एक पुतला फुटला या कवितेत एका कलाकाराला कोणत्या कोणत्या कठीण गोष्टींना सामोरे जावे लागते, हे खूप छान पद्धतीने एका अभिनेत्रीच्या भूमिकेतून कवयित्री स्पृहा जोशी यांनी सांगितले आहे.
Read More : इवलीशी एक मुठ मराठी कविता | Ivalishi Ek Muth Marathi Kavita | स्पृहा जोशी
एकदा या कवितेचा आस्वाद मनापासून घ्या. तुम्हाला नक्कीच ही कविता आवडेल.. पुन्हा भेटूया...
एक पुतला फुटला कविता | स्पृहा जोशी यांच्या कविता
नेहमीप्रमाणे मला
काहीच फरक नाही पडला..
म्हणजे, अगदीच पडला नाही,
असंही नाही,
मी सगळ्यात आधी घाबरले
मग माझा घसा कोंदला
मग छाती जड झाली,
यापेक्षा आणखी काही..
नाही, खरं तर..
फारसा फरक नाही पडला.
मला वाटत खूssssप काय काय होतं खरं तर
नाही असंही नाही.
वाटत होतं की ओरडून ओरडून बोलावं
अभिव्यक्ती, जातिसंस्था,
त्यांचं हे, आणि आपलं ते..
मेलेली मनं, मुर्दाड अस्मिता
आणखी हे असलं बरंच काय काय..
पण मी घाबरलेच खरं तर
कलाकार असल्यामुळे.
मग ‘त्यांनी’ माझी पुस्तकंच फाडली तर,
नाटकच बंद पाडलं तर
सिनेमाच होऊ दिला नाही तर
किंवा माझ्या तोंडालाच काळंबिळं फासलं तर
किंवा आणखी वाईट..
चारचौघांनी उद्या मलाच धरलं तर!
मी घाबरलेच खरं तर..
मग मी ठरवलं
की आपण शहाणे आहोत
आपलं डोकं ताळ्यावर आहे
आपण अगदीच प्रॅक्टिकल आहोत खरं तर.
आपण नकोच बोलायला खरं तर.
अभिव्यक्ती वगैरेची काळजी
आपण कशाला करायची..
आपण बरे, आपली कला बरी!
फुटायचे ते फुटणार, मरायचे ते मरणार
कुढायचे ते कुढणार
आपण सगळे बहुतेक हे असेच,
कवयित्री : स्पृहा जोशी