवय चुकीची आहे.


मित्रहो..आपल्याला निरोगी राहण्यासाठी वरील सर्व गोष्टी कराव्याच लागतील. आपल्याला आलस करून चालणार नाही. सुरुवातीला लागलेल्या सवयी मोडणे कठीण जातात. परंतु आपल्याला आयुष्य जर निरोगी हवे असेल, तर चांगल्या सवयी सुरु केल्याच पाहिजे.        
      




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!