वजन कमी करणे आणि मधुमेह ( डायबेटीस ) नियंत्रण तज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन : दिवसातून दोन वेळा जेवण करा आणि वजन कमी करून मधुमेह ( डायबेटीस ) वर नियंत्रण मिळवा या वाक्यामुळे अनेक लोकांना नक्कीच हसू येईल. कारण यापूर्वी अशा योजनेबद्दल कोणीही सांगितले नव्हते. तसेच कोणीही या डाएट प्लॅनवरती विचारही केला नव्हता. आज लोक डॉक्टरांकडे जाऊन त्यांचे वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह कमी करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात. परंतु एवढे करूनही त्यांनां लठ्ठपणा किंवा मधुमेहावरती प्रतिबंध करता येत नाही. या वरती उपाय म्हणून डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन आपल्याला या लठ्ठपणापासून आणि मधुमेहापासून निश्चितपणे मुक्तता देईल. यासाठी गरज आहे फक्त आपले विचार आणि आपली जीवनशैली बदलण्याची.
डॉ. जगन्नाथ दीक्षित यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. आणि त्यांनी संपूर्ण देशाला तसेच जगाला लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्त करण्यासाठी एक यशस्वी डाएट प्लॅन तयार केला आहे. हा यशस्वी डाएट प्लॅन नक्कीच लट्ठ आणि मधुमेह लोकांना दिलासा देईल.
Read More : निरोगी जीवनासाठी स्वयं-शिस्त कशी अंगीकारावी?
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅन का आवश्यक आहे?
अनेक लोक लठ्ठपणामुळे अस्वस्थ असतात. परंतु त्याचबरोबर त्यांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी जास्त त्रास ही घ्यायचा नसतो. त्यांना कमी कष्टात लठ्ठपणापासून मुक्तता हवी असते. ज्या लोकांना खाण्याची आवड असते अशा ही लोकांना लट्ठपानाने ग्रासले आहे. त्यांना जेवण मसालेदार चविष्ट ही हवे असते आणि लट्ठपना ही नको असतो. या सर्व अडचणींवर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा हा डाएट प्लॅन तुम्हाला नक्कीच दिशा देणारा असेल.Read More : निरोगी जीवनासाठी स्वयं-शिस्त कशी अंगीकारावी?
भारत हा एक भरमसाट लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात लठ्ठपणा आणि मधुमेहामुळे बरेच लोक काळजीत पडलेले असतात. खाण्यावरती नियंत्रण नसल्यामुळे, अनेकांना आपल्या लहान वयातच अनेक रोगांना सामना करावा लागतो आणि त्यांना दु:खी, एकटे आणि रसहीन जीवन जगावे लागते. या सर्व कारणांवरती लक्ष ठेवून डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी एक नवीन डाएट प्लॅन तयार केला आहे, त्यास त्यांनी विनासायास डाएट प्लॅन असे नाव दिले आहे, जो आपण कोणतेही कष्ट न घेता, कोणतीही किंमत न देता फक्त आपली जीवनशैली बदलून करू शकता.
दिवसातून दोन वेळा जेवण करा आणि वजन कमी करण्याबरोबर मधुमेह ( डायबेटीस ) वर नियंत्रण मिळवा.
विनासायास डाएट प्लॅन ही एक सोपी पद्धत आहे जी कोणतीही व्यक्ती कोणताही खर्च न करता आणि न कष्ट करता सहजपणे करून आपले आरोग्य निरोगी ठेऊ शकतो. या डाएट प्लॅन द्वारे आपण लठ्ठपणा आणि मधुमेहसारख्या भयानक रोगांना सहजपणे दूर करू शकतो. त्यासाठी आपल्याला आपल्या आवडीचे कोणतेही पदार्थ सोडण्याची आवश्यकता ही नाही. आपल्याला जे खायचे आहे ते खाऊ शकता. फक्त काही गोष्टीचे आणि वेळेचे नियोजन यावरती लक्ष देणे आवश्यक आहे. हा डाएट प्लॅन दिशाभूल करणारा नाही आहे. कारण हा डाएट प्लॅन आणण्यापूर्वी याचे परिपूर्ण परीक्षण करूनच आपल्यापुढे सादर केलेला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या डाएट प्लॅनसाठी कोणताही खर्च करावा लागत नाही किंवा कोणाला किंमत द्यावी लागत नाही. सध्या डाएट प्लॅन द्वारा हजारो लोक कोणत्याही शुल्काशिवाय लाभ घेत आहेत.
डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी स्व: डॉ श्रीकांत जिचकार यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यामध्ये सुधारणा करून त्यांनी या डाएट प्लॅनची निर्मिती केली आहे. ते गेल्या 28 वर्षांपासून वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकवत आहेत. सध्या ते लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जन मेडिकल विभागात प्रोफेसर आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तसेच डब्ल्यूएचओ, युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही त्यांनी काम केले आहे.
हा डाएट प्लॅन कोणी आणि कशा प्रकारे केला जातो?
१८ वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि टाइप -१ मधुमेहाच्या रुग्णांना या डाएट प्लॅन पासून दूर रहावे लागते.
डाएट प्लॅन नुसार आपण दिवसातून फक्त दोनदाच जेवण घेऊ शकता.
आपण आपल्या भुकेनुसार जेवणाची दोन वेळ निश्चित करू शकता.
या डाएट प्लॅन नुसार आपण आपल्या आवडीचे जेवण खाऊ शकता. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे, आपल्याला हे जेवण ५५ मिनिटांत पूर्ण करायचे आहे.
जर आपल्याला दोन जेवणांदरम्यान भूक जाणवत असेल तर तुम्ही एक टोमॅटो, पाणी, २५% दूध, ताक, ग्रीन टी, ब्लॅक टी (साखर न घेता) घेऊ शकता. आपल्याला जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थ आणि साखर टाळावी लागेल. अधिक प्रमाणात प्रथिनेयुक्त पदार्थ खा.
आरोग्यासाठी दररोज ४-५ किलोमीटर चालणे आवश्यक आहे.
हा अकल्पनीय विना खर्चिक डाएट प्लॅन लठ्ठपणा आणि मधुमेह लोकांसाठी वरदान आहे. आपण आपल्या आवडीचे पदार्थ खाऊन आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. या विनासायास डाएट प्लॅनच्या यशामागील शास्त्रीय कारण ही देतात. जर आपण शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाल्लेतर इन्सुलिन चे प्रमाण वाढते, ज्यामुळे आपल्याला लट्ठपनाची आणि मधुमेहाची बिमारी लागून जाते. हे टाळण्यासाठी, आपण आपल्या खाण्याच्या वेळा मर्यादित ठेवल्या पाहिजेत. डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या डाएट प्लॅन नुसार दिवसात दोन वेळा जेवणेच गरजेच आहे आणि या वेळा तुम्ही स्वत : तुमच्या भुकेच्या वेळेनुसार ठरवू शकता. दीक्षित यांच्या डाएट प्लॅन नुसार माणसाच्या शरीरात इन्सुलिन तयार होत असते. इन्सुलिन दोन प्रकारे तयार होते, एक म्हणजे शरीराच्या क्षमतेनुसार स्वत: तयार होते आणि दुसरे मुख्य आपण जेवढ्या वेळा जेवण करतो तेवढ्या वेळा इन्सुलिन तयार होत असते. जेवण्याच्या वेळा वाढविल्यामुळे इन्सुलिन मोठ्याप्रमाणात वाढते. इन्सुलिन वाढल्यामुळे आपण लट्ठ जाडजूड होतो आणि लट्ठपणा वाढल्यामुळे मधुमेह आपल्याला शिकार करतो. हे टाळण्यासाठी या डाएट प्लॅन नुसार दिवसातून दोन वेळा जेवणेच शरीराला योग्य आहे. असं, म्हणतात.. एक वेळा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो भोगी आणि तीन आणि त्यापेक्षा जेवणारे रोगी. हे विधान आपल्याला वेदांमध्ये ही वाचायला मिळते. पूर्वीचे ऋषी मुनी एक वेळच जेवायचे म्हणून ते निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगायचे.
Read More : उत्तम आरोग्यासाठी नियमित चालणे फायदेशीर असते
लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्तता म्हणजे, आपण अनेक आजारापासून मुक्त होऊ शकतो. अपचन, एसिडीटी, सांधेदुखी, पाठदुखी, झोप न येणे , कर्करोग यासारखे आजार या डाएट प्लॅनच्या माध्यमातून टाळता येतात. आपण कधीही विचार केला नसेल, लठ्ठपणामुळे आपण कितीतरी आजारांना विना निमंत्रण बोलवत असतो. म्हणूनच, जर तुम्हाला हे सर्व टाळायचे असेल तर नक्कीच डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा डाएट प्लॅनचा अभ्यास करून तो स्वतः ही आपल्या दैनंदिन जीवनात कटाक्षाने पाळा.